‘गोकुळ’च्या निवडणुकीवर कोरोनाचे संकट : अजित पवार यांचे संकेत कोल्हापूर  : राज्यात कोरोना संसर्ग वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारपासून रात्री आठ ते सोमवारी सकाळी सातपर्यंत कडक लॉकडाउन केले जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर उद्या (ता. ५)पासून राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधाचा फटका गोकुळ निवडणुकीलाही बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. राज्यात ज्या-ज्या निवडणुका होत आहेत, त्या निवडणुका थांबवाव्या लागतील, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या निवडणुकीवर कोरोना संकट ओढवण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.  राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यापार्श्‍वभूमीवर राज्य शासनाच्या मंत्री समितीने आज राज्यात विविध नियम लागू केले आहेत. यात शुक्रवारी रात्री आठपासून सोमवारी सकाळी सातपर्यंत लॉकडाउन जाहीर केले आहे. याचाच आढावा घेत उपमुख्यमंत्री  पवार यांनी राज्यातील निवडणुका थांबवाव्या लागतील, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे गोकुळ निवडणुकीलाही याचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. हेही वाचा- मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची आवाडे पिता पुत्रासोबत बंद खोलीत चर्चा; काय ठरलं?   दरम्यान, गोकुळसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उद्या अर्जांची छाननी होईल. २ मे रोजी मतदान, तर ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. ही प्रक्रिया खूप पुढे गेली आहे. यातच राज्य शासनाच्या नवीन नियमांचा गोकुळ निवडणुकीला फटका बसू नये म्हणजे झाले, असे अपेक्षा केली जात आहे. संपादन- अर्चना बनगे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, April 4, 2021

‘गोकुळ’च्या निवडणुकीवर कोरोनाचे संकट : अजित पवार यांचे संकेत कोल्हापूर  : राज्यात कोरोना संसर्ग वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारपासून रात्री आठ ते सोमवारी सकाळी सातपर्यंत कडक लॉकडाउन केले जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर उद्या (ता. ५)पासून राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधाचा फटका गोकुळ निवडणुकीलाही बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. राज्यात ज्या-ज्या निवडणुका होत आहेत, त्या निवडणुका थांबवाव्या लागतील, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या निवडणुकीवर कोरोना संकट ओढवण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.  राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यापार्श्‍वभूमीवर राज्य शासनाच्या मंत्री समितीने आज राज्यात विविध नियम लागू केले आहेत. यात शुक्रवारी रात्री आठपासून सोमवारी सकाळी सातपर्यंत लॉकडाउन जाहीर केले आहे. याचाच आढावा घेत उपमुख्यमंत्री  पवार यांनी राज्यातील निवडणुका थांबवाव्या लागतील, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे गोकुळ निवडणुकीलाही याचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. हेही वाचा- मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची आवाडे पिता पुत्रासोबत बंद खोलीत चर्चा; काय ठरलं?   दरम्यान, गोकुळसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उद्या अर्जांची छाननी होईल. २ मे रोजी मतदान, तर ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. ही प्रक्रिया खूप पुढे गेली आहे. यातच राज्य शासनाच्या नवीन नियमांचा गोकुळ निवडणुकीला फटका बसू नये म्हणजे झाले, असे अपेक्षा केली जात आहे. संपादन- अर्चना बनगे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2PDgthn

No comments:

Post a Comment