ब्रेक द चेन’च्या अनुषंगाने जिल्ह्यात बंदचे नवे आदेश! जिल्हाधिकारींची माहिती  ब्रेक द चेन’च्या अनुषंगाने जिल्ह्यात बंदचे नवे आदेश  जिल्हाधिकारी सूरज मांढरे : ३० एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत निर्बंध  नाशिक : ‘ब्रेक द चेन’च्या अनुषंगाने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुख्य सचिव यांनी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून दिलेल्या सूचनांनंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत सद्यःस्थितीत जिल्ह्यात काय सुरू असेल, नसेल याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सुधारित आदेश जारी केले आहेत.  असे आहेत सुधारित आदेश  - ‘ब्रेक द चेन’ या राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने हॉस्पिटल, रोगनिदान केंद्र, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालय, फार्मसी, औषधनिर्माण करणाऱ्या कंपन्या, सर्जिकल साहित्य आणि चष्मानिर्मिती करणाऱ्या आस्थापना सुरू राहतील. या आस्थापनांवर कोणत्याही वेळेचे बंधन असणार नाही.  - जीवनावश्यक बाबींच्या दुकानांकडून कोविड मार्गदर्शक नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास अशा आस्थापना कोविड अधिसूचना लागू असेपर्यंत बंद करण्यात येतील.  - लग्न समारंभाच्याबाबतीत स्थानिक पोलिस ठाण्याच्या पूर्वपरवानगीने मर्यादित संख्येच्या प्रमाणात फक्त खासगी जागांमध्ये लग्न समारंभ करता येतील. त्याचप्रमाणे किमान उपस्थिती ठेवून विवाह नोंदणी कार्यालयातही विवाह करता येतील. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हॉटेल, बँक्वेट हॉल, लॉन्स, मंगल कार्यालये अशा ठिकाणी बाहेरील अभ्यागतांना येण्यास पूर्णपणे मनाई असल्याने अशा ठिकाणी विवाह करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.  हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ - खाद्यगृह परवाना असलेले फूड जॉइंट्स, रस्त्याच्या कडेचे ढाबे तसेच यासारख्या ठिकाणी थांबून खाण्यास पूर्णतः बंदी करण्यात आली आहे. परंतु अशा खाद्यगृहांमधून पार्सल घेऊन जाण्यास परवानगी असेल.  - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापना शेतीशी क्षेत्राशी संबंधित असल्याने त्या सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु या ठिकाणी कोविड-१९ विषयक नियमांचे उल्लंघन झाल्यास अधिसूचना लागू असेपर्यंत संबंधित आस्थापना बंद करण्यात येतील.  - शासकीय कार्यालयांमध्ये जास्तीत जास्त ऑनलाइन व्यवस्थांचा वापर करण्यावर भर देण्यात यावा. अपरिहार्य परिस्थितीत एखाद्या अभ्यागतास शासकीय कार्यालयात यायचे असल्यास संबंधित अभ्यांगताचा आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह असणे किंवा त्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सोबत असणे अनिवार्य आहे. तसेच शासकीय कार्यालयांमधील अर्धन्यायिक कामकाजदेखील ऑनलाइन पद्धतीने चालविण्यात येईल.  - अत्यावश्यक सेवेतील वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक आणि खासगी वाहतूक व्यवस्था सुरू असल्याने वाहतूक क्षेत्राशी निगडित टायर विक्री, रिपेअर वर्कशॉप, सर्व्हिस सेंटर, स्पेअरपार्ट विक्री आस्थापना सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या आस्थापना सुरू ठेवण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्याची परवानगी आवश्यक असणे अनिवार्य आहे. परंतु वॉशिंग सेंटर, डेकोर यांसारखीच शॉप व केंद्रे बंद राहतील.  - पावसाळी पूर्व आणि पूर्वहंगामी शेती क्षेत्रातील कामे सुरू ठेवणे आवश्यक असल्यामुळे शेतीनिविष्ठा, अवजारे आणि पूरक व्यवसायांच्या आस्थापना रोज सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत सुरू असतील.   हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश ब्रेक द चेन’च्या अनुषंगाने जिल्ह्यात बंदचे नवे आदेश  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, पोलिस उपायुक्त संजय बारकुंडे आदी उपस्थित होते. बैठकीनंतर कोणताही विभाग आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पूर्वपरवानगीशिवाय आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील कोणतेही आदेश काढणार नाही, असे ठरले. या पार्श्‍वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वगळता अन्य विभागांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी यापूर्वी पारित केलेले आदेश रद्द करून तसेच स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन सुधारित आदेश काढण्याचे स्वातंत्र्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास दिल्याची बाब विचारात घेऊन पुढीलप्रमाणे सर्वंकष आदेश पारित करण्यात आले.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, April 8, 2021

ब्रेक द चेन’च्या अनुषंगाने जिल्ह्यात बंदचे नवे आदेश! जिल्हाधिकारींची माहिती  ब्रेक द चेन’च्या अनुषंगाने जिल्ह्यात बंदचे नवे आदेश  जिल्हाधिकारी सूरज मांढरे : ३० एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत निर्बंध  नाशिक : ‘ब्रेक द चेन’च्या अनुषंगाने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुख्य सचिव यांनी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून दिलेल्या सूचनांनंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत सद्यःस्थितीत जिल्ह्यात काय सुरू असेल, नसेल याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सुधारित आदेश जारी केले आहेत.  असे आहेत सुधारित आदेश  - ‘ब्रेक द चेन’ या राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने हॉस्पिटल, रोगनिदान केंद्र, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालय, फार्मसी, औषधनिर्माण करणाऱ्या कंपन्या, सर्जिकल साहित्य आणि चष्मानिर्मिती करणाऱ्या आस्थापना सुरू राहतील. या आस्थापनांवर कोणत्याही वेळेचे बंधन असणार नाही.  - जीवनावश्यक बाबींच्या दुकानांकडून कोविड मार्गदर्शक नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास अशा आस्थापना कोविड अधिसूचना लागू असेपर्यंत बंद करण्यात येतील.  - लग्न समारंभाच्याबाबतीत स्थानिक पोलिस ठाण्याच्या पूर्वपरवानगीने मर्यादित संख्येच्या प्रमाणात फक्त खासगी जागांमध्ये लग्न समारंभ करता येतील. त्याचप्रमाणे किमान उपस्थिती ठेवून विवाह नोंदणी कार्यालयातही विवाह करता येतील. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हॉटेल, बँक्वेट हॉल, लॉन्स, मंगल कार्यालये अशा ठिकाणी बाहेरील अभ्यागतांना येण्यास पूर्णपणे मनाई असल्याने अशा ठिकाणी विवाह करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.  हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ - खाद्यगृह परवाना असलेले फूड जॉइंट्स, रस्त्याच्या कडेचे ढाबे तसेच यासारख्या ठिकाणी थांबून खाण्यास पूर्णतः बंदी करण्यात आली आहे. परंतु अशा खाद्यगृहांमधून पार्सल घेऊन जाण्यास परवानगी असेल.  - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापना शेतीशी क्षेत्राशी संबंधित असल्याने त्या सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु या ठिकाणी कोविड-१९ विषयक नियमांचे उल्लंघन झाल्यास अधिसूचना लागू असेपर्यंत संबंधित आस्थापना बंद करण्यात येतील.  - शासकीय कार्यालयांमध्ये जास्तीत जास्त ऑनलाइन व्यवस्थांचा वापर करण्यावर भर देण्यात यावा. अपरिहार्य परिस्थितीत एखाद्या अभ्यागतास शासकीय कार्यालयात यायचे असल्यास संबंधित अभ्यांगताचा आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह असणे किंवा त्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सोबत असणे अनिवार्य आहे. तसेच शासकीय कार्यालयांमधील अर्धन्यायिक कामकाजदेखील ऑनलाइन पद्धतीने चालविण्यात येईल.  - अत्यावश्यक सेवेतील वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक आणि खासगी वाहतूक व्यवस्था सुरू असल्याने वाहतूक क्षेत्राशी निगडित टायर विक्री, रिपेअर वर्कशॉप, सर्व्हिस सेंटर, स्पेअरपार्ट विक्री आस्थापना सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या आस्थापना सुरू ठेवण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्याची परवानगी आवश्यक असणे अनिवार्य आहे. परंतु वॉशिंग सेंटर, डेकोर यांसारखीच शॉप व केंद्रे बंद राहतील.  - पावसाळी पूर्व आणि पूर्वहंगामी शेती क्षेत्रातील कामे सुरू ठेवणे आवश्यक असल्यामुळे शेतीनिविष्ठा, अवजारे आणि पूरक व्यवसायांच्या आस्थापना रोज सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत सुरू असतील.   हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश ब्रेक द चेन’च्या अनुषंगाने जिल्ह्यात बंदचे नवे आदेश  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, पोलिस उपायुक्त संजय बारकुंडे आदी उपस्थित होते. बैठकीनंतर कोणताही विभाग आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पूर्वपरवानगीशिवाय आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील कोणतेही आदेश काढणार नाही, असे ठरले. या पार्श्‍वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वगळता अन्य विभागांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी यापूर्वी पारित केलेले आदेश रद्द करून तसेच स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन सुधारित आदेश काढण्याचे स्वातंत्र्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास दिल्याची बाब विचारात घेऊन पुढीलप्रमाणे सर्वंकष आदेश पारित करण्यात आले.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3s0rRkv

No comments:

Post a Comment