पेट्रोलपंपावरील मोदींचे होर्डिंग्ज हटवा; निवडणूक आयोगाच्या सूचना नवी दिल्ली : पेट्रोल पंपावरील ज्या जाहिरातींमध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांसंदर्भातील होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत. या सर्व होर्डिंग्जमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरण्यात आले असल्याने हे सर्व होर्डिंग्ज काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. पेट्रोल पंपावरील सर्व होर्डिंग्जमध्ये पंतप्रधान मोदींचा फोटो वापरण्यात आला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे अशा सर्व प्रकारचे होर्डिंग्ज ७२ तासांत काढावेत, अशा सूचना भारतीय निवडणूक आयोगाने पेट्रोल पंप चालकांना दिले आहेत.  - तमिळनाडूत राजकीय भूकंप; शशिकलांचा राजकीय संन्यास!​ नुकतेच १ मार्चला पंतप्रधान मोदींनी दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यावेळी आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे मोदींवर टीका होत आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्यांना जे प्रमाणपत्र देण्यात येते, त्यावरही मोदींचा फोटो वापरण्यात आला आहे, त्यामुळे ते लवकरात लवकर हटवावे, अशी मागणी तृणमूल काँग्रेस (TMC)ने केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. सरकारी यंत्रणेचा जबरदस्त गैरवापर पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकार करत असल्याचा आरोप ममता सरकारमधील मंत्री फरहाद हकीम यांनी केला आहे. याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे.  - बुमराह महाराष्ट्राचा जावई होणार की साउथचा? सोशल मीडियात चर्चांना उधाण​ तृणमूलचा आक्षेप त्यानंतर तृणमूलच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाचे लक्ष पेट्रोल पंपांवरील होर्डिंग्जकडे वळवले. जवळपास सर्वच पेट्रोल पंपांवर केंद्र सरकारच्या योजनांच्या जाहिरातीचे होर्डिंग्ज उभारण्यात आलेले आहेत. त्यामुळेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात येताच निवडणूक आयोगाने या प्रकरणी हस्तक्षेप केला.  महत्त्वाची गोष्ट म्हणजे पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या केंद्र शासित प्रदेशात विधानसभा निवडणुका होत आहेत. याचा फायदा घेत भाजप छुप्या पद्धतीने प्रचार करत आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. तर हे सर्व आरोप निराधार असल्याचे पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटले आहे. जर निवडणुकांच्या घोषणेपूर्वी केंद्र सरकारने एखादी योजना राबवली असेल, तर त्याबाबत आक्षेप घेता येणार नाही, असं घोष यांचं म्हणणं आहे.  - जगावर घोंघावतंय आणखी एक मोठं संकट; 5 कोटी लोकांचा गेला होता जीव​ नेटकऱ्यांचा तृणमूल नेत्यांना पाठिंबा तर निवडणूक आयोगाला चिमटा तृणमूलच्या नेत्यांनी आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आणल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. तसेच पेट्रोल-डिझेल या इंधनांच्या दरांनी शंभरी गाठल्याने पंतप्रधान मोदींनीच पेट्रोल पंपावरील होर्डिंग्ज काढण्याचे निर्देश दिले असतील, असे म्हणत निवडणूक आयोगाला चिमटा काढला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून मोदी सरकारवर लोकांचा रोष वाढत चालला आहे. - देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 3, 2021

पेट्रोलपंपावरील मोदींचे होर्डिंग्ज हटवा; निवडणूक आयोगाच्या सूचना नवी दिल्ली : पेट्रोल पंपावरील ज्या जाहिरातींमध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांसंदर्भातील होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत. या सर्व होर्डिंग्जमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरण्यात आले असल्याने हे सर्व होर्डिंग्ज काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. पेट्रोल पंपावरील सर्व होर्डिंग्जमध्ये पंतप्रधान मोदींचा फोटो वापरण्यात आला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे अशा सर्व प्रकारचे होर्डिंग्ज ७२ तासांत काढावेत, अशा सूचना भारतीय निवडणूक आयोगाने पेट्रोल पंप चालकांना दिले आहेत.  - तमिळनाडूत राजकीय भूकंप; शशिकलांचा राजकीय संन्यास!​ नुकतेच १ मार्चला पंतप्रधान मोदींनी दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यावेळी आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे मोदींवर टीका होत आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्यांना जे प्रमाणपत्र देण्यात येते, त्यावरही मोदींचा फोटो वापरण्यात आला आहे, त्यामुळे ते लवकरात लवकर हटवावे, अशी मागणी तृणमूल काँग्रेस (TMC)ने केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. सरकारी यंत्रणेचा जबरदस्त गैरवापर पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकार करत असल्याचा आरोप ममता सरकारमधील मंत्री फरहाद हकीम यांनी केला आहे. याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे.  - बुमराह महाराष्ट्राचा जावई होणार की साउथचा? सोशल मीडियात चर्चांना उधाण​ तृणमूलचा आक्षेप त्यानंतर तृणमूलच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाचे लक्ष पेट्रोल पंपांवरील होर्डिंग्जकडे वळवले. जवळपास सर्वच पेट्रोल पंपांवर केंद्र सरकारच्या योजनांच्या जाहिरातीचे होर्डिंग्ज उभारण्यात आलेले आहेत. त्यामुळेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात येताच निवडणूक आयोगाने या प्रकरणी हस्तक्षेप केला.  महत्त्वाची गोष्ट म्हणजे पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या केंद्र शासित प्रदेशात विधानसभा निवडणुका होत आहेत. याचा फायदा घेत भाजप छुप्या पद्धतीने प्रचार करत आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. तर हे सर्व आरोप निराधार असल्याचे पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटले आहे. जर निवडणुकांच्या घोषणेपूर्वी केंद्र सरकारने एखादी योजना राबवली असेल, तर त्याबाबत आक्षेप घेता येणार नाही, असं घोष यांचं म्हणणं आहे.  - जगावर घोंघावतंय आणखी एक मोठं संकट; 5 कोटी लोकांचा गेला होता जीव​ नेटकऱ्यांचा तृणमूल नेत्यांना पाठिंबा तर निवडणूक आयोगाला चिमटा तृणमूलच्या नेत्यांनी आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आणल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. तसेच पेट्रोल-डिझेल या इंधनांच्या दरांनी शंभरी गाठल्याने पंतप्रधान मोदींनीच पेट्रोल पंपावरील होर्डिंग्ज काढण्याचे निर्देश दिले असतील, असे म्हणत निवडणूक आयोगाला चिमटा काढला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून मोदी सरकारवर लोकांचा रोष वाढत चालला आहे. - देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2PwAaXY

No comments:

Post a Comment