उत्पन्नवाढीसाठी पंचसूत्री पुणे - कर आकारणी न झालेल्या मिळकतींचा शोध घेणे, थकबाकी वसुली, ॲमेनिटी स्पेसच्या जागा भाडेतत्वावर देणे, जाहिरातीचे हक्क देऊन त्या माध्यमातून उत्पन्न मिळणे, याच बरोबरच उत्पन्नातील गळती रोखणे, या पंचसूत्रीच्या वापरावर पुढील वर्षी भर देणार आहोत. या माध्यमातून पुढील वर्षी महापालिकेचे उत्पन्न नक्की आठ हजार कोटी रुपयांहून अधिक आकडा गाठेल, असा विश्‍वास स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सोमवारी व्यक्त केला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापालिकेचा पुढील वर्षीचा (२०२१-२२) सुमारे ८ हजार ३७० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प रासने यांनी सोमवारी सादर केला. कोरोनामुळे घटलेले उत्पन्नाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ७२० कोटी रुपयांनी वाढ केली. पुढील वर्षी अपेक्षित उत्पन्नाचा आकडा कसा गाठणार याबाबत शंका व्यक्त केली जात आहे, असे असताना रासने यांनी मात्र उप्तन्नाचा हा आकडा आपण गाठणारच असा दावा पत्रकारांशी बोलताना केला. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा रासने म्हणाले, ‘‘गेल्या वर्षी राबविण्यात आलेल्या अभय योजनेतून जवळपास पाचशे कोटी रुपयांनी मिळकत कराचे उत्पन्न वाढले. जवळपास दीड लाख मिळकतींकडे ही थकबाकी होती. ती आता दूर झाली. पुढील वर्षी त्यांच्याकडून नियमित कर भरणा सुरू झाल्यानंतर त्यातून उत्पन्न वाढ होईल. याशिवाय मिळकत कराबरोबरच पाणीपट्टी, केबल कंपन्या अशा प्रकाराची सुमारे चार ते साडेचार हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. ती प्रभावीपणे वसूल करण्यासाठी लवादाची नेमणूक करणे, यावर आपण भर देणार आहोत.’’ 1) ॲमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देणे 2) उद्याने, उड्डाणपूल, नदीवरील पुलावरील जाहिरातीचे हक्क देऊन उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न 3) शहरातील सहा मीटर रस्त्यांचे रुंदीकरण प्रस्तावित करून पुनर्विकासाला चालना देणे, त्यातून निधी उभा करणे 4) उद्योग-धंदे शहरात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या धर्तीवर त्यांना आकर्षित करण्यासाठी महापालिकेत स्वतंत्र कक्ष स्थापन करणार 5) शहरातील पायाभूत सुविधांसाठीचा निधी उभारण्याचे नियोजन Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 1, 2021

उत्पन्नवाढीसाठी पंचसूत्री पुणे - कर आकारणी न झालेल्या मिळकतींचा शोध घेणे, थकबाकी वसुली, ॲमेनिटी स्पेसच्या जागा भाडेतत्वावर देणे, जाहिरातीचे हक्क देऊन त्या माध्यमातून उत्पन्न मिळणे, याच बरोबरच उत्पन्नातील गळती रोखणे, या पंचसूत्रीच्या वापरावर पुढील वर्षी भर देणार आहोत. या माध्यमातून पुढील वर्षी महापालिकेचे उत्पन्न नक्की आठ हजार कोटी रुपयांहून अधिक आकडा गाठेल, असा विश्‍वास स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सोमवारी व्यक्त केला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापालिकेचा पुढील वर्षीचा (२०२१-२२) सुमारे ८ हजार ३७० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प रासने यांनी सोमवारी सादर केला. कोरोनामुळे घटलेले उत्पन्नाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ७२० कोटी रुपयांनी वाढ केली. पुढील वर्षी अपेक्षित उत्पन्नाचा आकडा कसा गाठणार याबाबत शंका व्यक्त केली जात आहे, असे असताना रासने यांनी मात्र उप्तन्नाचा हा आकडा आपण गाठणारच असा दावा पत्रकारांशी बोलताना केला. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा रासने म्हणाले, ‘‘गेल्या वर्षी राबविण्यात आलेल्या अभय योजनेतून जवळपास पाचशे कोटी रुपयांनी मिळकत कराचे उत्पन्न वाढले. जवळपास दीड लाख मिळकतींकडे ही थकबाकी होती. ती आता दूर झाली. पुढील वर्षी त्यांच्याकडून नियमित कर भरणा सुरू झाल्यानंतर त्यातून उत्पन्न वाढ होईल. याशिवाय मिळकत कराबरोबरच पाणीपट्टी, केबल कंपन्या अशा प्रकाराची सुमारे चार ते साडेचार हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. ती प्रभावीपणे वसूल करण्यासाठी लवादाची नेमणूक करणे, यावर आपण भर देणार आहोत.’’ 1) ॲमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देणे 2) उद्याने, उड्डाणपूल, नदीवरील पुलावरील जाहिरातीचे हक्क देऊन उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न 3) शहरातील सहा मीटर रस्त्यांचे रुंदीकरण प्रस्तावित करून पुनर्विकासाला चालना देणे, त्यातून निधी उभा करणे 4) उद्योग-धंदे शहरात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या धर्तीवर त्यांना आकर्षित करण्यासाठी महापालिकेत स्वतंत्र कक्ष स्थापन करणार 5) शहरातील पायाभूत सुविधांसाठीचा निधी उभारण्याचे नियोजन Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3kBRiH7

No comments:

Post a Comment