आज ठरणार ग्रामीणचे शिलेदार, मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज  अमरावती  ः ग्रामीण भागात राजकीय उलथापालथ घडवून आणणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (ता.18) होत असून उमेदवारांचे हार्टबीट चांगलेच वाढले आहे. मतमोजणीनंतर गावचे शिलेदार कोण? याचे उत्तर मिळणार आहे. मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून निकालानंतर कुठेही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा व्यापक बंदोबस्त लावण्यात आला आहे.  जिल्ह्यातील 537 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान आटोपले. सरासरी 75 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 4 हजार 397 जागांसाठी दहा हजारांवर उमेदवार मैदनात उतरले होते. आगामी जिल्हापरिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीची ही रंगीत तालीम समजली जाते. विशेष म्हणजे स्थानिक नेत्यांनीसुद्धा या निवडणुकीत जोर लावल्याने अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सविस्तर वाचा - घरी काम करणाऱ्या मजुरांनी स्लॅब टाकण्याची केली तयारी अन् तेवढ्यात आला धडकी भरवणारा आवाज   या ठिकाणी होणार मतमोजणी  अमरावती तालुक्‍याची विलासनगर येथील शासकीय धान्यगोदाम, अचलपूरची कल्याण मंडपम, चांदूरबाजार, दर्यापूर, चांदूररेल्वे, धामणगावरेल्वे, वरुड व अंजनगावसुर्जी तालुक्‍याची मतमोजणी संबंधित तहसील कार्यालयात होणार असून धारणीची मोजणी कुसूमकोट बू. येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात, चिखलदरा तालुक्‍याची मतमोजणी नगरपरिषद गेस्टहाउस, मोर्शीची मोजणी प्रशासकीय इमारतीचे सभागृह, भातकुलीची मोजणी चपराशीपुरास्थित महापालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र. 13 मध्ये होणार आहे.    बिनविरोध जागांचा प्रस्ताव आयोगाला  अमरावती, ता. 17 ः जिल्ह्यातील बिनविरोध झालेल्या 13 ग्रामपंचायती अंतर्गत 477 जागांवर निवडणूकच घेण्यात आली नाही. त्यामुळे या सर्व जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून येणार असले तरी त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची परवानगी लागणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींच्या संदर्भातील संपूर्ण अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला आहे. सोमवारी होणाऱ्या मतमोजणीनंतर बिनविरोध झालेल्या सदस्यांची नावेसुद्धा जाहीर केली जाणार आहेत. तूर्तास जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण तपशिलाचा अहवाल पाठविण्यात आला आहे.   संपादन : अतुल मांगे    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, January 17, 2021

आज ठरणार ग्रामीणचे शिलेदार, मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज  अमरावती  ः ग्रामीण भागात राजकीय उलथापालथ घडवून आणणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (ता.18) होत असून उमेदवारांचे हार्टबीट चांगलेच वाढले आहे. मतमोजणीनंतर गावचे शिलेदार कोण? याचे उत्तर मिळणार आहे. मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून निकालानंतर कुठेही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा व्यापक बंदोबस्त लावण्यात आला आहे.  जिल्ह्यातील 537 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान आटोपले. सरासरी 75 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 4 हजार 397 जागांसाठी दहा हजारांवर उमेदवार मैदनात उतरले होते. आगामी जिल्हापरिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीची ही रंगीत तालीम समजली जाते. विशेष म्हणजे स्थानिक नेत्यांनीसुद्धा या निवडणुकीत जोर लावल्याने अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सविस्तर वाचा - घरी काम करणाऱ्या मजुरांनी स्लॅब टाकण्याची केली तयारी अन् तेवढ्यात आला धडकी भरवणारा आवाज   या ठिकाणी होणार मतमोजणी  अमरावती तालुक्‍याची विलासनगर येथील शासकीय धान्यगोदाम, अचलपूरची कल्याण मंडपम, चांदूरबाजार, दर्यापूर, चांदूररेल्वे, धामणगावरेल्वे, वरुड व अंजनगावसुर्जी तालुक्‍याची मतमोजणी संबंधित तहसील कार्यालयात होणार असून धारणीची मोजणी कुसूमकोट बू. येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात, चिखलदरा तालुक्‍याची मतमोजणी नगरपरिषद गेस्टहाउस, मोर्शीची मोजणी प्रशासकीय इमारतीचे सभागृह, भातकुलीची मोजणी चपराशीपुरास्थित महापालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र. 13 मध्ये होणार आहे.    बिनविरोध जागांचा प्रस्ताव आयोगाला  अमरावती, ता. 17 ः जिल्ह्यातील बिनविरोध झालेल्या 13 ग्रामपंचायती अंतर्गत 477 जागांवर निवडणूकच घेण्यात आली नाही. त्यामुळे या सर्व जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून येणार असले तरी त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची परवानगी लागणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींच्या संदर्भातील संपूर्ण अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला आहे. सोमवारी होणाऱ्या मतमोजणीनंतर बिनविरोध झालेल्या सदस्यांची नावेसुद्धा जाहीर केली जाणार आहेत. तूर्तास जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण तपशिलाचा अहवाल पाठविण्यात आला आहे.   संपादन : अतुल मांगे    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/38V6PxH

No comments:

Post a Comment