भूयारी गटारासाठी निश्‍चितच मदत ः प्रभू सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहराचा विकास व्हावा, यासाठी येथील पालिकेत सत्ता नसतानाही खासदार निधीतून मोठा निधी दिला होता. त्यात कुठलेही राजकारण पाहिले नव्हते. त्यामुळे नगराध्यक्ष संजू परब यांनी मागणी केलेल्या भुयारी गटार योजनेकरिता केंद्राच्या माध्यमातून निश्‍चितच भरीव मदत करेन, अशी ग्वाही माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यांनी येथे दिली.  शहराच्या विकासासाठी शहरातील भुयारी गटार योजना राबविण्याकरिता 150 कोटी आवश्‍यक असून श्री. प्रभू यांनी केंद्राच्या माध्यमातून यासाठी मदत करावी, अशी मागणी नगराध्यक्ष परब यांनी करीत तसे निवेदन प्रभू यांना सादर केले. याबाबत बोलताना त्यांनी हे काम केंद्र स्तरावरून निधी देऊन पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणीपुरवठा समिती सभापती उदय नाईक, नगरसेवक राजू बेग, आनंद नेवगी, मनोज नाईक, उत्कर्षा सासोलकर, समृद्धी विरनोडकर, दिपाली भालेकर, शहर अध्यक्षा मोहीनी मडगांवकर, परिणीता वर्तक, केतन आजगांवकर, बंटी पुरोहित, संजू शिरोडकर आदी उपस्थित होते.  प्रभू म्हणाले, ""लॉकडाउन काळात सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम झाला तसेच रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर योजना अंमलात आणून समाजातील सर्व घटकांना मदत होईल, यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या काळात कधी नव्हते एवढे शेतातील उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांच्या हातात पूर्वीपेक्षा जास्त पैसा आला. ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारली. या कठीण काळात पाश्‍चिमात्य देशांतील व्यवस्था डबघाईला आली असताना मोदींनी केलेल्या योग्य नेतृत्वामुळे या वाईट काळावर मात करू शकलो.  केंद्राच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत  प्रभू म्हणाले, ""पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षांच्या कालावधीत सर्व घटकांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या. मोदींनी केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविलेल्या या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम पक्षातील लोकांबरोबरच विविध सामाजिक संघटनांनी केल्यास मोदींच्या स्वप्नातील उद्याचा भारत निर्माण करण्यास मदत होईल. सुवर्ण संधीचा फायदा घेत सर्वांनी एकत्रित रित्या काम करूया.''  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, January 3, 2021

भूयारी गटारासाठी निश्‍चितच मदत ः प्रभू सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहराचा विकास व्हावा, यासाठी येथील पालिकेत सत्ता नसतानाही खासदार निधीतून मोठा निधी दिला होता. त्यात कुठलेही राजकारण पाहिले नव्हते. त्यामुळे नगराध्यक्ष संजू परब यांनी मागणी केलेल्या भुयारी गटार योजनेकरिता केंद्राच्या माध्यमातून निश्‍चितच भरीव मदत करेन, अशी ग्वाही माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यांनी येथे दिली.  शहराच्या विकासासाठी शहरातील भुयारी गटार योजना राबविण्याकरिता 150 कोटी आवश्‍यक असून श्री. प्रभू यांनी केंद्राच्या माध्यमातून यासाठी मदत करावी, अशी मागणी नगराध्यक्ष परब यांनी करीत तसे निवेदन प्रभू यांना सादर केले. याबाबत बोलताना त्यांनी हे काम केंद्र स्तरावरून निधी देऊन पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणीपुरवठा समिती सभापती उदय नाईक, नगरसेवक राजू बेग, आनंद नेवगी, मनोज नाईक, उत्कर्षा सासोलकर, समृद्धी विरनोडकर, दिपाली भालेकर, शहर अध्यक्षा मोहीनी मडगांवकर, परिणीता वर्तक, केतन आजगांवकर, बंटी पुरोहित, संजू शिरोडकर आदी उपस्थित होते.  प्रभू म्हणाले, ""लॉकडाउन काळात सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम झाला तसेच रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर योजना अंमलात आणून समाजातील सर्व घटकांना मदत होईल, यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या काळात कधी नव्हते एवढे शेतातील उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांच्या हातात पूर्वीपेक्षा जास्त पैसा आला. ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारली. या कठीण काळात पाश्‍चिमात्य देशांतील व्यवस्था डबघाईला आली असताना मोदींनी केलेल्या योग्य नेतृत्वामुळे या वाईट काळावर मात करू शकलो.  केंद्राच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत  प्रभू म्हणाले, ""पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षांच्या कालावधीत सर्व घटकांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या. मोदींनी केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविलेल्या या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम पक्षातील लोकांबरोबरच विविध सामाजिक संघटनांनी केल्यास मोदींच्या स्वप्नातील उद्याचा भारत निर्माण करण्यास मदत होईल. सुवर्ण संधीचा फायदा घेत सर्वांनी एकत्रित रित्या काम करूया.''  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3nbYBFg

No comments:

Post a Comment