एशियाड बस प्रवाशांचा प्रवास होणार गारेगार; लांब मार्गावर शिवशाहीला प्राधान्य मुंबई  : राज्यात एशियाड (निमआराम) बस धावणाऱ्या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आता गारेगार होणार आहे. नादुरूस्त एशियाड बसचे प्रमाण वाढल्याने दोन हजार बसपैकी महामंडळाकडे सध्या फक्त 476 बस शिल्लक आहे. त्यामूळे लांब पल्यांच्या प्रवाशांना आरामदायक आणि वातानुकूलित प्रवास देण्याच्या दृष्टीने एशियाड बस मार्गावर वातानुकूलित शिवशाही चालवण्याचा विचार परिवहन मंत्र्यांकडून केला जात आहे.  मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा 1982 च्या एशियाड स्पर्धेतील खेळाडूंना त्यांच्या निवासस्थानापासून स्टेडियम पर्यंत ने-आण करण्यासाठी या एशियाड बसचा प्रथम वापर करण्यात आला होता. तत्कालीन राष्ट्रीय क्रीडा विभागाने त्याबाबत निर्णय घेतला होता. त्यामूळे एसटीच्या ताफ्यातील निम-आराम हा सेवा प्रकार एशियाड या नावाने प्रसिद्ध झाला. एैसपैस बैठक व्यवस्था, मोठमोठे खिडक्‍या, आकर्षक रंगसंगती व पुष बॅक आसने या वैशिष्ट्यामुळे आज देखील या सेवा प्रकाराला प्रवाशांची पहिली पसंती आहे.  मूळ साध्या बसच्या तिकीट पेक्षा सध्या 25 टक्के जादा तिकिट या बससाठी आकारले जाते. तर सध्या या निमआराम बसला हिरकणी असेही नाव देण्यात आले आहे. त्यानंतर 2016 मध्ये शिवशाही वातानुकूलित बस एसटीच्या ताफ्यात दाखल झाली. त्यामध्ये एसटीच्या 500; तर खासगी 500 शिवशाही एसटीच्या ताफ्यात आहे. त्यापैकी काही वातानुकूलित शिवाशाही या मार्गावर धावणार असल्याने या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास वातानुकूलित होणार आहे.  45 पैशांचा फरक  वातानुकूलित शिवशाहीचे भाडे प्रतिकीलोमीटर 10 पैसे; तर प्रति सहा किलोमीटर 45 पैसे जास्त आहे. त्यामूळे एशियाडच्या प्रवाशांना आता किफायतशीर भाड्यात शिवशाहीचा वातानुकूलित प्रवास करता येणार आहे.    एशियाडची सेवा कुठेही बंद करण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय नाही; मात्र नादुरूस्त बसचे प्रमाण वाढल्याने एशियाडच्या लांब पल्ल्याच्या मार्गावर वातानुकूलित शिवाशाहीच्या फेऱ्या सुरू केल्यास प्रवाशांना त्याच दरात वातानुकूलित प्रवास करता येणार आहे.  - शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ  Asiad bus passengers to travel to cool Preference to Shivshahi on long journeys -------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 30, 2020

एशियाड बस प्रवाशांचा प्रवास होणार गारेगार; लांब मार्गावर शिवशाहीला प्राधान्य मुंबई  : राज्यात एशियाड (निमआराम) बस धावणाऱ्या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आता गारेगार होणार आहे. नादुरूस्त एशियाड बसचे प्रमाण वाढल्याने दोन हजार बसपैकी महामंडळाकडे सध्या फक्त 476 बस शिल्लक आहे. त्यामूळे लांब पल्यांच्या प्रवाशांना आरामदायक आणि वातानुकूलित प्रवास देण्याच्या दृष्टीने एशियाड बस मार्गावर वातानुकूलित शिवशाही चालवण्याचा विचार परिवहन मंत्र्यांकडून केला जात आहे.  मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा 1982 च्या एशियाड स्पर्धेतील खेळाडूंना त्यांच्या निवासस्थानापासून स्टेडियम पर्यंत ने-आण करण्यासाठी या एशियाड बसचा प्रथम वापर करण्यात आला होता. तत्कालीन राष्ट्रीय क्रीडा विभागाने त्याबाबत निर्णय घेतला होता. त्यामूळे एसटीच्या ताफ्यातील निम-आराम हा सेवा प्रकार एशियाड या नावाने प्रसिद्ध झाला. एैसपैस बैठक व्यवस्था, मोठमोठे खिडक्‍या, आकर्षक रंगसंगती व पुष बॅक आसने या वैशिष्ट्यामुळे आज देखील या सेवा प्रकाराला प्रवाशांची पहिली पसंती आहे.  मूळ साध्या बसच्या तिकीट पेक्षा सध्या 25 टक्के जादा तिकिट या बससाठी आकारले जाते. तर सध्या या निमआराम बसला हिरकणी असेही नाव देण्यात आले आहे. त्यानंतर 2016 मध्ये शिवशाही वातानुकूलित बस एसटीच्या ताफ्यात दाखल झाली. त्यामध्ये एसटीच्या 500; तर खासगी 500 शिवशाही एसटीच्या ताफ्यात आहे. त्यापैकी काही वातानुकूलित शिवाशाही या मार्गावर धावणार असल्याने या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास वातानुकूलित होणार आहे.  45 पैशांचा फरक  वातानुकूलित शिवशाहीचे भाडे प्रतिकीलोमीटर 10 पैसे; तर प्रति सहा किलोमीटर 45 पैसे जास्त आहे. त्यामूळे एशियाडच्या प्रवाशांना आता किफायतशीर भाड्यात शिवशाहीचा वातानुकूलित प्रवास करता येणार आहे.    एशियाडची सेवा कुठेही बंद करण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय नाही; मात्र नादुरूस्त बसचे प्रमाण वाढल्याने एशियाडच्या लांब पल्ल्याच्या मार्गावर वातानुकूलित शिवाशाहीच्या फेऱ्या सुरू केल्यास प्रवाशांना त्याच दरात वातानुकूलित प्रवास करता येणार आहे.  - शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ  Asiad bus passengers to travel to cool Preference to Shivshahi on long journeys -------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/37XqlsO

No comments:

Post a Comment