योगी आदित्यनाथ आज मुंबई भेटीवर! उद्योगसमूहांशी चर्चा करणार मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या मुंबई भेटीवर येणार आहेत. उत्तर प्रदेशात औद्योगिक आणि व्यावसायिक गुंतवणूक वाढविण्यासाठी ते काही महत्त्वाच्या उद्योगसमूहांशी चर्चा करण्याची शक्‍यता आहे. याभेटीवरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. कॉंग्रेसने या भेटीवर आक्षेप घेत उद्योजक आणि बॉलीवूडमध्ये भीती निर्माण करण्यासाठी ही भेट असल्याचा आरोप केला आहे.  हेही वाचा - कलेला धर्माचा चष्मा लावणे योग्य नाही; नवाब मलिकांची टीका मुंबईतील बॉलीवूडला शह देण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी उभारण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. यासाठी जागाही निश्‍चित करण्यात आली आहे. यावरून दोन्ही राजकीय सरकारमध्ये शाब्दिक चकमकीही झाल्या आहेत. आता योगी आदित्यनाथ मुंबईत येणार आहेत. यावेळी उत्तर प्रदेशातील औद्योगिक गुंतवणुकीबाबत उद्योगसमूहांशी चर्चा करण्याची शक्‍यता आहे. नरिमन पॉईट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये ही भेट होणार आहे. या भेटीवर कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आक्षेप नोंदवला आहे. हेही वाचा - उल्हासनगरातील किन्नर मुख्य प्रवाहात! शिक्षणासाठी शैक्षणिक व सामाजिक संस्थांचा पुढाकार  उद्योजक आणि बॉलीवूड निर्मात्यांना धमकावण्याचा प्रयत्न या भेटीतून केला जाण्याची शक्‍यता आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यांचा हा कुटील डाव ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारने उद्योजक आणि बॉलीवूडच्या संरक्षणाची वेळीच दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. केंद्रीय तपास यंत्रणाच्या मदतीने महाराष्ट्रातील उद्योजक आणि बॉलीवूडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत, असा आरोपही सावंत यांनी केला आहे.  Yogi Adityanath to visit Mumbai today Discuss with industry groups ----------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, November 30, 2020

योगी आदित्यनाथ आज मुंबई भेटीवर! उद्योगसमूहांशी चर्चा करणार मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या मुंबई भेटीवर येणार आहेत. उत्तर प्रदेशात औद्योगिक आणि व्यावसायिक गुंतवणूक वाढविण्यासाठी ते काही महत्त्वाच्या उद्योगसमूहांशी चर्चा करण्याची शक्‍यता आहे. याभेटीवरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. कॉंग्रेसने या भेटीवर आक्षेप घेत उद्योजक आणि बॉलीवूडमध्ये भीती निर्माण करण्यासाठी ही भेट असल्याचा आरोप केला आहे.  हेही वाचा - कलेला धर्माचा चष्मा लावणे योग्य नाही; नवाब मलिकांची टीका मुंबईतील बॉलीवूडला शह देण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी उभारण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. यासाठी जागाही निश्‍चित करण्यात आली आहे. यावरून दोन्ही राजकीय सरकारमध्ये शाब्दिक चकमकीही झाल्या आहेत. आता योगी आदित्यनाथ मुंबईत येणार आहेत. यावेळी उत्तर प्रदेशातील औद्योगिक गुंतवणुकीबाबत उद्योगसमूहांशी चर्चा करण्याची शक्‍यता आहे. नरिमन पॉईट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये ही भेट होणार आहे. या भेटीवर कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आक्षेप नोंदवला आहे. हेही वाचा - उल्हासनगरातील किन्नर मुख्य प्रवाहात! शिक्षणासाठी शैक्षणिक व सामाजिक संस्थांचा पुढाकार  उद्योजक आणि बॉलीवूड निर्मात्यांना धमकावण्याचा प्रयत्न या भेटीतून केला जाण्याची शक्‍यता आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यांचा हा कुटील डाव ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारने उद्योजक आणि बॉलीवूडच्या संरक्षणाची वेळीच दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. केंद्रीय तपास यंत्रणाच्या मदतीने महाराष्ट्रातील उद्योजक आणि बॉलीवूडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत, असा आरोपही सावंत यांनी केला आहे.  Yogi Adityanath to visit Mumbai today Discuss with industry groups ----------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2JsAzaX

No comments:

Post a Comment