दिवाळीनंतर महाविद्यालयांची दारे उघडणार ? UGC च्या महत्त्वपूर्ण सूचना मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाने दिवाळीनंतर म्हणजे 16 नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू करण्याची सूचना केली आहे. पहिल्या टप्प्यात संशोधक, पदव्युत्तर पदवी आणि अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करावेत अशी सुचनाही आयोगाने केली असून याबाबतच्या मार्गदर्शक सुचना आयोगाने प्रसिद्ध केल्या आहेत. याचबरोबर महाविद्यालयात प्रवेश करण्यापूर्वी आरोग्य सेतू ऍप मोबाइलमध्ये असणे आवश्यक असणार आहे.  महत्त्वाची बातमी : केवळ 1000 रूपये मुद्रांक शुल्क आकारणार; CIDCO कडून सदनिकाधारकांना मोठी दिवाळी भेट मार्च महिन्यापासून बंद असलेली महाविद्यालये दिवाळीनंतर खुली करण्याची सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने केली आहे. जे विभाग कंटन्मेंट झोन नाहीत अशा विभागातील महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात यावे. कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थी संख्येच्या 50 टक्के विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश देण्यात यावेत असेही यात म्हटले आहे. मागील महिन्यात केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना तसेच विविध प्राधिकरणांना 15 ऑक्टोबरनंतर टप्प्याटप्प्याने पुन्हा सर्व सुरू करण्याबाबत सूचना केली होती, यानुसान अनुदान आयोगाने या मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत. महत्त्वाची बातमी : दिवाळीत फटाके फोडाल तर तुरुंगात जाल, मुंबईसह राज्यात निर्बंध येण्याची शक्यता महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी कॅम्पसचे निर्जुंतुकीकरण करणे आवश्यक असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थी, कर्मचारी यांना मास्क लावणे बंधनकारक असेल. महाविद्यालय सुरू झाले तरी विद्यार्थ्यांना स्वेच्छा उपस्थितीची परवानगी द्यावी असे आयोगाने स्पष्ट केले आहे. प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू झाले तरी विद्यापीठांनी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवावे असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे. जेथे शक्य आहे तेथे निवासी हॉस्टेल सुरू करण्यासही आयोगाने परवानगी दिली आहे. मात्र एका खोलीत एकाच विद्यार्थ्याला राहण्यास परवानगी देण्यात यावी असेही मार्गदर्शक सुचनेत सांगण्यात आले आहे. ( संपादन - सुमित बागुल ) university grant commission asks universities to open colleges after diwali News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, November 5, 2020

दिवाळीनंतर महाविद्यालयांची दारे उघडणार ? UGC च्या महत्त्वपूर्ण सूचना मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाने दिवाळीनंतर म्हणजे 16 नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू करण्याची सूचना केली आहे. पहिल्या टप्प्यात संशोधक, पदव्युत्तर पदवी आणि अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करावेत अशी सुचनाही आयोगाने केली असून याबाबतच्या मार्गदर्शक सुचना आयोगाने प्रसिद्ध केल्या आहेत. याचबरोबर महाविद्यालयात प्रवेश करण्यापूर्वी आरोग्य सेतू ऍप मोबाइलमध्ये असणे आवश्यक असणार आहे.  महत्त्वाची बातमी : केवळ 1000 रूपये मुद्रांक शुल्क आकारणार; CIDCO कडून सदनिकाधारकांना मोठी दिवाळी भेट मार्च महिन्यापासून बंद असलेली महाविद्यालये दिवाळीनंतर खुली करण्याची सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने केली आहे. जे विभाग कंटन्मेंट झोन नाहीत अशा विभागातील महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात यावे. कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थी संख्येच्या 50 टक्के विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश देण्यात यावेत असेही यात म्हटले आहे. मागील महिन्यात केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना तसेच विविध प्राधिकरणांना 15 ऑक्टोबरनंतर टप्प्याटप्प्याने पुन्हा सर्व सुरू करण्याबाबत सूचना केली होती, यानुसान अनुदान आयोगाने या मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत. महत्त्वाची बातमी : दिवाळीत फटाके फोडाल तर तुरुंगात जाल, मुंबईसह राज्यात निर्बंध येण्याची शक्यता महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी कॅम्पसचे निर्जुंतुकीकरण करणे आवश्यक असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थी, कर्मचारी यांना मास्क लावणे बंधनकारक असेल. महाविद्यालय सुरू झाले तरी विद्यार्थ्यांना स्वेच्छा उपस्थितीची परवानगी द्यावी असे आयोगाने स्पष्ट केले आहे. प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू झाले तरी विद्यापीठांनी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवावे असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे. जेथे शक्य आहे तेथे निवासी हॉस्टेल सुरू करण्यासही आयोगाने परवानगी दिली आहे. मात्र एका खोलीत एकाच विद्यार्थ्याला राहण्यास परवानगी देण्यात यावी असेही मार्गदर्शक सुचनेत सांगण्यात आले आहे. ( संपादन - सुमित बागुल ) university grant commission asks universities to open colleges after diwali News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2TWu6GW

No comments:

Post a Comment