सावंतवाडीतील केशवसुत कट्टा धोकादायक  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील प्रसिद्ध असलेला मोती तलावाच्या मध्यभागी असलेला केशवसुत कट्टा पालिका प्रशासनाने फलक लावून बंद केला आहे. स्ट्रक्‍चरल ऑडीटमध्ये हा कट्टा धोकादायक झाल्याचा अहवाल देण्यात आला होता. त्यानुसार त्या कट्ट्यावर असलेल्या तुतारीसह दोन्ही बाजूच्या रस्त्यावर धोकादायक असल्याचे फलक लावले आहेत; मात्र काही नागरिक जवळचा पर्यायी मार्ग असल्याने ये-जा करत आहेत.  येथील पालिका बैठकीत केशवसुत कट्ट्याच्या विषयावरून चर्चा झाली होती. यावेळी या कट्ट्याचे बांधकाम जुने असल्यामुळे ते नागरिकांच्या वापरासाठी धोकादायक असल्याचे घोषित करण्यात आले आहे. तलावाच्या मधोमध असल्याने जीर्ण बांधकाम मोती तलावात कोसळून हानी होऊ शकते, अशी शक्‍यता वर्तविली होती. त्यानुसार तुतारीच्या ठिकाणी येणाऱ्यांना ही जागा धोकादायक असल्याची सूचना देण्याच्या उद्देशाने त्याबाबतचे फलक तुतारीकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावर लावले आहेत.  ...तरीही वापर  सायंकाळच्या वेळी तसेच रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी नागरिक मन मोकळे करण्यासाठी त्याठिकाणी तेथील थंडगार परिसराचा आनंद लुटतात. येथे ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे आता नागरिकांना याचा आनंद लुटण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. पालिकेने हा कट्टा धोकादायक असा उल्लेख केला असला तरी त्याचा सध्या नागरिक वापर करताना दिसून येत आहेत.  ..तर मोठी परवड  दरम्यान, फलक लावल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी नागरिक, लहान मुले, वृद्ध यांची ये-जा सुरू आहे. मोती तलावाच्या मधोमध जाणारा मार्ग येथूनच जात असल्याने मोती तलावाला वळसा घालून जाणे अनेकांसाठी मुश्‍किल बनते. प्रशासनाने आता हा मार्ग कायमचाच बंद केला तर नागरिकांची मोठी परवड होणार आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, November 15, 2020

सावंतवाडीतील केशवसुत कट्टा धोकादायक  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील प्रसिद्ध असलेला मोती तलावाच्या मध्यभागी असलेला केशवसुत कट्टा पालिका प्रशासनाने फलक लावून बंद केला आहे. स्ट्रक्‍चरल ऑडीटमध्ये हा कट्टा धोकादायक झाल्याचा अहवाल देण्यात आला होता. त्यानुसार त्या कट्ट्यावर असलेल्या तुतारीसह दोन्ही बाजूच्या रस्त्यावर धोकादायक असल्याचे फलक लावले आहेत; मात्र काही नागरिक जवळचा पर्यायी मार्ग असल्याने ये-जा करत आहेत.  येथील पालिका बैठकीत केशवसुत कट्ट्याच्या विषयावरून चर्चा झाली होती. यावेळी या कट्ट्याचे बांधकाम जुने असल्यामुळे ते नागरिकांच्या वापरासाठी धोकादायक असल्याचे घोषित करण्यात आले आहे. तलावाच्या मधोमध असल्याने जीर्ण बांधकाम मोती तलावात कोसळून हानी होऊ शकते, अशी शक्‍यता वर्तविली होती. त्यानुसार तुतारीच्या ठिकाणी येणाऱ्यांना ही जागा धोकादायक असल्याची सूचना देण्याच्या उद्देशाने त्याबाबतचे फलक तुतारीकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावर लावले आहेत.  ...तरीही वापर  सायंकाळच्या वेळी तसेच रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी नागरिक मन मोकळे करण्यासाठी त्याठिकाणी तेथील थंडगार परिसराचा आनंद लुटतात. येथे ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे आता नागरिकांना याचा आनंद लुटण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. पालिकेने हा कट्टा धोकादायक असा उल्लेख केला असला तरी त्याचा सध्या नागरिक वापर करताना दिसून येत आहेत.  ..तर मोठी परवड  दरम्यान, फलक लावल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी नागरिक, लहान मुले, वृद्ध यांची ये-जा सुरू आहे. मोती तलावाच्या मधोमध जाणारा मार्ग येथूनच जात असल्याने मोती तलावाला वळसा घालून जाणे अनेकांसाठी मुश्‍किल बनते. प्रशासनाने आता हा मार्ग कायमचाच बंद केला तर नागरिकांची मोठी परवड होणार आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2UskLan

No comments:

Post a Comment