विशेष मुलांवर उपचारासाठी BMC स्वतंत्र केंद्र तयार करणार; भायखळ्यातील जागेत प्रकल्प  मुंबई : विशेष मुलांवर महापालिका स्वतंत्र केंद्र तयार करणार आहे. या केंद्रात विविध पद्धतीचे अत्याधुनिक उपचार करून त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यास मदत करणार आहे. लवकरच या उपचार केंद्राचे काम सुरू होणार आहे.  लॉकडाऊनमध्ये हवीशी अनलॉकनंतर नकोशी; बियरपाठोपाठ देशी-विदेशी मद्यविक्रीत घट विशेष मुलांची आजाराची लक्षणे वेळीच लक्षात आल्यास उपचार करून त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावू शकतो. मुंबईची लोकसंख्या विचारात घेता महापालिकेचे स्वतंत्र उपचार केंद्र असणे आवश्‍यक असते. त्यासाठी मुंबई महापालिकेने आरक्षणांतर्गत भायखळा येथील एका इमारतीत मिळालेल्या जागेत हे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे केंद्र तयार करण्यासाठी सात कोटी पाच लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या उपचार केंद्रात बालकांना ऍक्‍युप्रेशर, फिजिओथेरपी, स्पीचथेरपी तसेच इतर आवश्‍यक उपचार करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. हा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात येणार आहे.  चित्रपट निर्माता फिरोज नाडियादवाला यांच्या पत्नीला ड्रग्सप्रकरणी अटक; आणखी काही हायप्रोफाल ग्राहक रडावर समाजवादी पक्षाचे पालिकेतील गटनेते रईस शेख यांनी 2018 मध्ये मुंबई महापालिकेकडे अशा प्रकारचे केंद्र उभारण्याची मागणी केली होती. 5 ते 10 टक्के बालकांमध्ये जन्मजात मेंदूसंबंधी आजार तसेच काही व्यंग आढळतात. त्याचा मुलांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यासाठी मुंबईत अशाप्रकारच्या केंद्राची आवश्‍यकता होती. त्यामुळे सामान्य आणि गरजू कुटुंबातील मुलांनाही चांगले उपचार मिळून त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यास मदत होणार आहे, असे शेख यांनी सांगितले. महापालिकेने अर्थसंकल्पात तरतूद करून हे केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार लवकरच या केंद्राचे काम सुरू होणार आहे. या केंद्राचा आराखडा बालकांना खिळवून ठेवेल, असा आकर्षक बनवण्यात येणार आहे. प्रसिद्ध आर्किटेक्‍ट हफीज कंत्राटदार यांनी हा आराखडा मोफत बनवून दिला आहे.  'सर्वकाही केंद्रावर ढकलण्याची चाल कांजूर जमिनीबाबतही बनाव होईल'; दरेकर यांचा आरोप काय असेल उपचार केंद्रात?  शारीरीक आणि मेंदूच्या व्यंगामुळे बालकांना चालणे, बोलणे, कमी ऐकू येणे अशा समस्या निर्माण होतात. तसेच नाक-कान-घशाचेही आजार असतात. अशा मुलांवर वेळीच उपचार झाल्यास त्यांची व्यंग पूर्णतः अथवा काही मोठ्या प्रमाणात दूर करता येतात. या केंद्रात हाडांचे, शरीरातील विविध अवयवांचे व्यंग स्पीचथेरपीतून बोलणे सुधारणे असे उपचार होतील. त्याचबरोबर नाक-कान-घशाचेही उपचार होणार आहेत.  BMC will set up a separate center for the treatment of special children Project in Byculla space ------------------------------------------------------ ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, November 8, 2020

विशेष मुलांवर उपचारासाठी BMC स्वतंत्र केंद्र तयार करणार; भायखळ्यातील जागेत प्रकल्प  मुंबई : विशेष मुलांवर महापालिका स्वतंत्र केंद्र तयार करणार आहे. या केंद्रात विविध पद्धतीचे अत्याधुनिक उपचार करून त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यास मदत करणार आहे. लवकरच या उपचार केंद्राचे काम सुरू होणार आहे.  लॉकडाऊनमध्ये हवीशी अनलॉकनंतर नकोशी; बियरपाठोपाठ देशी-विदेशी मद्यविक्रीत घट विशेष मुलांची आजाराची लक्षणे वेळीच लक्षात आल्यास उपचार करून त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावू शकतो. मुंबईची लोकसंख्या विचारात घेता महापालिकेचे स्वतंत्र उपचार केंद्र असणे आवश्‍यक असते. त्यासाठी मुंबई महापालिकेने आरक्षणांतर्गत भायखळा येथील एका इमारतीत मिळालेल्या जागेत हे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे केंद्र तयार करण्यासाठी सात कोटी पाच लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या उपचार केंद्रात बालकांना ऍक्‍युप्रेशर, फिजिओथेरपी, स्पीचथेरपी तसेच इतर आवश्‍यक उपचार करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. हा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात येणार आहे.  चित्रपट निर्माता फिरोज नाडियादवाला यांच्या पत्नीला ड्रग्सप्रकरणी अटक; आणखी काही हायप्रोफाल ग्राहक रडावर समाजवादी पक्षाचे पालिकेतील गटनेते रईस शेख यांनी 2018 मध्ये मुंबई महापालिकेकडे अशा प्रकारचे केंद्र उभारण्याची मागणी केली होती. 5 ते 10 टक्के बालकांमध्ये जन्मजात मेंदूसंबंधी आजार तसेच काही व्यंग आढळतात. त्याचा मुलांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यासाठी मुंबईत अशाप्रकारच्या केंद्राची आवश्‍यकता होती. त्यामुळे सामान्य आणि गरजू कुटुंबातील मुलांनाही चांगले उपचार मिळून त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यास मदत होणार आहे, असे शेख यांनी सांगितले. महापालिकेने अर्थसंकल्पात तरतूद करून हे केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार लवकरच या केंद्राचे काम सुरू होणार आहे. या केंद्राचा आराखडा बालकांना खिळवून ठेवेल, असा आकर्षक बनवण्यात येणार आहे. प्रसिद्ध आर्किटेक्‍ट हफीज कंत्राटदार यांनी हा आराखडा मोफत बनवून दिला आहे.  'सर्वकाही केंद्रावर ढकलण्याची चाल कांजूर जमिनीबाबतही बनाव होईल'; दरेकर यांचा आरोप काय असेल उपचार केंद्रात?  शारीरीक आणि मेंदूच्या व्यंगामुळे बालकांना चालणे, बोलणे, कमी ऐकू येणे अशा समस्या निर्माण होतात. तसेच नाक-कान-घशाचेही आजार असतात. अशा मुलांवर वेळीच उपचार झाल्यास त्यांची व्यंग पूर्णतः अथवा काही मोठ्या प्रमाणात दूर करता येतात. या केंद्रात हाडांचे, शरीरातील विविध अवयवांचे व्यंग स्पीचथेरपीतून बोलणे सुधारणे असे उपचार होतील. त्याचबरोबर नाक-कान-घशाचेही उपचार होणार आहेत.  BMC will set up a separate center for the treatment of special children Project in Byculla space ------------------------------------------------------ ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3p9qNdU

No comments:

Post a Comment