कोरोनामुळे उमेदवारांचा डिजिटल प्रचारावर भर  मिरज : यंदा विधानपरिषदेच्या पदवीधर जागेसाठी पुणे विभागात तब्बल 62 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टी, महाविकास आघाडी, वंचित बहुजन, मनसे यासह अपक्ष 58 उमेदवार रिंगणात आहेत. यंदा जगभर भुतो न भविष्यतो अशाकोरोना संसर्गाची लाट निर्माण झाल्याने पदवीधर उमेदवारांनी डिजिटल प्रचार पद्धतीवर जोर दिला आहे. पदवीधर उमेदवारांच्या सोशल मीडिया प्लटफॉर्मने उमेदवारांपर्यंत पोहोचण्याठी वन-टू वन डिजिटल प्रचार मोहीम राबवली आहे. मतदार याद्या ऑनलाईन पाठवणे, कॉलिंग करणे, मॅसेज पाठवणे, फेसबुक, व्हॉटस्‌ऍपद्वारे मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. दिवसागणिक प्रत्येक उमेदवाराकडून मॅसेज पाठवणे सुरू असल्यामुळे दिवसभर मॅसेज बॉक्‍स फुल्ल झाला आहे.  फेसबुकवर सामाजिक कामांचा पाऊस पडत आहे. तर व्हॉटस्‌ऍपवर मतदान केंद्राच्या अनुक्रमांकासहित मतदारांपर्यंत पोहोचविण्याच्या कामांना गती आली आहे. तर अनेक उमेदवारांकडून कशा प्रकारे मतदान केले पाहिजे याची लघुचित्रफीत व्हॉटस्‌ऍप, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. मतदानासाठी अवघे चारदिवस शिल्लक राहिल्याने आणि पदवीधर मतदारसंघ हा सांगली, सातारा, पुणे कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्यांचा आणि 58 तालुक्‍यांचा असल्याने उमेदवारांनी स्वत:चे जिल्हे सांभाळत आणि धावपळ टाळत सोशल मीडियाद्वारे जोरदार प्रचार सुरू आहे.  तर शिक्षक आमदार जागेसाठी 35 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये मात्र जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षक वगळता माध्यमिक विद्यालय, सिनिअर महाविद्यालय आणि ज्युनिअर विद्यालयातील प्राध्यापकांना मतदानाची परवानगी असल्याने शिक्षक मतदानासाठी देखील ऑफलाईन आणि ऑनलाईन प्रचार सुरू आहे. शिवाय यंदा कोरोना संसर्गामुळे शाळांना सुटी असल्याने शिक्षक संघटनांकडून प्रत्येक जिल्ह्यात प्रचार बैठकांचे सत्र राबवले जात आहे. यंदा सुटीमुळे राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार व्हॉटस्‌ऍप ग्रुपनिहाय प्रचार प्रक्रिया राबवित आहेत. यामुळे यंदाची पदवीधर आणि शिक्षक आमदार निवडणूक ही डिजिटल प्रणालीचा उपयोग करून जलद गतीने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नव तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे.  मतदार सिल्प व्हॉटस्‌ऍपवर  यंदा प्रत्येक पक्षाने आणि अपक्ष उमेदवारांनी मतदारांना जलद गतीने मतदान करता यावे यासाठी वैयक्तिक व्हॉटस्‌ऍपवर मतदाराचे नाव, मतदान केंद्राचे नाव, ठिकाणी अनुक्रमांक, आदी क्रमांक आणि मतदानाची वेळी या सर्व गोष्टी मॅसेजद्वारे व्हॉटस्‌ऍप आणि टेक्‍समॅसेजवर मतदारांना पाठविल्या जात आहेत.   संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, November 27, 2020

कोरोनामुळे उमेदवारांचा डिजिटल प्रचारावर भर  मिरज : यंदा विधानपरिषदेच्या पदवीधर जागेसाठी पुणे विभागात तब्बल 62 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टी, महाविकास आघाडी, वंचित बहुजन, मनसे यासह अपक्ष 58 उमेदवार रिंगणात आहेत. यंदा जगभर भुतो न भविष्यतो अशाकोरोना संसर्गाची लाट निर्माण झाल्याने पदवीधर उमेदवारांनी डिजिटल प्रचार पद्धतीवर जोर दिला आहे. पदवीधर उमेदवारांच्या सोशल मीडिया प्लटफॉर्मने उमेदवारांपर्यंत पोहोचण्याठी वन-टू वन डिजिटल प्रचार मोहीम राबवली आहे. मतदार याद्या ऑनलाईन पाठवणे, कॉलिंग करणे, मॅसेज पाठवणे, फेसबुक, व्हॉटस्‌ऍपद्वारे मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. दिवसागणिक प्रत्येक उमेदवाराकडून मॅसेज पाठवणे सुरू असल्यामुळे दिवसभर मॅसेज बॉक्‍स फुल्ल झाला आहे.  फेसबुकवर सामाजिक कामांचा पाऊस पडत आहे. तर व्हॉटस्‌ऍपवर मतदान केंद्राच्या अनुक्रमांकासहित मतदारांपर्यंत पोहोचविण्याच्या कामांना गती आली आहे. तर अनेक उमेदवारांकडून कशा प्रकारे मतदान केले पाहिजे याची लघुचित्रफीत व्हॉटस्‌ऍप, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. मतदानासाठी अवघे चारदिवस शिल्लक राहिल्याने आणि पदवीधर मतदारसंघ हा सांगली, सातारा, पुणे कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्यांचा आणि 58 तालुक्‍यांचा असल्याने उमेदवारांनी स्वत:चे जिल्हे सांभाळत आणि धावपळ टाळत सोशल मीडियाद्वारे जोरदार प्रचार सुरू आहे.  तर शिक्षक आमदार जागेसाठी 35 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये मात्र जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षक वगळता माध्यमिक विद्यालय, सिनिअर महाविद्यालय आणि ज्युनिअर विद्यालयातील प्राध्यापकांना मतदानाची परवानगी असल्याने शिक्षक मतदानासाठी देखील ऑफलाईन आणि ऑनलाईन प्रचार सुरू आहे. शिवाय यंदा कोरोना संसर्गामुळे शाळांना सुटी असल्याने शिक्षक संघटनांकडून प्रत्येक जिल्ह्यात प्रचार बैठकांचे सत्र राबवले जात आहे. यंदा सुटीमुळे राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार व्हॉटस्‌ऍप ग्रुपनिहाय प्रचार प्रक्रिया राबवित आहेत. यामुळे यंदाची पदवीधर आणि शिक्षक आमदार निवडणूक ही डिजिटल प्रणालीचा उपयोग करून जलद गतीने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नव तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे.  मतदार सिल्प व्हॉटस्‌ऍपवर  यंदा प्रत्येक पक्षाने आणि अपक्ष उमेदवारांनी मतदारांना जलद गतीने मतदान करता यावे यासाठी वैयक्तिक व्हॉटस्‌ऍपवर मतदाराचे नाव, मतदान केंद्राचे नाव, ठिकाणी अनुक्रमांक, आदी क्रमांक आणि मतदानाची वेळी या सर्व गोष्टी मॅसेजद्वारे व्हॉटस्‌ऍप आणि टेक्‍समॅसेजवर मतदारांना पाठविल्या जात आहेत.   संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3fGc7ij

No comments:

Post a Comment