मुंबईतील मल्टीप्लेक्सवर रंगभूमी कर वाढवण्याचा निर्णय; प्रत्येक शोसाठी हजार रुपयांचा भुर्दंड मुंबई : महापालिकेने मल्टिप्लेक्‍सकडून रंगभूमी कर आकारण्याच्या पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत सर्व स्क्रीन मिळून एका शोसाठी 60 रुपये कर भरावा लागत होता. तो आता प्रत्येक पडद्यावरील प्रत्येक शोसाठी एक हजार रुपये भरावे लागणार आहेत. तसा प्रस्ताव प्रशासन बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडला जाणार आहे.  अंधेरी-घाटकोपर जंक्‍शनवरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला; मुंबईहून ठाण्याला वेगात पोचता येणार बंदिस्त जागेत अथवा खुल्या मैदानात होणाऱ्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीत उत्सव, करमणुकीचे तसेच इतर कार्यक्रमांचा करही 33 रुपयांवरून 10 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. करमणूक क्षेत्राकडून करात सूट देण्याची मागणी होत असताना पालिका प्रशासनाने करवाढीचा प्रस्ताव मांडला आहे.  मराठी आणि गुजराती नाटकांना महापालिकेकडून करमणूक कर वसूल केला जात नाही. मल्टिप्लेक्‍सबरोबरच सर्व प्रकारच्या चित्रपटगृहांचे, नाटक जलसा आणि करमणुकीच्या इतर कार्यक्रमाचे तसेच सर्कस, आनंद मेळा यांच्या शुल्कातही पाच ते सहा पट वाढ करण्याचे प्रस्तावित आहे. मल्टिप्लेक्‍समध्ये ए काच इमारतीत अनेक पडदे असतात. एकाच वेळी चित्रपटांचे अनेक शो सुरू असतात. त्यामुळे प्रत्येक पडद्यावरील प्रत्येक शोसाठी एक हजार रुपये कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटगृहांमध्ये तिकीट हे 200 रुपयांपासून 1550 रुपयांपर्यंत असते. त्यामुळे ही करवाढ केल्याचे पालिकेने प्रस्तावात नमूद केले आहे. कोव्हिडनंतर येत्या काही दिवसांत चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरू होणार आहेत. त्यांना आता वाढीव कर द्यावा लागणार आहे.  अंगावरचे दूध पिणाऱ्या बाळाचा ताबा आईकडेच; वडिलांचा दावा सत्र न्यायालयात नामंजूर  2015 चा प्रस्ताव प्रलंबित  2015 मध्ये महापालिकेने मल्टिप्लेक्‍ससाठी स्वतंत्र श्रेणी तयार करून प्रत्येक पडद्यावरील प्रत्येक शोसाठी 66 रुपये कर आकारण्याचा निर्णय घेतला होता. हा प्रस्ताव महापालिकेत मंजूर झाल्यानंतर राज्य सरकारकडे पाठविला होता; मात्र राज्य सरकारकडून अद्याप या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही. त्यातच आता प्रशासनाने सुधारित कर प्रस्तावित केला आहे Decision to increase multiplex theater tax in Mumbai A thousand rupees for each show  ----------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, November 9, 2020

मुंबईतील मल्टीप्लेक्सवर रंगभूमी कर वाढवण्याचा निर्णय; प्रत्येक शोसाठी हजार रुपयांचा भुर्दंड मुंबई : महापालिकेने मल्टिप्लेक्‍सकडून रंगभूमी कर आकारण्याच्या पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत सर्व स्क्रीन मिळून एका शोसाठी 60 रुपये कर भरावा लागत होता. तो आता प्रत्येक पडद्यावरील प्रत्येक शोसाठी एक हजार रुपये भरावे लागणार आहेत. तसा प्रस्ताव प्रशासन बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडला जाणार आहे.  अंधेरी-घाटकोपर जंक्‍शनवरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला; मुंबईहून ठाण्याला वेगात पोचता येणार बंदिस्त जागेत अथवा खुल्या मैदानात होणाऱ्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीत उत्सव, करमणुकीचे तसेच इतर कार्यक्रमांचा करही 33 रुपयांवरून 10 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. करमणूक क्षेत्राकडून करात सूट देण्याची मागणी होत असताना पालिका प्रशासनाने करवाढीचा प्रस्ताव मांडला आहे.  मराठी आणि गुजराती नाटकांना महापालिकेकडून करमणूक कर वसूल केला जात नाही. मल्टिप्लेक्‍सबरोबरच सर्व प्रकारच्या चित्रपटगृहांचे, नाटक जलसा आणि करमणुकीच्या इतर कार्यक्रमाचे तसेच सर्कस, आनंद मेळा यांच्या शुल्कातही पाच ते सहा पट वाढ करण्याचे प्रस्तावित आहे. मल्टिप्लेक्‍समध्ये ए काच इमारतीत अनेक पडदे असतात. एकाच वेळी चित्रपटांचे अनेक शो सुरू असतात. त्यामुळे प्रत्येक पडद्यावरील प्रत्येक शोसाठी एक हजार रुपये कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटगृहांमध्ये तिकीट हे 200 रुपयांपासून 1550 रुपयांपर्यंत असते. त्यामुळे ही करवाढ केल्याचे पालिकेने प्रस्तावात नमूद केले आहे. कोव्हिडनंतर येत्या काही दिवसांत चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरू होणार आहेत. त्यांना आता वाढीव कर द्यावा लागणार आहे.  अंगावरचे दूध पिणाऱ्या बाळाचा ताबा आईकडेच; वडिलांचा दावा सत्र न्यायालयात नामंजूर  2015 चा प्रस्ताव प्रलंबित  2015 मध्ये महापालिकेने मल्टिप्लेक्‍ससाठी स्वतंत्र श्रेणी तयार करून प्रत्येक पडद्यावरील प्रत्येक शोसाठी 66 रुपये कर आकारण्याचा निर्णय घेतला होता. हा प्रस्ताव महापालिकेत मंजूर झाल्यानंतर राज्य सरकारकडे पाठविला होता; मात्र राज्य सरकारकडून अद्याप या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही. त्यातच आता प्रशासनाने सुधारित कर प्रस्तावित केला आहे Decision to increase multiplex theater tax in Mumbai A thousand rupees for each show  ----------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3pgGXlK

No comments:

Post a Comment