रंग सांगणार पीएमपीचे 217 मार्ग  पुणे - महापालिका- भोसरी मार्गावरील बस हवी, आता तपकीर रंगाचा बोर्ड पहा आणि प्रवास करा... हा रंग प्रवाशांना वेळापत्रक, पीएमपी केअर ऍपवरही दिसणार आहे. अशाच पद्धतीने शहरातील 207 मार्ग 15 रंगांमध्ये समाविष्ट केले आहेत. इतकेच नव्हे तर, बसमध्ये आणि चारही बाजूला लावलेल्या क्‍यू-आर कोडच्या माध्यमातून बसचे सुरुवातीचे ठिकाण, शेवटचा थांबा आणि त्या मार्गावरील सर्व थांब्यांची माहिती मोबाईलमध्ये मिळणार आहे.  पीएमपीचे बहुतेक मार्ग कलर कोडनुसार निश्‍चित केले आहेत. दिवाळीपासून 90 दिवसांत पीएमपीचे प्रमुख थांबे, स्थानके आणि आगारांत त्याची माहिती नकाशांद्वारे प्रवाशांना मिळणार आहे. त्यासाठी फलक लावण्याचे काम शुक्रवारपासून सुरू होणार आहे, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालक चेतना केरूरे, वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे आदी उपस्थित होते.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा कलर आणि क्‍यूआर कोडचा बसच्या मार्गांसाठी वापर करणारी पीएमपी ही देशातील एकमेव परिवहन संस्था आहे. लंडन मेट्रोच्या धर्तीवर कलर कोडिंग केले आहे, असेही त्यांनी सांगितले. करीस्मा (कलर कोडिंग ऑल रूटस टू आयडेंटीफाय सिंपलीफाय मॅप अँड ऍप) अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.  क्‍यूआरड कोड सांगणार माहिती  पीएमपी बसमध्ये आतील बाजूस दोन ठिकाणी तसेच बसच्या बाहेरील बाजूसही क्‍यू-आर कोड लावणार आहे. प्रवाशांनी त्यांच्या मोबाईलमधील स्कॅनरचा वापर करून क्‍यूआर कोड स्कॅन केल्यावर त्यांना बसचे सुरुवातीचे ठिकाण, शेवटचा थांबा आणि त्या मार्गावरील सर्व बस थांबे याचीही माहिती त्यांच्या मोबाईल फोनमध्ये मिळणार आहे. त्यात पीएमपीच्या टोल फ्री क्रमांकाचाही समावेश असेल. यापूर्वी पीएमपीच्या बसला फक्त मार्ग क्रमांक होता. परंतु, नव्या प्रवाशांना थांब्यांची माहिती मिळत नव्हती. आता त्यासाठी कलर कोडिंग आणि क्‍यूआर कोडचा वापर करणार आहे, अशी माहिती राजेंद्र जगताप यांनी दिली.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा रंगांचे स्टिकर्स लावणार  पुणे व पिंपरी चिंचवडमधील 2017 मार्गांना लाल, काळा, निळा, जांभळा, हिरवा, पारवा, गुलाबी, पोपटी, तपकिरी, आकाशी, पिवळा, शेवाळी, राखाडी, खाकी, मोरपंखी, केसरी, किरमिजी हे 15 रंग देण्यात आले आहेत. त्या-त्या रंगांचे स्टिकर्स बसवर लावणार आहेत. डिझाईन्सच्या अभ्यासक्रमांचे काही विद्यार्थी, लोगोसाठी एज क्रिएशन्सचे योगेश रिसवाडकर, नकाशांसाठी "सस्टेनॅब्लिटी इनिशेटीव्ह' आदींनी सहकार्य केल्याचे जगताप यांनी सांगितले.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा लोकलच्या धर्तीवर नकाशे  पीएमपीच्या प्रत्येक बसमध्ये लोकलच्या धर्तीवर पहिला व शेवटचा थांबा, एकूण बसथांबे आदींची माहिती देणारे फलक लावणार आहेत. एक महिन्यात हे काम पूर्ण होईल. त्यामुळे प्रवाशांना थांब्यांबद्दलची माहिती मिळेल. तसेच पीएमपी केअर ऍपमध्ये कलर कोडचे मार्ग, नकाशे आदींचीही माहिती असेल. त्यामुळे प्रवाशांना प्रवास सुलभपणे करता येईल, असे पीएमपीच्या सहव्यवस्थापक चेतना केरूरे यांनी सांगितले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, November 12, 2020

रंग सांगणार पीएमपीचे 217 मार्ग  पुणे - महापालिका- भोसरी मार्गावरील बस हवी, आता तपकीर रंगाचा बोर्ड पहा आणि प्रवास करा... हा रंग प्रवाशांना वेळापत्रक, पीएमपी केअर ऍपवरही दिसणार आहे. अशाच पद्धतीने शहरातील 207 मार्ग 15 रंगांमध्ये समाविष्ट केले आहेत. इतकेच नव्हे तर, बसमध्ये आणि चारही बाजूला लावलेल्या क्‍यू-आर कोडच्या माध्यमातून बसचे सुरुवातीचे ठिकाण, शेवटचा थांबा आणि त्या मार्गावरील सर्व थांब्यांची माहिती मोबाईलमध्ये मिळणार आहे.  पीएमपीचे बहुतेक मार्ग कलर कोडनुसार निश्‍चित केले आहेत. दिवाळीपासून 90 दिवसांत पीएमपीचे प्रमुख थांबे, स्थानके आणि आगारांत त्याची माहिती नकाशांद्वारे प्रवाशांना मिळणार आहे. त्यासाठी फलक लावण्याचे काम शुक्रवारपासून सुरू होणार आहे, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालक चेतना केरूरे, वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे आदी उपस्थित होते.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा कलर आणि क्‍यूआर कोडचा बसच्या मार्गांसाठी वापर करणारी पीएमपी ही देशातील एकमेव परिवहन संस्था आहे. लंडन मेट्रोच्या धर्तीवर कलर कोडिंग केले आहे, असेही त्यांनी सांगितले. करीस्मा (कलर कोडिंग ऑल रूटस टू आयडेंटीफाय सिंपलीफाय मॅप अँड ऍप) अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.  क्‍यूआरड कोड सांगणार माहिती  पीएमपी बसमध्ये आतील बाजूस दोन ठिकाणी तसेच बसच्या बाहेरील बाजूसही क्‍यू-आर कोड लावणार आहे. प्रवाशांनी त्यांच्या मोबाईलमधील स्कॅनरचा वापर करून क्‍यूआर कोड स्कॅन केल्यावर त्यांना बसचे सुरुवातीचे ठिकाण, शेवटचा थांबा आणि त्या मार्गावरील सर्व बस थांबे याचीही माहिती त्यांच्या मोबाईल फोनमध्ये मिळणार आहे. त्यात पीएमपीच्या टोल फ्री क्रमांकाचाही समावेश असेल. यापूर्वी पीएमपीच्या बसला फक्त मार्ग क्रमांक होता. परंतु, नव्या प्रवाशांना थांब्यांची माहिती मिळत नव्हती. आता त्यासाठी कलर कोडिंग आणि क्‍यूआर कोडचा वापर करणार आहे, अशी माहिती राजेंद्र जगताप यांनी दिली.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा रंगांचे स्टिकर्स लावणार  पुणे व पिंपरी चिंचवडमधील 2017 मार्गांना लाल, काळा, निळा, जांभळा, हिरवा, पारवा, गुलाबी, पोपटी, तपकिरी, आकाशी, पिवळा, शेवाळी, राखाडी, खाकी, मोरपंखी, केसरी, किरमिजी हे 15 रंग देण्यात आले आहेत. त्या-त्या रंगांचे स्टिकर्स बसवर लावणार आहेत. डिझाईन्सच्या अभ्यासक्रमांचे काही विद्यार्थी, लोगोसाठी एज क्रिएशन्सचे योगेश रिसवाडकर, नकाशांसाठी "सस्टेनॅब्लिटी इनिशेटीव्ह' आदींनी सहकार्य केल्याचे जगताप यांनी सांगितले.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा लोकलच्या धर्तीवर नकाशे  पीएमपीच्या प्रत्येक बसमध्ये लोकलच्या धर्तीवर पहिला व शेवटचा थांबा, एकूण बसथांबे आदींची माहिती देणारे फलक लावणार आहेत. एक महिन्यात हे काम पूर्ण होईल. त्यामुळे प्रवाशांना थांब्यांबद्दलची माहिती मिळेल. तसेच पीएमपी केअर ऍपमध्ये कलर कोडचे मार्ग, नकाशे आदींचीही माहिती असेल. त्यामुळे प्रवाशांना प्रवास सुलभपणे करता येईल, असे पीएमपीच्या सहव्यवस्थापक चेतना केरूरे यांनी सांगितले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/36A3iCB

No comments:

Post a Comment