‘डॉलर’चा चार मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित पुणे - डॉलर इंडस्ट्रीज या भारतातील वस्त्रप्रावरणांच्या क्षेत्रात अग्रेसर कंपनीने कोलकत्याजवळील तिरुपूर येथे ४ मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यन्वित केला आहे. हा प्रकल्प ‘डॉलर’च्या ‘ग्रीन मिशन’ या उपक्रमाचा भाग असून, या प्रकल्पातून दरवर्षी ७५ लाख युनिट निर्माण करण्याची क्षमता आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कंपनीचा प्रकल्प उभारण्यामागचा उद्देश केवळ खर्चात बचत नसून, तेथील हातमाग कारखाना शाश्वत व स्वयंपूर्ण करण्याचा आहे. यातून धागा बनविण्याचा खर्च कमी होईल, तसेच कार्बन डायऑक्साइडचे प्रतिदिन होणारे ९००० किलोचे उत्सर्जन रोखण्यात मदत झाल्याने पर्यावरणाची हानी रोखली जाईल. या उपक्रमाबद्दल बोलताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विनोदकुमार गुप्ता म्हणाले, ‘‘आम्ही कायमच पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यावर भर देतो. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात उत्पादनांची किंमत कमी करणे अनिवार्य असून, त्याचबरोबर पर्यावरणाचे रक्षणही महत्त्वाचे आहे. आम्ही हाच विचार करून शाश्वत विकासावर भर दिला आहे. पुणे-लोणावळा लोकल १२ ऑक्टोबरपासून होणार सुरू; प्रवासासाठी लागणार पोलिसांचा पास! उत्पादन प्रक्रियेत पाणी, ऊर्जा व नैसर्गिक स्रोतांचा योग्य वापर करण्यावर बारीक लक्ष ठेवण्यावर व कार्बन फुटप्रिंट कमी करून पृथीचे रक्षण करण्यावर आमचा भर आहे. शाश्‍वत ऊर्जेचा वापर आणि ग्राहकांसाठी दर्जेदार उत्पादने विकसित करणे या ‘डॉलर’च्या ध्येयानुसारच हा प्रकल्प काम करेल.’’ प्रकल्पाचे उद्‍घाटन करताना कंपनीचे संचालक व संस्थापक बजरंगकुमार गुप्ता म्हणाले, ‘‘आम्ही पर्यावरणपूरक उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा कायमच वापर केला आहे. सौर व पवन ऊर्जा प्रकल्प, सांडपाण्यावर प्रक्रिया व त्याचा पुनर्वापर करून आम्ही व्यवसाय करताना पर्यावरणाच्या रक्षणावर भर देतो. यातून आमच्या उत्पादनांची किंमत कमी होऊन नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतनही होते.’’ या प्रकल्पासाठी कंपनीतर्फे १८ कोटी रुपये गुंतवण्यात आले असून, ते पाच वर्षांत वसूल होण्याची अपेक्षा आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, October 5, 2020

‘डॉलर’चा चार मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित पुणे - डॉलर इंडस्ट्रीज या भारतातील वस्त्रप्रावरणांच्या क्षेत्रात अग्रेसर कंपनीने कोलकत्याजवळील तिरुपूर येथे ४ मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यन्वित केला आहे. हा प्रकल्प ‘डॉलर’च्या ‘ग्रीन मिशन’ या उपक्रमाचा भाग असून, या प्रकल्पातून दरवर्षी ७५ लाख युनिट निर्माण करण्याची क्षमता आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कंपनीचा प्रकल्प उभारण्यामागचा उद्देश केवळ खर्चात बचत नसून, तेथील हातमाग कारखाना शाश्वत व स्वयंपूर्ण करण्याचा आहे. यातून धागा बनविण्याचा खर्च कमी होईल, तसेच कार्बन डायऑक्साइडचे प्रतिदिन होणारे ९००० किलोचे उत्सर्जन रोखण्यात मदत झाल्याने पर्यावरणाची हानी रोखली जाईल. या उपक्रमाबद्दल बोलताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विनोदकुमार गुप्ता म्हणाले, ‘‘आम्ही कायमच पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यावर भर देतो. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात उत्पादनांची किंमत कमी करणे अनिवार्य असून, त्याचबरोबर पर्यावरणाचे रक्षणही महत्त्वाचे आहे. आम्ही हाच विचार करून शाश्वत विकासावर भर दिला आहे. पुणे-लोणावळा लोकल १२ ऑक्टोबरपासून होणार सुरू; प्रवासासाठी लागणार पोलिसांचा पास! उत्पादन प्रक्रियेत पाणी, ऊर्जा व नैसर्गिक स्रोतांचा योग्य वापर करण्यावर बारीक लक्ष ठेवण्यावर व कार्बन फुटप्रिंट कमी करून पृथीचे रक्षण करण्यावर आमचा भर आहे. शाश्‍वत ऊर्जेचा वापर आणि ग्राहकांसाठी दर्जेदार उत्पादने विकसित करणे या ‘डॉलर’च्या ध्येयानुसारच हा प्रकल्प काम करेल.’’ प्रकल्पाचे उद्‍घाटन करताना कंपनीचे संचालक व संस्थापक बजरंगकुमार गुप्ता म्हणाले, ‘‘आम्ही पर्यावरणपूरक उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा कायमच वापर केला आहे. सौर व पवन ऊर्जा प्रकल्प, सांडपाण्यावर प्रक्रिया व त्याचा पुनर्वापर करून आम्ही व्यवसाय करताना पर्यावरणाच्या रक्षणावर भर देतो. यातून आमच्या उत्पादनांची किंमत कमी होऊन नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतनही होते.’’ या प्रकल्पासाठी कंपनीतर्फे १८ कोटी रुपये गुंतवण्यात आले असून, ते पाच वर्षांत वसूल होण्याची अपेक्षा आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/33yt0qP

No comments:

Post a Comment