अतिरिक्त दूध खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्यांचा 'लॉस'; प्रतिलिटर दूधामागे बसतोय ५ रुपयांचा फटका! पुणे : मुळात आधीच लॉकडाऊनमुळं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं. त्याच्यातच हाटेलं बंद हाईत‌. यामुळं दुधाची मागणी घटली. याचाच फायदा उठवतं खासगी दूध संघांनीही नेहमीच्या तुलनेत कमी आणि तेही एकदम कमी भावानं शेतकऱ्यांकडून दूध खरेदी सुरू केली. याला आधार देण्यासाठी मायबाप सरकारनं अतिरिक्त दूध खरेदी करण्यास सुरुवात केली आणि शेतकऱ्यांना चार पैसं जास्त मिळू लागलं. पण हा आधार लई जास्त काळ मिळाला नाही. 'पुन्हा पहिलं पाढं पंचावन' म्हणत्यात तसं दुधाचा भाव लिटरमागं पाच रुपायांनी कमी झाला, असे पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी नाव न छापण्याच्या अटीवर सांगत होते. यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दररोज सरासरी सुमारे ७५ लाख रुपयांचे नुकसान होत आहे. कारण सरकारी नियमानुसार गाईच्या दुधाचा प्रतिलिटर दर किमान २५ रुपये आहे. सध्या प्रत्यक्षात सरासरी २० रुपये लिटरप्रमाणे दर मिळत आहे. - महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयामुळे शिवसेना पडली तोंडावर!​ पुणे जिल्ह्यात दररोज सुमारे २० लाख लिटर दूध विविध दूध संघ खरेदी करत असतात. यापैकी सहकारी दूध संघ २५ रुपये, तर खासगी दूध संघ २० रुपये लिटरनेच दूध खरेदी करत आहेत. एकूण दुधापैकी ५ लाख लिटर सहकारी आणि सुमारे १५ लाख लिटर खासगी दूध संघ खरेदी करत असतात. यामुळे सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळून रोज ७५ लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागत असल्याचेही या शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी अतिरिक्त दूध खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने एप्रिल महिन्यात घेतला होता‌. यानुसार १ एप्रिल ते ३१ जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत सरकारने हे अतिरिक्त दूध खरेदी केले. यामुळे शेतकऱ्यांना प्रतिलिटर २५ रुपये लिटर दर मिळत होता. मात्र, १ ऑगष्टपासून राज्य सरकारने अचानकपणे ही योजना बंद केली आणि पुन्हा दूधाचे दर कोसळले.  - Ganeshotsav 2020 : पुणेकरांनो, मानाच्या गणपतींच्या विसर्जनाच्या वेळा ठरल्या!​ सरकार पुन्हा अतिरिक्त दूध खरेदी करणार  दरम्यान, शेतकऱ्यांचे दूध दराअभावी होणारे नुकसान टाळण्यासाठी अतिरिक्त दूध खरेदी करण्याबाबतची योजना एक महिन्याच्या खंडानंतर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या १ सप्टेंबरपासून सुरू केली जाणार आहे. ही योजना दोन महिने कालावधीसाठी सुरू राहणार आहे. याबाबतचा अध्यादेश येत्या आठवडाभरात येईल, असे राज्याच्या दुग्धविकास विभागातून गुरूवारी (ता.२७) सांगण्यात आले.  सध्या दूध मार्केट हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. यामुळे लोणी (बटर) आणि पावडरचे दर वाढू लागले आहेत. यामुळे दूध खरेदीदरात लवकरच वाढ केली जाणार आहे. यानुसार ही वाढ येत्या १ सप्टेंबरपासून मिळू शकेल. - प्रकाश कुतवळ, सचिव, महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, August 27, 2020

अतिरिक्त दूध खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्यांचा 'लॉस'; प्रतिलिटर दूधामागे बसतोय ५ रुपयांचा फटका! पुणे : मुळात आधीच लॉकडाऊनमुळं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं. त्याच्यातच हाटेलं बंद हाईत‌. यामुळं दुधाची मागणी घटली. याचाच फायदा उठवतं खासगी दूध संघांनीही नेहमीच्या तुलनेत कमी आणि तेही एकदम कमी भावानं शेतकऱ्यांकडून दूध खरेदी सुरू केली. याला आधार देण्यासाठी मायबाप सरकारनं अतिरिक्त दूध खरेदी करण्यास सुरुवात केली आणि शेतकऱ्यांना चार पैसं जास्त मिळू लागलं. पण हा आधार लई जास्त काळ मिळाला नाही. 'पुन्हा पहिलं पाढं पंचावन' म्हणत्यात तसं दुधाचा भाव लिटरमागं पाच रुपायांनी कमी झाला, असे पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी नाव न छापण्याच्या अटीवर सांगत होते. यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दररोज सरासरी सुमारे ७५ लाख रुपयांचे नुकसान होत आहे. कारण सरकारी नियमानुसार गाईच्या दुधाचा प्रतिलिटर दर किमान २५ रुपये आहे. सध्या प्रत्यक्षात सरासरी २० रुपये लिटरप्रमाणे दर मिळत आहे. - महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयामुळे शिवसेना पडली तोंडावर!​ पुणे जिल्ह्यात दररोज सुमारे २० लाख लिटर दूध विविध दूध संघ खरेदी करत असतात. यापैकी सहकारी दूध संघ २५ रुपये, तर खासगी दूध संघ २० रुपये लिटरनेच दूध खरेदी करत आहेत. एकूण दुधापैकी ५ लाख लिटर सहकारी आणि सुमारे १५ लाख लिटर खासगी दूध संघ खरेदी करत असतात. यामुळे सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळून रोज ७५ लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागत असल्याचेही या शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी अतिरिक्त दूध खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने एप्रिल महिन्यात घेतला होता‌. यानुसार १ एप्रिल ते ३१ जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत सरकारने हे अतिरिक्त दूध खरेदी केले. यामुळे शेतकऱ्यांना प्रतिलिटर २५ रुपये लिटर दर मिळत होता. मात्र, १ ऑगष्टपासून राज्य सरकारने अचानकपणे ही योजना बंद केली आणि पुन्हा दूधाचे दर कोसळले.  - Ganeshotsav 2020 : पुणेकरांनो, मानाच्या गणपतींच्या विसर्जनाच्या वेळा ठरल्या!​ सरकार पुन्हा अतिरिक्त दूध खरेदी करणार  दरम्यान, शेतकऱ्यांचे दूध दराअभावी होणारे नुकसान टाळण्यासाठी अतिरिक्त दूध खरेदी करण्याबाबतची योजना एक महिन्याच्या खंडानंतर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या १ सप्टेंबरपासून सुरू केली जाणार आहे. ही योजना दोन महिने कालावधीसाठी सुरू राहणार आहे. याबाबतचा अध्यादेश येत्या आठवडाभरात येईल, असे राज्याच्या दुग्धविकास विभागातून गुरूवारी (ता.२७) सांगण्यात आले.  सध्या दूध मार्केट हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. यामुळे लोणी (बटर) आणि पावडरचे दर वाढू लागले आहेत. यामुळे दूध खरेदीदरात लवकरच वाढ केली जाणार आहे. यानुसार ही वाढ येत्या १ सप्टेंबरपासून मिळू शकेल. - प्रकाश कुतवळ, सचिव, महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3b0R47N

No comments:

Post a Comment