CET परिक्षेबाबत उच्च शिक्षण मंत्र्यांनी दिले महत्वाचे संकेत, म्हणाले... मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सुमारे सात लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एमएचटी सीईटी न घेताच प्रवेश देण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, आता प्रवेशपरीक्षा घेण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्यानुसार तालुकास्तरावर ही परिक्षा घेण्याबाबत विचार सुरू आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. मोठी बातमी : मुंबईकरांनो उद्याच्या पावसाबाबत आली महत्त्वाची माहिती, आधी वाचून घ्या राज्यातील अभियांत्रिकी, औषधी, कृषी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेशपरीक्षा घेतल्या जातात. त्या गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमांसंबंधी तब्बल तीन लाख जागांवर प्रवेश दिले जातात. मात्र, यंदा करोनाचे संकट तीव्र झाल्याने या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. याचदरम्यान, प्रवेशपरीक्षा न घेता प्रवेश देण्याबाबतची चर्चाही झाली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि विद्यार्थ्यांची प्रवेशपरीक्षेची मानसिकता लक्षात घेता ही परीक्षा घेणेच हिताचे ठरेल, असा निर्णय उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. आता ही परीक्षा नेमकी कशी घ्यायची याबाबत चर्चा सुरू आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय पातळीवरील ‘जेईई’ आणि ‘नीट’ या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या परीक्षा पार पडल्यानंतर राज्यातील प्रवेशपरीक्षा पार पडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.  मोठी बातमी : आली लहर, केला कहर! चोराने चोरलं महावितरण कार्यालयातील हजेरीपत्रक, कर्मचाऱ्यांना लागला शॉक लवकरच घोषणा परीक्षेबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल, असे उदय सामंत यांनी सांगितले आहे. या परीक्षांसाठी जिल्हा स्तरावर केंद्र देण्यात येतात. मात्र यंदाची करोनाची स्थिती लक्षात घेता तालुकास्तरावर केंद्र देण्यात येतील का? याबाबत विचार सुरू आहे. याचा अहवाल आल्यानंतर परीक्षेची घोषणा करण्यात येईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले. (संपादन : वैभव गाटे) Minister of Higher Education gave important information about the CET exam News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, August 28, 2020

CET परिक्षेबाबत उच्च शिक्षण मंत्र्यांनी दिले महत्वाचे संकेत, म्हणाले... मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सुमारे सात लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एमएचटी सीईटी न घेताच प्रवेश देण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, आता प्रवेशपरीक्षा घेण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्यानुसार तालुकास्तरावर ही परिक्षा घेण्याबाबत विचार सुरू आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. मोठी बातमी : मुंबईकरांनो उद्याच्या पावसाबाबत आली महत्त्वाची माहिती, आधी वाचून घ्या राज्यातील अभियांत्रिकी, औषधी, कृषी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेशपरीक्षा घेतल्या जातात. त्या गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमांसंबंधी तब्बल तीन लाख जागांवर प्रवेश दिले जातात. मात्र, यंदा करोनाचे संकट तीव्र झाल्याने या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. याचदरम्यान, प्रवेशपरीक्षा न घेता प्रवेश देण्याबाबतची चर्चाही झाली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि विद्यार्थ्यांची प्रवेशपरीक्षेची मानसिकता लक्षात घेता ही परीक्षा घेणेच हिताचे ठरेल, असा निर्णय उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. आता ही परीक्षा नेमकी कशी घ्यायची याबाबत चर्चा सुरू आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय पातळीवरील ‘जेईई’ आणि ‘नीट’ या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या परीक्षा पार पडल्यानंतर राज्यातील प्रवेशपरीक्षा पार पडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.  मोठी बातमी : आली लहर, केला कहर! चोराने चोरलं महावितरण कार्यालयातील हजेरीपत्रक, कर्मचाऱ्यांना लागला शॉक लवकरच घोषणा परीक्षेबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल, असे उदय सामंत यांनी सांगितले आहे. या परीक्षांसाठी जिल्हा स्तरावर केंद्र देण्यात येतात. मात्र यंदाची करोनाची स्थिती लक्षात घेता तालुकास्तरावर केंद्र देण्यात येतील का? याबाबत विचार सुरू आहे. याचा अहवाल आल्यानंतर परीक्षेची घोषणा करण्यात येईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले. (संपादन : वैभव गाटे) Minister of Higher Education gave important information about the CET exam News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/31DmRZi

No comments:

Post a Comment