शिरूरमधील डॉक्टरलाच कोरोना; अनेक रुग्ण संपर्कात शिरूर (पुणे) - शिरूर तालुक्यात आज कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी झाल्याचे चित्र असून, दिवसभरात सहाजणांचे कोरोना चे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. मात्र, शहरातील एका डॉक्टरलाच कोरोनाची बाधा झाल्याने व या डॉक्टरांच्या संपर्कात अनेक रूग्ण आल्याचा संशय असल्याने चिंतेचे ढग कायम आहेत. आजअखेर तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा ४६० झाला असून, त्याच्या बरोबर निम्मे म्हणजे २३० जण बरे झाले आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शिरूर शहरात कुंभार आळी परिसरात ४२ वर्षीय पुरूषाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून, रेव्हेन्यू कॉलनी परिसरातील एका ३८ वर्षीय वैद्यकीय व्यावसायिकाचा रिपोर्टही पॉझिटीव्ह आल्याने शहरात घबराट पसरली. त्याचबरोबरच सणसवाडी येथील दोघांचा आणि रांजणगाव गणपती व विठ्ठलवाडी येथील प्रत्येकी एकाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी दिली. Breaking : हॉटेल, लॉज, मॉल्सबाबत महापालिकेने घेतला महत्त्वाचा निर्णय; वाचा सविस्तर बातमी गेल्या काही दिवसांतली ही कोरोना बाधितांची कमी संख्या असली तरी एका डॉक्टरलाच बाधा झाल्याने आरोग्य खात्याची चिंता वाढली आहे.                    शिरूर तालुक्यात सणसवाडी येथे २८ मार्च ला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडला होता. त्यानंतर तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर येथून ख-या अर्थाने संसर्गाला सुरवात झाली. नंतरच्या टप्प्यात रांजणगाव एमआयडीसीतील विविध कंपन्यांमध्ये पुणे व पिंपरी चिंचवडच्या हॉटस्पॉट मधून येणा-या कामगारांमुळे प्रादूर्भाव वाढला होता.  पुण्यातील 'जम्बो हॉस्पिटल'चा श्रीगणेशा; १७ दिवसांत होणार हॉस्पिटलची उभारणी! दरम्यान, टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर पुणे व विशेषतः मुंबई हून गावाकडे आलेल्या पाहुण्यांमुळे कोरोनाने उठाव घेतला. या पाहुणे मंडळींमुळे जवळपास तीस गावांत संसर्ग पोचला. मात्र, त्यानंतरचे बाधित हे एकमेकांच्या संपर्कातून वाढत गेले. निश्काळजीपणा, खबरदारीचा अभाव, बेफिकीरीतून तालुक्यात प्रादूर्भाव वाढत गेला. त्यातून आत्तापर्यँत एकूण ४६० जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यातील निम्मे म्हणजे २३० जण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. आत्तापर्यंत कोरोनामुळे १९ जणांचा मृत्यु झाला असून, त्यातील केवळ एक महिला व एक पुरूष वगळता इतर सर्वजण साठीच्या पुढील व इतर आजार असणारे होते, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. शैक्षणिक धोरण २०२० : 'ऑनलाईन एज्युकेशन'साठी शिक्षण मंत्रालयात हालचाली! दरम्यान, शिरूर तालुक्यातील कोरोनाचा उगम, संसर्ग व प्रादूर्भाव विचारात घेता बरे होणाऱांची संख्या पन्नास टक्के असल्याचे आजवरच्या आकडेवारी वरून स्पष्ट झाले आहे. तर मृतांची संख्या पाच टक्के आहे. ग्रामीण भागातील जनतेत मूळातच असलेली प्रतिकार शक्ती यामुळे मृत्युचे प्रमाण कमी असल्याचा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने वर्तवला आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, August 3, 2020

शिरूरमधील डॉक्टरलाच कोरोना; अनेक रुग्ण संपर्कात शिरूर (पुणे) - शिरूर तालुक्यात आज कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी झाल्याचे चित्र असून, दिवसभरात सहाजणांचे कोरोना चे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. मात्र, शहरातील एका डॉक्टरलाच कोरोनाची बाधा झाल्याने व या डॉक्टरांच्या संपर्कात अनेक रूग्ण आल्याचा संशय असल्याने चिंतेचे ढग कायम आहेत. आजअखेर तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा ४६० झाला असून, त्याच्या बरोबर निम्मे म्हणजे २३० जण बरे झाले आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शिरूर शहरात कुंभार आळी परिसरात ४२ वर्षीय पुरूषाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून, रेव्हेन्यू कॉलनी परिसरातील एका ३८ वर्षीय वैद्यकीय व्यावसायिकाचा रिपोर्टही पॉझिटीव्ह आल्याने शहरात घबराट पसरली. त्याचबरोबरच सणसवाडी येथील दोघांचा आणि रांजणगाव गणपती व विठ्ठलवाडी येथील प्रत्येकी एकाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी दिली. Breaking : हॉटेल, लॉज, मॉल्सबाबत महापालिकेने घेतला महत्त्वाचा निर्णय; वाचा सविस्तर बातमी गेल्या काही दिवसांतली ही कोरोना बाधितांची कमी संख्या असली तरी एका डॉक्टरलाच बाधा झाल्याने आरोग्य खात्याची चिंता वाढली आहे.                    शिरूर तालुक्यात सणसवाडी येथे २८ मार्च ला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडला होता. त्यानंतर तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर येथून ख-या अर्थाने संसर्गाला सुरवात झाली. नंतरच्या टप्प्यात रांजणगाव एमआयडीसीतील विविध कंपन्यांमध्ये पुणे व पिंपरी चिंचवडच्या हॉटस्पॉट मधून येणा-या कामगारांमुळे प्रादूर्भाव वाढला होता.  पुण्यातील 'जम्बो हॉस्पिटल'चा श्रीगणेशा; १७ दिवसांत होणार हॉस्पिटलची उभारणी! दरम्यान, टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर पुणे व विशेषतः मुंबई हून गावाकडे आलेल्या पाहुण्यांमुळे कोरोनाने उठाव घेतला. या पाहुणे मंडळींमुळे जवळपास तीस गावांत संसर्ग पोचला. मात्र, त्यानंतरचे बाधित हे एकमेकांच्या संपर्कातून वाढत गेले. निश्काळजीपणा, खबरदारीचा अभाव, बेफिकीरीतून तालुक्यात प्रादूर्भाव वाढत गेला. त्यातून आत्तापर्यँत एकूण ४६० जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यातील निम्मे म्हणजे २३० जण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. आत्तापर्यंत कोरोनामुळे १९ जणांचा मृत्यु झाला असून, त्यातील केवळ एक महिला व एक पुरूष वगळता इतर सर्वजण साठीच्या पुढील व इतर आजार असणारे होते, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. शैक्षणिक धोरण २०२० : 'ऑनलाईन एज्युकेशन'साठी शिक्षण मंत्रालयात हालचाली! दरम्यान, शिरूर तालुक्यातील कोरोनाचा उगम, संसर्ग व प्रादूर्भाव विचारात घेता बरे होणाऱांची संख्या पन्नास टक्के असल्याचे आजवरच्या आकडेवारी वरून स्पष्ट झाले आहे. तर मृतांची संख्या पाच टक्के आहे. ग्रामीण भागातील जनतेत मूळातच असलेली प्रतिकार शक्ती यामुळे मृत्युचे प्रमाण कमी असल्याचा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने वर्तवला आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/39UWNv3

No comments:

Post a Comment