गणेशोत्सववाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस सज्ज, ATS देखील ठेवणार परिस्थितीवर नजर मुंबई : कोरोना संकट काळातही विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनासाठी गणेशभक्त सज्ज आहेत. अशात गणेशोत्सवाच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तब्बल पाच हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमे-यांसह मुंबई पोलिसही कडेकोट बंदोबस्त ठेवणार आहेत. कोरोना संकटामुळे यावर्षी गणेशोत्सवाबाबत अनेक नियम लागू करण्यात आले आहेत. गणेशोत्सवासोबत मोहरमही येत असल्यामुळे या काळात मुंबईवर कुठलेही संकट नको, यासाठी मुंबई पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. या दोन्ही सणाला गालबोट लागू नये, म्हणून मुंबईत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. यंदा अनेक गणेश मंडळांनी कोरोना संकट काळात गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गर्दी कमी होण्याची अपेक्षा आहे. पण त्यानंतरही खबरदारी म्हणून पाच हजार सीसीटीव्हींसह बंदोबस्त ठेवण्यात  येणार आहे. हेही वाचा : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात CBI कडून थेट मुंबई पोलिसांचीच चौकशी ? पोलिसांसह राज्य राखीव दल, शीघ्र कृती दल, फोर्स वन, रॅपिड ऍक्‍शन फोर्स यांची अतिरिक्त कुमक राखीव ठेवण्यात आली आहे. होमगार्ड आणि स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकायांची मदत घेण्यात येणार आहे. गणेशोत्सवासाठी पाचशे पोलिस अंमलदार, लालबाग येथे 30 पोलिस, दीड दिवसांच्या विसर्जनासाठी एक हजार अतिरिक्त पोलिस, रॅपिड ऍक्शन फोर्सची एक कंपनी, तीन राज्य राखील पोलिस दलाच्या कंपन्या असा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांसह दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिसही परिस्थितीवर लक्ष ठेऊन राहणार आहेत. यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना चार फुट व घरगुती गणपती दोन फुट ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच गर्दी होऊ नये यासाठी 167 कृत्रिम विसर्जन स्थळे उभारण्यात आली आहेत. हेही वाचा : बदल्यांवरून एसटी महामंडळात सावळागोंधळ,  अद्यापही 15 टक्के बदली प्रक्रीया रेंगाळली नागरीकांना रस्त्यावर गर्दी करू नये व सोशल डिस्टन्सिन्ग पाळावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. ( संपादन - सुमित बागुल ) mumbai police all set to handle situation during ganesh utsav News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, August 21, 2020

गणेशोत्सववाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस सज्ज, ATS देखील ठेवणार परिस्थितीवर नजर मुंबई : कोरोना संकट काळातही विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनासाठी गणेशभक्त सज्ज आहेत. अशात गणेशोत्सवाच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तब्बल पाच हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमे-यांसह मुंबई पोलिसही कडेकोट बंदोबस्त ठेवणार आहेत. कोरोना संकटामुळे यावर्षी गणेशोत्सवाबाबत अनेक नियम लागू करण्यात आले आहेत. गणेशोत्सवासोबत मोहरमही येत असल्यामुळे या काळात मुंबईवर कुठलेही संकट नको, यासाठी मुंबई पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. या दोन्ही सणाला गालबोट लागू नये, म्हणून मुंबईत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. यंदा अनेक गणेश मंडळांनी कोरोना संकट काळात गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गर्दी कमी होण्याची अपेक्षा आहे. पण त्यानंतरही खबरदारी म्हणून पाच हजार सीसीटीव्हींसह बंदोबस्त ठेवण्यात  येणार आहे. हेही वाचा : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात CBI कडून थेट मुंबई पोलिसांचीच चौकशी ? पोलिसांसह राज्य राखीव दल, शीघ्र कृती दल, फोर्स वन, रॅपिड ऍक्‍शन फोर्स यांची अतिरिक्त कुमक राखीव ठेवण्यात आली आहे. होमगार्ड आणि स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकायांची मदत घेण्यात येणार आहे. गणेशोत्सवासाठी पाचशे पोलिस अंमलदार, लालबाग येथे 30 पोलिस, दीड दिवसांच्या विसर्जनासाठी एक हजार अतिरिक्त पोलिस, रॅपिड ऍक्शन फोर्सची एक कंपनी, तीन राज्य राखील पोलिस दलाच्या कंपन्या असा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांसह दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिसही परिस्थितीवर लक्ष ठेऊन राहणार आहेत. यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना चार फुट व घरगुती गणपती दोन फुट ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच गर्दी होऊ नये यासाठी 167 कृत्रिम विसर्जन स्थळे उभारण्यात आली आहेत. हेही वाचा : बदल्यांवरून एसटी महामंडळात सावळागोंधळ,  अद्यापही 15 टक्के बदली प्रक्रीया रेंगाळली नागरीकांना रस्त्यावर गर्दी करू नये व सोशल डिस्टन्सिन्ग पाळावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. ( संपादन - सुमित बागुल ) mumbai police all set to handle situation during ganesh utsav News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2YlNC2w

No comments:

Post a Comment