बैलगाडा शर्यतीची कमाल, कोरोनालाही टाकलं मागे पिंपरी : जन्मदात्या आई-बापाला कोरोनाने ग्रासलं. त्यानंतर एकुलता एक मुलगा ही पॉझिटिव्ह आला. सर्व कुटुंबालाच दवाखान्यात दाखल करावं लागलं. आई-वडील एकीकडं व मुलगा दूसऱ्या रुग्णालयात दाखल. अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली. मुलगा बरा होऊन घरी लवकर परतला. मात्र, वडिलांची तब्येत खालावल्याने तो चिंतेने व्याकूळ झाला. आजोबा-पंजोबाच्या पिढीपासून बैलगाडा शर्यतीत वडील जोमाने सहभागी व्हायचे. त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी 1990 पासूनचे बैलगाड्या शर्यतीचे व्हिडिओ त्याने वडिलांना दाखविले. एकप्रकारे जगण्याचं बळच त्यांना मिळालं. हतबल झालेल्या वडिलांना उभारी मिळाली अन्‌ ते जोपासलेल्या छंदामुळे पूर्णपणे बरे झाले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  भोसरी, इंद्रायणीनगर येथील घोडगंगा सोसायटीत राहणारे हे कुटुंब. वडील संजय शंकरराव डुकरे. वय 52. कोरोना झाल्यानंतर आई-वडिलांना मोशी येथे उपचारासाठी क्वारंटाइन केलं. मुलगा स्वप्नील डुकरे. खासगी कंपनीत कामाला आहे. आजोबा शंकर चिमाजी डुकरे यांच्या काळापासून परंपरेने चालत आलेल्या बैलांना मानापानाने बैलगाडा शर्यतीत दरवर्षी सहभागी केलं जायचं. अचानक 2014 मध्ये बैलगाडा शर्यत बंद झाली. मात्र, रुबाबदार बैलं आजही त्यांच्या गोठ्यातल्या दावणीला आहेत. संजय शंकरराव डुकरे पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 1960 पासून हे कुटुंब बैलगाडा शर्यतीत सहभागी व्हायचं. यातील काही बैलं खास शर्यतीसाठी साताऱ्यावरून खरेदी केलेली आहेत. त्यात 'ल्या' नावाचा बैल सर्वांच्या आवडीचा आहे. त्यांची किंमत साडेतीन लाखांच्या वर आहे. त्यानंतर बबड्या, राजा, सायब्या आणि निशाण्या या बैलांच्या जोडगोळ्या. सध्या पाच बैलांचा सांभाळ कुटुंबातील मंडळी करतात. त्यांनी बैलं केंदूर येथे ठेवलेली आहेत. त्यांचा खाण्याचा कडबा, कुट्टी, आंबवण हे दिवसभरात पाहिलं जातं. त्यानंतर बैलांची देखभालही केली जाते. वडील व मुलगा दोघेही बैलांची देखभाल करतात. दिवसभरात या बैलांचा खर्च तीन हजारांहून अधिक आहे. पूर्वी आठ ते दहा बैलं होती. सध्या उत्पन्न शून्य आहे. केवळ छंद असल्याने आज ना उद्या बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू होईल, अशी अपेक्षा या कुटुंबीयांना आहे. कुटुंबातूनच घेतला धडा कोरोनाने कोणाचा मृत्यू होऊ नये, यासाठी तो झगडत आहे. मित्रांचा गोतावळा मोठा असल्याने तो सध्या प्लाझ्मा मिळवून देण्याचंही काम करतोय. पाच ते दहा मित्रांना संपर्क करून त्याने नुकतेच मित्र दिनेश शेलार यांचे वडील बंडोपंत शेलार यांना प्लाझ्मा मिळवून दिला. त्यासाठी स्वप्निलने अनेकांना संपर्क केला. शेलार यांना तीनवेळा थेरपी देऊन ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत. स्वप्निलला देखील आता क्वारंटाइनचे 28 दिवस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे तो आता प्लाझ्मा दान करणार आहे. स्वप्निल संजय डुकरे कुटुंब हेच आपल्यासाठी सर्व काही असतं. त्यांनी संस्कार दिले. त्यांना उभारी न मिळाल्याने मी हतबल झालो होतो. यापूर्वी माझ्या तीन ते चार मित्रांचे वडील कोरोनामुळे गेले. त्यांना ऑक्‍सिजनही लवकर मिळाला नाही. त्यानंतर माझी भीती वाढली. वडिलांना टीव्ही पाहू दिला नाही. वारंवार कानावर कोरोनाच्या बातम्या पडत असत. मात्र, सर्व मृत्यू कोरोनाने होत नाहीत. त्यात कित्येक जण इतर आजारानेही दगावलेले आहेत. त्यासाठी मी वडिलांना बैलगाडा शर्यतीचे जुने व्हिडिओ मोबाईलवर पाठविले. टीव्हीवरही सर्व व्हिडिओ सेट केले. कोरोनावर उपचार असो अथवा नसो. मानसिक संतुलन चांगले ठेवण्यासाठी आपले आवडते छंद जोपासणे गरजेचे आहे. तसेच, सकारात्मक गोष्टींमध्ये मन गुंतवावे. - स्वप्निल संजय डुकरे, भोसरी Edited by : Shivnandan Baviskar News Story Feeds https://ift.tt/3jN0Nm8 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, July 27, 2020

बैलगाडा शर्यतीची कमाल, कोरोनालाही टाकलं मागे पिंपरी : जन्मदात्या आई-बापाला कोरोनाने ग्रासलं. त्यानंतर एकुलता एक मुलगा ही पॉझिटिव्ह आला. सर्व कुटुंबालाच दवाखान्यात दाखल करावं लागलं. आई-वडील एकीकडं व मुलगा दूसऱ्या रुग्णालयात दाखल. अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली. मुलगा बरा होऊन घरी लवकर परतला. मात्र, वडिलांची तब्येत खालावल्याने तो चिंतेने व्याकूळ झाला. आजोबा-पंजोबाच्या पिढीपासून बैलगाडा शर्यतीत वडील जोमाने सहभागी व्हायचे. त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी 1990 पासूनचे बैलगाड्या शर्यतीचे व्हिडिओ त्याने वडिलांना दाखविले. एकप्रकारे जगण्याचं बळच त्यांना मिळालं. हतबल झालेल्या वडिलांना उभारी मिळाली अन्‌ ते जोपासलेल्या छंदामुळे पूर्णपणे बरे झाले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  भोसरी, इंद्रायणीनगर येथील घोडगंगा सोसायटीत राहणारे हे कुटुंब. वडील संजय शंकरराव डुकरे. वय 52. कोरोना झाल्यानंतर आई-वडिलांना मोशी येथे उपचारासाठी क्वारंटाइन केलं. मुलगा स्वप्नील डुकरे. खासगी कंपनीत कामाला आहे. आजोबा शंकर चिमाजी डुकरे यांच्या काळापासून परंपरेने चालत आलेल्या बैलांना मानापानाने बैलगाडा शर्यतीत दरवर्षी सहभागी केलं जायचं. अचानक 2014 मध्ये बैलगाडा शर्यत बंद झाली. मात्र, रुबाबदार बैलं आजही त्यांच्या गोठ्यातल्या दावणीला आहेत. संजय शंकरराव डुकरे पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 1960 पासून हे कुटुंब बैलगाडा शर्यतीत सहभागी व्हायचं. यातील काही बैलं खास शर्यतीसाठी साताऱ्यावरून खरेदी केलेली आहेत. त्यात 'ल्या' नावाचा बैल सर्वांच्या आवडीचा आहे. त्यांची किंमत साडेतीन लाखांच्या वर आहे. त्यानंतर बबड्या, राजा, सायब्या आणि निशाण्या या बैलांच्या जोडगोळ्या. सध्या पाच बैलांचा सांभाळ कुटुंबातील मंडळी करतात. त्यांनी बैलं केंदूर येथे ठेवलेली आहेत. त्यांचा खाण्याचा कडबा, कुट्टी, आंबवण हे दिवसभरात पाहिलं जातं. त्यानंतर बैलांची देखभालही केली जाते. वडील व मुलगा दोघेही बैलांची देखभाल करतात. दिवसभरात या बैलांचा खर्च तीन हजारांहून अधिक आहे. पूर्वी आठ ते दहा बैलं होती. सध्या उत्पन्न शून्य आहे. केवळ छंद असल्याने आज ना उद्या बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू होईल, अशी अपेक्षा या कुटुंबीयांना आहे. कुटुंबातूनच घेतला धडा कोरोनाने कोणाचा मृत्यू होऊ नये, यासाठी तो झगडत आहे. मित्रांचा गोतावळा मोठा असल्याने तो सध्या प्लाझ्मा मिळवून देण्याचंही काम करतोय. पाच ते दहा मित्रांना संपर्क करून त्याने नुकतेच मित्र दिनेश शेलार यांचे वडील बंडोपंत शेलार यांना प्लाझ्मा मिळवून दिला. त्यासाठी स्वप्निलने अनेकांना संपर्क केला. शेलार यांना तीनवेळा थेरपी देऊन ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत. स्वप्निलला देखील आता क्वारंटाइनचे 28 दिवस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे तो आता प्लाझ्मा दान करणार आहे. स्वप्निल संजय डुकरे कुटुंब हेच आपल्यासाठी सर्व काही असतं. त्यांनी संस्कार दिले. त्यांना उभारी न मिळाल्याने मी हतबल झालो होतो. यापूर्वी माझ्या तीन ते चार मित्रांचे वडील कोरोनामुळे गेले. त्यांना ऑक्‍सिजनही लवकर मिळाला नाही. त्यानंतर माझी भीती वाढली. वडिलांना टीव्ही पाहू दिला नाही. वारंवार कानावर कोरोनाच्या बातम्या पडत असत. मात्र, सर्व मृत्यू कोरोनाने होत नाहीत. त्यात कित्येक जण इतर आजारानेही दगावलेले आहेत. त्यासाठी मी वडिलांना बैलगाडा शर्यतीचे जुने व्हिडिओ मोबाईलवर पाठविले. टीव्हीवरही सर्व व्हिडिओ सेट केले. कोरोनावर उपचार असो अथवा नसो. मानसिक संतुलन चांगले ठेवण्यासाठी आपले आवडते छंद जोपासणे गरजेचे आहे. तसेच, सकारात्मक गोष्टींमध्ये मन गुंतवावे. - स्वप्निल संजय डुकरे, भोसरी Edited by : Shivnandan Baviskar News Story Feeds https://ift.tt/3jN0Nm8


via News Story Feeds https://ift.tt/3g4xlWw

No comments:

Post a Comment