नागपुरात प्रीती दासचा धुमाकूळ, वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी नागपूर : भंडारा आणि नागपुरातील सीताबर्डी, जरीपटका, गिट्टीखदान आणि पाचपावली पोलीस ठाण्यांत खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वयंघोषित समाजसेविका प्रीती दास या ठगबाज महिलेविरूद्ध जरीपटका पोलिस ठाण्यातसुद्धा खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. वायुसेनेत लिपिक असलेल्या एका अधिकाऱ्याच्या आईकडून 25 हजार रुपये उकळल्याचे प्रकरण समोर आले आहे. शहरातील 66 पोलिस निरीक्षक माझ्या खिशात ठेवते, अशी "डॉयलॉग' म्हणणारी प्रीती दास पोलिसांच्या धाकामुळे फरार आहे. तिचा कामठी रोडवरील बंगला रिकामा पडला आहे.  अधिकाऱ्यांची "खास' प्रिती  फेसबुकद्वारे मैत्री करून ब्लॅकमेल करणारी सामाजिक कार्यकर्ता प्रिती दास ही पोलिस स्टेशनमध्ये असलेल्या शांतता समितीची सदस्यही होती. शांतता समितीची सदस्य असल्याने तिची अनेक पोलिस अधिकाऱ्यांसोबत ओळख होती. तसेच तिचे मोठमोठ्या राजकीय नेत्यांसोबत फोटोही आहेत. अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या पार्टीत प्रिती आपल्या जवळच्या मैत्रिणींसह "विशेष' अतिथी म्हणून उपस्थित राहत होती, अशी माहिती समोर आली आहे.  सासू-सुनेत वाद झाल्याने सून माहेरी गेली. हिच संधी साधून प्रीती दासने तिच्या सासूविरोधात भरोसा सेलमध्ये तक्रार दिली आणि "सेटलमेंट' करण्यासाठी 25 हजार रुपये उकळले. हा प्रकार जेव्हा भरोसा सेलच्या पोलीस अधिकाऱ्यांना कळला तेव्हा या प्रकाराचा भंडाफोड झाला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरीपटका हद्दीतील इंदिरा माता टेकडी गोंड मोहल्ला, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी पूर्णाबाई गिरधर सडमाके (55) यांचा मुलगा नीतेश गिरीधर सडमाके हा वायुसेनेत लिपिक पदावर काम करतो. 8 मार्च 2019 मध्ये त्याचे लग्न प्रणिता या तरूणीशी झाले. लग्नानंतरचे सुरवातीचे दोन महिने प्रणिता आणि नीतेश यांचे वैवाहिक जीवन चांगले राहिले, मात्र 2 महिन्यानंतर सून प्रणिता सासू पूर्णाबाई यांच्यासोबत क्षुल्लक कारणावरून वादविवाद होऊ लागले. दिवसेंदिवस हा प्रकार वाढू लागला. सुनेच्या वागण्यात फरक पडल्याचे लक्षात येताच पूर्णाबाई यांनी प्रणिताच्या आईला घरी बोलावून तिची जमजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण प्रणिताच्या आईने मुलीचीच बाजू घेऊन लग्नात आलेले सर्व सामान घेऊन माहेरी निघून गेली. त्यानंतर पुर्णाबाई आणि पती नीतेश या दोघांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण काही फायदा झाला नाही. प्रणिता समजून घेण्याचा प्रयत्न करीत नसल्याचे पाहून पूर्णाबाई निराश झाल्या. याच संधीच्या शोधात असलेल्या स्वयंघोषित समाजसेवक प्रीती दास (रा. प्रियदर्शनी अपार्टमेंट, कामठी रोड, नागपूर) हिने भरोसा सेलमध्ये पूर्णाबाई यांच्याविरोधात तक्रार केली.  - गुड न्यूज! लवकरच सुरू होणार व्याघ्रपर्यटन पोलिसांच्या नावावर खंडणी  भरोसा सेल येथे तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून पूर्णाबाई यांच्याशी संपर्क करण्यात आला. दरम्यान आरोपी प्रिती दासने पूर्णाबाई यांना "तुमचे काम करून देते.' असे म्हणून त्यांना 25 हजार रुपयांची मागणी केली, नाहीतर तुमच्या मुलाची नोकरी जाईल अशी धमकी दिली. या भीतीपोटी 17 ऑक्‍टोबर 2019 रोजी पूर्णाबाई यांनी प्रिती दासला 25 हजार रुपये दिले. त्यानंतर तिला फोन करून "काम झाले आहे का?' अशी केली. त्यावर प्रिती दासने "तुमच्या मुलाचे काम झाले आहे आणि मी भरोसा सेलच्या मॅडमला पैसे दिले आहे.' असे सांगितले.  प्रीती अशी पडली तोंडघशी  तक्रारीची चौकशी करताना भरोसा सेलच्या पोलिस निरीक्षक शुभदा संखे यांनी पूर्णाबाई यांना कॉल करुन भरोसा सेल येथे बोलावले. "तुम्ही पैसे कोणाला दिले आहे का?' असा सवाल पोलिस निरीक्षक शुभदा संखे यांनी केला. "तुमच्या नावाने आम्ही आरोपी प्रीती दासला 25 हजार रुपये दिले आहे' असे पूर्णाबाई हिने सांगितले. तेव्हा संखे यांना आरोपी प्रीती दासने पूर्णाबाई यांना पैसे मागितल्याचे कळले. याप्रकरणी पूर्णाबाई गिरधर सडमाके यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम 384 भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.    प्रीती दास झाली फरार  शहरातील 66 पोलिस निरीक्षक माझ्या खिशात ठेवते, अशी "डॉयलॉग' नेहमी म्हणणारी प्रीती दास पोलिसांच्या धाकामुळे फरार आहे. तिचा कामठी रोडवरील बंगला रिकामा पडला आहे. पोलिसांसोबत असलेले फोटो दाखवून खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी देऊन अनेकांना लुबाडणारी प्रीती आज दारोदार फिरत आहे. मात्र, सध्या कुणीही तिला थारा देत नसल्याची चर्चा आहे.  - "ब्लॅक बिटन' रॉडसह उडाला आकाशात... वाचा काय आहे संपूर्ण प्रकार अधिकाऱ्यांची "खास' प्रिती  फेसबुकद्वारे मैत्री करून ब्लॅकमेल करणारी सामाजिक कार्यकर्ता प्रिती दास ही पोलिस स्टेशनमध्ये असलेल्या शांतता समितीची सदस्यही होती. शांतता समितीची सदस्य असल्याने तिची अनेक पोलिस अधिकाऱ्यांसोबत ओळख होती. तसेच तिचे मोठमोठ्या राजकीय नेत्यांसोबत फोटोही आहेत. अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या पार्टीत प्रिती आपल्या जवळच्या मैत्रिणींसह "विशेष' अतिथी म्हणून उपस्थित राहत होती, अशी माहिती समोर आली आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, June 7, 2020

नागपुरात प्रीती दासचा धुमाकूळ, वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी नागपूर : भंडारा आणि नागपुरातील सीताबर्डी, जरीपटका, गिट्टीखदान आणि पाचपावली पोलीस ठाण्यांत खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वयंघोषित समाजसेविका प्रीती दास या ठगबाज महिलेविरूद्ध जरीपटका पोलिस ठाण्यातसुद्धा खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. वायुसेनेत लिपिक असलेल्या एका अधिकाऱ्याच्या आईकडून 25 हजार रुपये उकळल्याचे प्रकरण समोर आले आहे. शहरातील 66 पोलिस निरीक्षक माझ्या खिशात ठेवते, अशी "डॉयलॉग' म्हणणारी प्रीती दास पोलिसांच्या धाकामुळे फरार आहे. तिचा कामठी रोडवरील बंगला रिकामा पडला आहे.  अधिकाऱ्यांची "खास' प्रिती  फेसबुकद्वारे मैत्री करून ब्लॅकमेल करणारी सामाजिक कार्यकर्ता प्रिती दास ही पोलिस स्टेशनमध्ये असलेल्या शांतता समितीची सदस्यही होती. शांतता समितीची सदस्य असल्याने तिची अनेक पोलिस अधिकाऱ्यांसोबत ओळख होती. तसेच तिचे मोठमोठ्या राजकीय नेत्यांसोबत फोटोही आहेत. अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या पार्टीत प्रिती आपल्या जवळच्या मैत्रिणींसह "विशेष' अतिथी म्हणून उपस्थित राहत होती, अशी माहिती समोर आली आहे.  सासू-सुनेत वाद झाल्याने सून माहेरी गेली. हिच संधी साधून प्रीती दासने तिच्या सासूविरोधात भरोसा सेलमध्ये तक्रार दिली आणि "सेटलमेंट' करण्यासाठी 25 हजार रुपये उकळले. हा प्रकार जेव्हा भरोसा सेलच्या पोलीस अधिकाऱ्यांना कळला तेव्हा या प्रकाराचा भंडाफोड झाला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरीपटका हद्दीतील इंदिरा माता टेकडी गोंड मोहल्ला, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी पूर्णाबाई गिरधर सडमाके (55) यांचा मुलगा नीतेश गिरीधर सडमाके हा वायुसेनेत लिपिक पदावर काम करतो. 8 मार्च 2019 मध्ये त्याचे लग्न प्रणिता या तरूणीशी झाले. लग्नानंतरचे सुरवातीचे दोन महिने प्रणिता आणि नीतेश यांचे वैवाहिक जीवन चांगले राहिले, मात्र 2 महिन्यानंतर सून प्रणिता सासू पूर्णाबाई यांच्यासोबत क्षुल्लक कारणावरून वादविवाद होऊ लागले. दिवसेंदिवस हा प्रकार वाढू लागला. सुनेच्या वागण्यात फरक पडल्याचे लक्षात येताच पूर्णाबाई यांनी प्रणिताच्या आईला घरी बोलावून तिची जमजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण प्रणिताच्या आईने मुलीचीच बाजू घेऊन लग्नात आलेले सर्व सामान घेऊन माहेरी निघून गेली. त्यानंतर पुर्णाबाई आणि पती नीतेश या दोघांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण काही फायदा झाला नाही. प्रणिता समजून घेण्याचा प्रयत्न करीत नसल्याचे पाहून पूर्णाबाई निराश झाल्या. याच संधीच्या शोधात असलेल्या स्वयंघोषित समाजसेवक प्रीती दास (रा. प्रियदर्शनी अपार्टमेंट, कामठी रोड, नागपूर) हिने भरोसा सेलमध्ये पूर्णाबाई यांच्याविरोधात तक्रार केली.  - गुड न्यूज! लवकरच सुरू होणार व्याघ्रपर्यटन पोलिसांच्या नावावर खंडणी  भरोसा सेल येथे तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून पूर्णाबाई यांच्याशी संपर्क करण्यात आला. दरम्यान आरोपी प्रिती दासने पूर्णाबाई यांना "तुमचे काम करून देते.' असे म्हणून त्यांना 25 हजार रुपयांची मागणी केली, नाहीतर तुमच्या मुलाची नोकरी जाईल अशी धमकी दिली. या भीतीपोटी 17 ऑक्‍टोबर 2019 रोजी पूर्णाबाई यांनी प्रिती दासला 25 हजार रुपये दिले. त्यानंतर तिला फोन करून "काम झाले आहे का?' अशी केली. त्यावर प्रिती दासने "तुमच्या मुलाचे काम झाले आहे आणि मी भरोसा सेलच्या मॅडमला पैसे दिले आहे.' असे सांगितले.  प्रीती अशी पडली तोंडघशी  तक्रारीची चौकशी करताना भरोसा सेलच्या पोलिस निरीक्षक शुभदा संखे यांनी पूर्णाबाई यांना कॉल करुन भरोसा सेल येथे बोलावले. "तुम्ही पैसे कोणाला दिले आहे का?' असा सवाल पोलिस निरीक्षक शुभदा संखे यांनी केला. "तुमच्या नावाने आम्ही आरोपी प्रीती दासला 25 हजार रुपये दिले आहे' असे पूर्णाबाई हिने सांगितले. तेव्हा संखे यांना आरोपी प्रीती दासने पूर्णाबाई यांना पैसे मागितल्याचे कळले. याप्रकरणी पूर्णाबाई गिरधर सडमाके यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम 384 भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.    प्रीती दास झाली फरार  शहरातील 66 पोलिस निरीक्षक माझ्या खिशात ठेवते, अशी "डॉयलॉग' नेहमी म्हणणारी प्रीती दास पोलिसांच्या धाकामुळे फरार आहे. तिचा कामठी रोडवरील बंगला रिकामा पडला आहे. पोलिसांसोबत असलेले फोटो दाखवून खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी देऊन अनेकांना लुबाडणारी प्रीती आज दारोदार फिरत आहे. मात्र, सध्या कुणीही तिला थारा देत नसल्याची चर्चा आहे.  - "ब्लॅक बिटन' रॉडसह उडाला आकाशात... वाचा काय आहे संपूर्ण प्रकार अधिकाऱ्यांची "खास' प्रिती  फेसबुकद्वारे मैत्री करून ब्लॅकमेल करणारी सामाजिक कार्यकर्ता प्रिती दास ही पोलिस स्टेशनमध्ये असलेल्या शांतता समितीची सदस्यही होती. शांतता समितीची सदस्य असल्याने तिची अनेक पोलिस अधिकाऱ्यांसोबत ओळख होती. तसेच तिचे मोठमोठ्या राजकीय नेत्यांसोबत फोटोही आहेत. अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या पार्टीत प्रिती आपल्या जवळच्या मैत्रिणींसह "विशेष' अतिथी म्हणून उपस्थित राहत होती, अशी माहिती समोर आली आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/37cksFX

No comments:

Post a Comment