ओझोनच्या थराला भगदाड ‘नासा’ची पाहणी, सजीवसृष्टीसमोर मोठे आव्हान न्यूयॉर्क - आर्क्‍टिक खंडाच्यावर ओझोनला मोठे भगदाड पडल्याची माहिती समोर आली आहे. आजपर्यंत उत्तर ध्रुवावर पडलेल्या ओझोनच्या मोठ्या भगदाडापैंकी हे एक आहे. अमेरिकन अवकाश संशोधन संस्था ‘नासा’च्या उपग्रहांनी मिळविलेल्या माहितीच्या आधारावर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.   बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जर्मन एरोस्पेस सेंटरचे हवामानशास्त्रज्ञ डॉ. मार्टिन डेमॅरीस म्हणतात, ‘‘आर्क्‍टिक खंडावर आजवर पडलेल्या सर्वांत प्रभावशाली ओझोनचे भगदाड म्हणून याकडे बघावे लागेल.’’  सूर्यापासून प्रसारित झालेल्या अतिनील आणि इतर हानिकारक किरणांपासून पृथ्वीवरील जीवसृष्टीचा बचाव करण्याचे काम वातावरणातील ओझोनचा थर करतो. ओझोनच्या थराविना जीवसृष्टीची कल्पनाच आपण करू शकत नाही. पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावरील अंटार्क्‍टिकाच्या आकाशातील ओझोनचा थरही कमी जास्त होत असतो. हिवाळ्यामध्ये उंचावरून वाहणारे ढग स्वतःबरोबर ‘क्‍लोरोफ्लुरोकार्बन’ला ही घेऊन येतात. त्यामुळे ओझोनची क्‍लोरोफ्लुरोकार्बन सोबत अभिक्रिया होते. त्यामुळे ओझोनच्या थराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. उत्तर ध्रुवाचे मात्र तसे नाही. दक्षिण ध्रुवाच्या तुलनेत हा ध्रुव थोडा उष्ण आहे. त्यामुळे तिथे अति उंचावरून वाहणारे ढग येतच नाही. पण यावर्षी थंड वाऱ्यांमुळे उत्तर ध्रुवावरील तापमानात जास्त घट झाल्यामुळे ‘क्‍लोरोफ्लुरोकार्बन’सोबत अभिक्रिया झाल्यामुळे तेथील ओझोनच्या थराला मोठे भगदाड पडले आहे. साधारणपणे ग्रीनलॅंडच्या आकारमानाच्या तिप्पट याचा आकार आहे. मार्चमध्ये निरीक्षणासाठी अवकाशात पाठविलेल्या फुग्याद्वारे मिळालेल्या माहितीनुसार ओझोनच्या थरात ९० टक्‍क्‍यांची घट झाली आहे. आता हे भगदाड माणसासाठीही मोठे आव्हान ठरणार आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, April 7, 2020

ओझोनच्या थराला भगदाड ‘नासा’ची पाहणी, सजीवसृष्टीसमोर मोठे आव्हान न्यूयॉर्क - आर्क्‍टिक खंडाच्यावर ओझोनला मोठे भगदाड पडल्याची माहिती समोर आली आहे. आजपर्यंत उत्तर ध्रुवावर पडलेल्या ओझोनच्या मोठ्या भगदाडापैंकी हे एक आहे. अमेरिकन अवकाश संशोधन संस्था ‘नासा’च्या उपग्रहांनी मिळविलेल्या माहितीच्या आधारावर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.   बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जर्मन एरोस्पेस सेंटरचे हवामानशास्त्रज्ञ डॉ. मार्टिन डेमॅरीस म्हणतात, ‘‘आर्क्‍टिक खंडावर आजवर पडलेल्या सर्वांत प्रभावशाली ओझोनचे भगदाड म्हणून याकडे बघावे लागेल.’’  सूर्यापासून प्रसारित झालेल्या अतिनील आणि इतर हानिकारक किरणांपासून पृथ्वीवरील जीवसृष्टीचा बचाव करण्याचे काम वातावरणातील ओझोनचा थर करतो. ओझोनच्या थराविना जीवसृष्टीची कल्पनाच आपण करू शकत नाही. पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावरील अंटार्क्‍टिकाच्या आकाशातील ओझोनचा थरही कमी जास्त होत असतो. हिवाळ्यामध्ये उंचावरून वाहणारे ढग स्वतःबरोबर ‘क्‍लोरोफ्लुरोकार्बन’ला ही घेऊन येतात. त्यामुळे ओझोनची क्‍लोरोफ्लुरोकार्बन सोबत अभिक्रिया होते. त्यामुळे ओझोनच्या थराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. उत्तर ध्रुवाचे मात्र तसे नाही. दक्षिण ध्रुवाच्या तुलनेत हा ध्रुव थोडा उष्ण आहे. त्यामुळे तिथे अति उंचावरून वाहणारे ढग येतच नाही. पण यावर्षी थंड वाऱ्यांमुळे उत्तर ध्रुवावरील तापमानात जास्त घट झाल्यामुळे ‘क्‍लोरोफ्लुरोकार्बन’सोबत अभिक्रिया झाल्यामुळे तेथील ओझोनच्या थराला मोठे भगदाड पडले आहे. साधारणपणे ग्रीनलॅंडच्या आकारमानाच्या तिप्पट याचा आकार आहे. मार्चमध्ये निरीक्षणासाठी अवकाशात पाठविलेल्या फुग्याद्वारे मिळालेल्या माहितीनुसार ओझोनच्या थरात ९० टक्‍क्‍यांची घट झाली आहे. आता हे भगदाड माणसासाठीही मोठे आव्हान ठरणार आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3e4JiLa

No comments:

Post a Comment