ड्रेनेजच्या नावाखाली महापालिकेच्या तिजोरीची सफाई पुणे - पुणे शहरातील ड्रेनेजलाइनमध्ये (सांडपाणी वाहिन्या) किती घाण साठली आहे, त्यासाठी कोणतीही मोहीम अथवा सर्वेक्षण करून घेण्याची गरज नाही. या वाहिन्यांची साफसफाई करण्यासाठी दहा लाख रुपयांच्या किमतीच्या कामांचे जवळपास ३६५ हून अधिक प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. यावरून ड्रेनेजलाइन साफसफाईऐवजी महापालिकेच्या तिजोरीची कशा प्रकारे सफाई सुरू आहे, हे समोर आले आहे. ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप  क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावरून होणाऱ्या कामांचा विषय सध्या महापालिका वर्तुळात चर्चेचा झाला आहे. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप होत असून, त्यांची चौकशी करण्यापर्यंतची मागणी होऊ लागली आहे. पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पावर सध्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा सुरू आहे. या चर्चेतदेखील क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर कशाप्रकारे कामे केली जात आहेत, याची रंजक माहिती या चर्चेतून समोर येऊ लागली आहे. अधिक खोलवर जाऊन माहिती घेतल्यानंतर केवळ ड्रेनेज साफसफाई, सुशोभीकरण अशा विविध कामांसाठी दहा लाख रुपयांच्या कामांचे प्रस्ताव किती मोठ्या प्रमाणावर माननीयांकडून मांडले जात आहेत; त्याचे हे बोलके उदाहरण आहे. पुणे : सांगवडेत अखेर 'त्यांची' परतभेट ड्रेनेज विभागासाठी चालू वर्षीच्या अर्थसंकल्पात सुमारे ५९ कोटी रुपयांची तरतूद होती. वास्तविक, ड्रेनेजलाइनच्या साफसफाईसाठी खात्याच्या स्तरावर एकच निविदा काढणे अपेक्षित होते. परंतु, शहरातील माननीयांना या लाइनसफाईची घाई झाल्याने त्यांनी त्यांच्या स्तरावर या कामासाठी दहा लाख रुपयांच्या निविदा काढण्याला प्राधान्य दिले असल्याचे समोर आले आहे. वर्षभरात अशा प्रकारे ३६५ प्रस्ताव खात्याकडे दाखल झाले होते. त्यापैकी दोनशे प्रस्ताव खात्याने फेटाळूनदेखील आत्तापर्यंत जवळपास १६५ प्रस्ताव मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. याशिवाय, यापूर्वी दबाव करून मान्य करून घेण्यात आलेल्या प्रस्तावांची संख्या वेगळीच आहे. एवढे करूनही पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर पाणी साठण्याच्या घटना घडतातच. त्यामुळे ड्रेनेजलाइन साफसफाईऐवजी महापालिकेच्या तिजोरीची कशा प्रकारे सफाई सुरू आहे, हे समोर आले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 4, 2020

ड्रेनेजच्या नावाखाली महापालिकेच्या तिजोरीची सफाई पुणे - पुणे शहरातील ड्रेनेजलाइनमध्ये (सांडपाणी वाहिन्या) किती घाण साठली आहे, त्यासाठी कोणतीही मोहीम अथवा सर्वेक्षण करून घेण्याची गरज नाही. या वाहिन्यांची साफसफाई करण्यासाठी दहा लाख रुपयांच्या किमतीच्या कामांचे जवळपास ३६५ हून अधिक प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. यावरून ड्रेनेजलाइन साफसफाईऐवजी महापालिकेच्या तिजोरीची कशा प्रकारे सफाई सुरू आहे, हे समोर आले आहे. ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप  क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावरून होणाऱ्या कामांचा विषय सध्या महापालिका वर्तुळात चर्चेचा झाला आहे. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप होत असून, त्यांची चौकशी करण्यापर्यंतची मागणी होऊ लागली आहे. पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पावर सध्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा सुरू आहे. या चर्चेतदेखील क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर कशाप्रकारे कामे केली जात आहेत, याची रंजक माहिती या चर्चेतून समोर येऊ लागली आहे. अधिक खोलवर जाऊन माहिती घेतल्यानंतर केवळ ड्रेनेज साफसफाई, सुशोभीकरण अशा विविध कामांसाठी दहा लाख रुपयांच्या कामांचे प्रस्ताव किती मोठ्या प्रमाणावर माननीयांकडून मांडले जात आहेत; त्याचे हे बोलके उदाहरण आहे. पुणे : सांगवडेत अखेर 'त्यांची' परतभेट ड्रेनेज विभागासाठी चालू वर्षीच्या अर्थसंकल्पात सुमारे ५९ कोटी रुपयांची तरतूद होती. वास्तविक, ड्रेनेजलाइनच्या साफसफाईसाठी खात्याच्या स्तरावर एकच निविदा काढणे अपेक्षित होते. परंतु, शहरातील माननीयांना या लाइनसफाईची घाई झाल्याने त्यांनी त्यांच्या स्तरावर या कामासाठी दहा लाख रुपयांच्या निविदा काढण्याला प्राधान्य दिले असल्याचे समोर आले आहे. वर्षभरात अशा प्रकारे ३६५ प्रस्ताव खात्याकडे दाखल झाले होते. त्यापैकी दोनशे प्रस्ताव खात्याने फेटाळूनदेखील आत्तापर्यंत जवळपास १६५ प्रस्ताव मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. याशिवाय, यापूर्वी दबाव करून मान्य करून घेण्यात आलेल्या प्रस्तावांची संख्या वेगळीच आहे. एवढे करूनही पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर पाणी साठण्याच्या घटना घडतातच. त्यामुळे ड्रेनेजलाइन साफसफाईऐवजी महापालिकेच्या तिजोरीची कशा प्रकारे सफाई सुरू आहे, हे समोर आले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/32T9fId

No comments:

Post a Comment