...तर आमच्यावर गोळ्या झाडल्या तरी चालतील कऱ्हाड : सोळा दिवस व्यवसाय बंद ठेवून हॉकर्स झोन होण्याची वाट पाहिली मात्र पालिका त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे उपाशी मरण्यापेक्षा पालिकेच्या हातून मरू, पालिकेने गोळ्या घातल्या तरी चालतील आजपासून (गुरूवार) आम्ही पूर्वी होते तेथेच व्यवसाय सुरू करणार अशी आक्रमक भूमिका घेवून हातगाडी धारक संघटनेने जाहीर केले. हातागाडाधारक संघटनेच्या सभासदांचे बससस्थानक व शहरातील विविध भागातील हातगाड्यावरील व्यवसाय पूर्वीच्याच ठिकाणी सुरू होणार आहेत. ठिय्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही संघटनेने ठिय्या कायम ठेवला. बुधवारी दुपापर्यंत पालिका हॉकर्स झोन बाबत निर्णय देणार होती. तो निर्णय न आल्याने सांयकाळी संघटनेने त्यांचा निर्णय जाहीर केला. दिवसभरात नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, ज्येष्ठ नगरसवेक विनायक पावसकर, विद्या पावसकर, अंजली कुंभार यांनी तर उपाध्यक्ष जयवंत पाटील, आरोग्य सभापती महेश कांबळे, सुरेश पाटील, शिवराज इंगवले यांनी स्वतंत्ररित्या हातागाडाधारकांच्या ठिय्या आंदोलनस्थळी भेटी दिल्या. त्यांनी त्याबाबतची माहिती घेवून पालिकेत पाठपुरावा करण्याचे अश्वासन दिले. तरिही हातगाडाधारक संघटनेने त्यांचा आक्रमक पवित्रा सोडला नाही. पालिकेची अतिक्रमण मोहिमही थंडावली असूनही दिलेल्या शब्दाप्रमाणे पालिकेने हातगाडा धारकांसाठी हॉकर्स झोनचा प्रश्न पालिकेने सोडवलेला नाही. सोळा दिवस हातागाडा धारकांचे व्यवसाय बंद आहेत. मात्र तरिही त्याचा सहानभूतीपूर्वी विचार पालिकेने केला नसल्याने त्याचा निषेध शहरातील हातगाडाधारकांनी केला आहे. त्यासाठीवेगवेगळे मार्ग अवलंबले आहेत. हॉकर्स झोनसाठी वेगवेगळ्या आक्रमक भूमिका घेत आहेत. मात्र पालिकेने आजअखेर अंतीम निर्णय घेतलेला नाही. परिणामी हातगाडाधारक संघटनेने कालपासून बस स्थानकावर बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरवात केली आहे. दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. नगराध्यक्षा शिंदे, उपाध्यक्ष पाटील यांच्यासह अनेक नगरसेवकांनी त्यांच्या ठिय्या आंदोलनस्थळी भेट दिली. हातागाडाधारक संघटनेशी चर्चा केली. पालिकेतूनही हातागाड धारक संघटनेचा विषय दुपारपर्यंत संपविण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र पालिकेतूनही काहीही निरोप न आल्याने संतप्त झालेल्या हातगाडा धारकांनी उद्यापासून (गुरूवार) पूर्वी होते त्याच ठिकाणी व्यवसाय, हातागाडे लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे, असे संघटनेचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी सांगितले. ते म्हणाले, उपाशी मरण्यापेक्षा पालिकेच्या हातून मरणे चांगले. पालिकेने आता गोळ्या जरी घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही. सोळा दिवस उपासमार सहन केली आहे. मात्रा आता हातावर पोट भरणाऱ्या हातगाडा धारकांचा संयम संपला आहे. पालिकेने त्याचा विचार करून निर्णय घ्यावा. वडापाव,चहा विक्रेते आले रस्त्यावर; लाखाेंचे नुकसान हॉकर्स झोन व्हावा, अशी आमची आग्रही मागणी आहे. मात्र पालिका त्या मागणीकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही. सोळा दिवस व्यवसाय बंद ठेवून पालिका तारखेवर तारीख देत आहे. ते आम्ही सहन करत आहोत. मात्र रोजीरोटी किती दिवस बंद ठेवणार हाच आमचा प्रश्न आहे. त्यामुळे आजपासून (गुरवार) पूर्वी होते तेथेच आम्हीआमचे व्यवसाय सुरू करत आहोत. जावेद नायकवडी, अध्यक्ष, हातागाडाधारक संघटना कऱ्हाड सातारा सातारा सातारा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 11, 2020

...तर आमच्यावर गोळ्या झाडल्या तरी चालतील कऱ्हाड : सोळा दिवस व्यवसाय बंद ठेवून हॉकर्स झोन होण्याची वाट पाहिली मात्र पालिका त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे उपाशी मरण्यापेक्षा पालिकेच्या हातून मरू, पालिकेने गोळ्या घातल्या तरी चालतील आजपासून (गुरूवार) आम्ही पूर्वी होते तेथेच व्यवसाय सुरू करणार अशी आक्रमक भूमिका घेवून हातगाडी धारक संघटनेने जाहीर केले. हातागाडाधारक संघटनेच्या सभासदांचे बससस्थानक व शहरातील विविध भागातील हातगाड्यावरील व्यवसाय पूर्वीच्याच ठिकाणी सुरू होणार आहेत. ठिय्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही संघटनेने ठिय्या कायम ठेवला. बुधवारी दुपापर्यंत पालिका हॉकर्स झोन बाबत निर्णय देणार होती. तो निर्णय न आल्याने सांयकाळी संघटनेने त्यांचा निर्णय जाहीर केला. दिवसभरात नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, ज्येष्ठ नगरसवेक विनायक पावसकर, विद्या पावसकर, अंजली कुंभार यांनी तर उपाध्यक्ष जयवंत पाटील, आरोग्य सभापती महेश कांबळे, सुरेश पाटील, शिवराज इंगवले यांनी स्वतंत्ररित्या हातागाडाधारकांच्या ठिय्या आंदोलनस्थळी भेटी दिल्या. त्यांनी त्याबाबतची माहिती घेवून पालिकेत पाठपुरावा करण्याचे अश्वासन दिले. तरिही हातगाडाधारक संघटनेने त्यांचा आक्रमक पवित्रा सोडला नाही. पालिकेची अतिक्रमण मोहिमही थंडावली असूनही दिलेल्या शब्दाप्रमाणे पालिकेने हातगाडा धारकांसाठी हॉकर्स झोनचा प्रश्न पालिकेने सोडवलेला नाही. सोळा दिवस हातागाडा धारकांचे व्यवसाय बंद आहेत. मात्र तरिही त्याचा सहानभूतीपूर्वी विचार पालिकेने केला नसल्याने त्याचा निषेध शहरातील हातगाडाधारकांनी केला आहे. त्यासाठीवेगवेगळे मार्ग अवलंबले आहेत. हॉकर्स झोनसाठी वेगवेगळ्या आक्रमक भूमिका घेत आहेत. मात्र पालिकेने आजअखेर अंतीम निर्णय घेतलेला नाही. परिणामी हातगाडाधारक संघटनेने कालपासून बस स्थानकावर बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरवात केली आहे. दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. नगराध्यक्षा शिंदे, उपाध्यक्ष पाटील यांच्यासह अनेक नगरसेवकांनी त्यांच्या ठिय्या आंदोलनस्थळी भेट दिली. हातागाडाधारक संघटनेशी चर्चा केली. पालिकेतूनही हातागाड धारक संघटनेचा विषय दुपारपर्यंत संपविण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र पालिकेतूनही काहीही निरोप न आल्याने संतप्त झालेल्या हातगाडा धारकांनी उद्यापासून (गुरूवार) पूर्वी होते त्याच ठिकाणी व्यवसाय, हातागाडे लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे, असे संघटनेचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी सांगितले. ते म्हणाले, उपाशी मरण्यापेक्षा पालिकेच्या हातून मरणे चांगले. पालिकेने आता गोळ्या जरी घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही. सोळा दिवस उपासमार सहन केली आहे. मात्रा आता हातावर पोट भरणाऱ्या हातगाडा धारकांचा संयम संपला आहे. पालिकेने त्याचा विचार करून निर्णय घ्यावा. वडापाव,चहा विक्रेते आले रस्त्यावर; लाखाेंचे नुकसान हॉकर्स झोन व्हावा, अशी आमची आग्रही मागणी आहे. मात्र पालिका त्या मागणीकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही. सोळा दिवस व्यवसाय बंद ठेवून पालिका तारखेवर तारीख देत आहे. ते आम्ही सहन करत आहोत. मात्र रोजीरोटी किती दिवस बंद ठेवणार हाच आमचा प्रश्न आहे. त्यामुळे आजपासून (गुरवार) पूर्वी होते तेथेच आम्हीआमचे व्यवसाय सुरू करत आहोत. जावेद नायकवडी, अध्यक्ष, हातागाडाधारक संघटना कऱ्हाड सातारा सातारा सातारा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2wSsyp6

No comments:

Post a Comment