हजार लोकांना जेवण देऊन केला ट्रॅक्‍टरचा वाढदिवस  कसबा सांगाव - शेतकरी शेतीत उपयोगी ठरणाऱ्या साधने प्राण्यांबाबत नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत असतो. बेंदूर, खंडेनवमी दिपावली सणांत शेतीला उपयोगी ठरणारे बैल, लोखंडी साहित्य, गाईची पुजा केली जाते. अशीच कृतज्ञता कसबा सांगाव (ता. कागल जि. कोल्हापूर) येथील अण्णासो भूपाल चौगुले या शेतकऱ्याने दोन ट्रॅक्‍टरांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करून व्यक्त केली आहे. निमंत्रण पत्रिका छापून, आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्‍यांची आतषबाजी करीत सुमारे एक हजार लोकांना जेवण देऊन आनंद द्विगुणित केला.  हे पण वाचा - कोरोनाची धास्ती ; मास्कची किंमत पाहून व्हाल थक्क   रोज अनेकांचे वाढदिवस साजरे केले जातात. मात्र ज्या वाहनाच्या मदतीने आपल्या आयुष्याला नवसंजीवनी मिळाली. त्या वाहनांविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता तमाम शेतकरी बांधवांना प्रेरणादायी ठरणारी आहे. या अनोख्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.  आपला देश कृषीप्रधान आहे. गाय, म्हैस आदी पाळीव प्राण्यावर जीवापाड प्रेम करणारे शेतकरी आपण अनेकवेळा पाहिले आहेत. इतकेच नव्हे तर आपल्या काळ्या आईची सेवा अंगात रग असेपर्यंत करणारे शेतकरी आजही पहावयास मिळतात. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील आण्णासो चौगुले यांनी ट्रॅक्‍टरचा वाढदिवस साजरा करून समाजासमोर एक आगळेवेगळे उदाहरण दिले आहे. आई, पत्नी आणि मुलगा यांच्यामदतीने आण्णासो स्वतःची तीन एकर शेती करतात. 3 मार्च 2018 रोजी नवीन ट्रॅक्‍टर त्यांनी खरेदी केला. परिसरातील सांगाव, सुळकुड, रेंदाळ, रांगोळी, इंगळी, मांगूर आदी गावात मशागतीची अनेक कामे त्यांनी केली. काम जास्त असल्याने आणखी एक ट्रॅक्‍टर त्यांनी खरेदी केला. ट्रॅक्‍टरवर जीवापाड प्रेम असल्याने आणि त्यामुळेच आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याची भावना त्यांनी कायम जपली.  हे पण वाचा - इगो दुखावला की कायदा अन्‌ गोरगरीबांना इंग्लिशमधून शिव्या  निमंत्रण पत्रिका छापून त्यांनी अनेकांना निमंत्रण दिले. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमास अनेक शेतकऱ्यांनी हजेरी लावली. हार तुरे स्विकारले तेही ट्रॅक्‍टरसाठीच. स्नेहभोजनाचा आस्वाद घेत अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, सौरभ शेट्टी, प्रभू भोजे, अविनाश मगदूम, अजित शेटे, राहुल हेरवाडे, राजेंद्र झांजगे आदीसह महिला, शेतकरी उपस्थित होते.  ट्रॅक्‍टर घेण्याची लहानपणापासून इच्छा होती. स्वतःच्या मुलाप्रमाणे वाहनांना जपले प्रामाणिकपणाने काम केल्यामुळे मला यश आले. शेती आणि ट्रॅक्‍टरला मी घरची लक्ष्मी मानतो. म्हणून ट्रॅक्‍टरचा वाढदिवस साजरा केला.  -आण्णासो चौगुले, शेतकरी, कसबा सांगाव.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 4, 2020

हजार लोकांना जेवण देऊन केला ट्रॅक्‍टरचा वाढदिवस  कसबा सांगाव - शेतकरी शेतीत उपयोगी ठरणाऱ्या साधने प्राण्यांबाबत नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत असतो. बेंदूर, खंडेनवमी दिपावली सणांत शेतीला उपयोगी ठरणारे बैल, लोखंडी साहित्य, गाईची पुजा केली जाते. अशीच कृतज्ञता कसबा सांगाव (ता. कागल जि. कोल्हापूर) येथील अण्णासो भूपाल चौगुले या शेतकऱ्याने दोन ट्रॅक्‍टरांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करून व्यक्त केली आहे. निमंत्रण पत्रिका छापून, आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्‍यांची आतषबाजी करीत सुमारे एक हजार लोकांना जेवण देऊन आनंद द्विगुणित केला.  हे पण वाचा - कोरोनाची धास्ती ; मास्कची किंमत पाहून व्हाल थक्क   रोज अनेकांचे वाढदिवस साजरे केले जातात. मात्र ज्या वाहनाच्या मदतीने आपल्या आयुष्याला नवसंजीवनी मिळाली. त्या वाहनांविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता तमाम शेतकरी बांधवांना प्रेरणादायी ठरणारी आहे. या अनोख्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.  आपला देश कृषीप्रधान आहे. गाय, म्हैस आदी पाळीव प्राण्यावर जीवापाड प्रेम करणारे शेतकरी आपण अनेकवेळा पाहिले आहेत. इतकेच नव्हे तर आपल्या काळ्या आईची सेवा अंगात रग असेपर्यंत करणारे शेतकरी आजही पहावयास मिळतात. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील आण्णासो चौगुले यांनी ट्रॅक्‍टरचा वाढदिवस साजरा करून समाजासमोर एक आगळेवेगळे उदाहरण दिले आहे. आई, पत्नी आणि मुलगा यांच्यामदतीने आण्णासो स्वतःची तीन एकर शेती करतात. 3 मार्च 2018 रोजी नवीन ट्रॅक्‍टर त्यांनी खरेदी केला. परिसरातील सांगाव, सुळकुड, रेंदाळ, रांगोळी, इंगळी, मांगूर आदी गावात मशागतीची अनेक कामे त्यांनी केली. काम जास्त असल्याने आणखी एक ट्रॅक्‍टर त्यांनी खरेदी केला. ट्रॅक्‍टरवर जीवापाड प्रेम असल्याने आणि त्यामुळेच आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याची भावना त्यांनी कायम जपली.  हे पण वाचा - इगो दुखावला की कायदा अन्‌ गोरगरीबांना इंग्लिशमधून शिव्या  निमंत्रण पत्रिका छापून त्यांनी अनेकांना निमंत्रण दिले. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमास अनेक शेतकऱ्यांनी हजेरी लावली. हार तुरे स्विकारले तेही ट्रॅक्‍टरसाठीच. स्नेहभोजनाचा आस्वाद घेत अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, सौरभ शेट्टी, प्रभू भोजे, अविनाश मगदूम, अजित शेटे, राहुल हेरवाडे, राजेंद्र झांजगे आदीसह महिला, शेतकरी उपस्थित होते.  ट्रॅक्‍टर घेण्याची लहानपणापासून इच्छा होती. स्वतःच्या मुलाप्रमाणे वाहनांना जपले प्रामाणिकपणाने काम केल्यामुळे मला यश आले. शेती आणि ट्रॅक्‍टरला मी घरची लक्ष्मी मानतो. म्हणून ट्रॅक्‍टरचा वाढदिवस साजरा केला.  -आण्णासो चौगुले, शेतकरी, कसबा सांगाव.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/32Y7rhq

No comments:

Post a Comment