via News Story Feeds https://ift.tt/2uE55ri
Wednesday, February 26, 2020
New
रॅम्पवॉक, लावणी अन् नृत्याविष्कार बेला लोळगे विजेती; मिताली फर्स्ट रनरअप, रिया सेकंड रनरअप पुणे - मॉडेल बनण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या लावण्यवतींचा रॅम्पवॉक... संध्याकाळच्या गारव्याला सोबत घेऊन रंगलेली लावणी, नृत्याविष्कार आणि शेवटी प्रत्येकाची उत्कंठा शिगेला पोचविणारा निकालाचा क्षण... अशा रंगतदार सोहळ्यात औत्सुक्याला आनंदाची झळाळी लाभली आणि औरंगाबादच्या बेला लोळगे हिच्या नावाची घोषणा झाली... यंदाचा ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०२०’ हा क्राऊन तिच्या माथी झळाळला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०२०’ स्पर्धेचा रंगारंग सोहळा अमानोरा द फर्न हॉटेल्स अँड क्लब येथे मंगळवारी रंगला होता. राज्यभरातील अन् अंतिम फेरीत पोचलेल्या २१ सौंदर्यवतींचे कौशल्य आणि बुद्धीचा कस लावणाऱ्या या सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, नृत्यांगना परीक्षक म्हणून लाभले होते. रॅम्पवॉक करताना त्यांच्यातील आत्मविश्वास, सादरीकरणातील कौशल्य, त्यांच्या अंगी असलेले कलागुण यांची एकेक चाचणी घेत परीक्षकांनी शेवटी त्यांना प्रश्न विचारून त्यांच्या बुद्धीचा आवाकाही जोखला आणि अखेर बेला हिची ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०२०’ म्हणून निवड करण्यात आली. पुण्यातील मिताली श्रीवास्तव हिची फर्स्ट रनरअप आणि रिया जोशी हिची सेकंड रनरअप क्राऊनसाठी निवड झाली. अंतिम निकालासाठी २१ जणींमधून नऊ जणींची निवड करण्यात आली होती. परीक्षकांच्या प्रश्नांना त्यांनी आत्मविश्वासाने उत्तरे तर दिलीच; याशिवाय मूल्यांची जोपासना, तरुणींमधील असामान्य कर्तृत्व आणि आत्मविश्वास, यावर त्यांनी भाष्य केले. विजेत्यांची नावे घोषित होताच उपस्थितांनीही जल्लोष करीत त्यांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद देत त्यांना शुभेच्छा दिल्या. सर्वांची उत्कंठा वाढविणाऱ्या या स्पर्धेदरम्यान या सौंदर्यवतींनी सिनेसंगीतावर नृत्याविष्कार सादर केले. काहींनी अभिनयाची चुणूकही दाखविली. या चैतन्यमयी सोहळ्याचे सूत्रसंचालन नेहा देशपांडे आणि योगेश देशपांडे यांनी केले. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’ आहेत. सहप्रायोजक रावेतकर ग्रुप व सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आहेत; तसेच हेअर अँड मेकअप पार्टनर लीझ ब्यूटी सेंटर अँड स्पा, फॅशन पार्टनर आयएनआयएफडी पिंपरी-चिंचवड, इथेनिकवेअर पार्टनर हस्तकला सारीज, वेलनेस पार्टनर डॉ. बनसोडेज आयुर्वेद पंचकर्म रिसर्च सेंटर, बिस्पोक काऊचर पार्टनर फ्रेंच नॉट, अस्थेटिक पार्टनर स्किनटिलेटिंग, ट्रॅव्हल पार्टनर गिरिकंद हॉलिडेज, कोरिओग्राफर अँड टॅलेंट ग्रुमर लोवेल प्रभू, फॅशन फोटोग्राफर जितेश पाटील आणि व्हेनू पार्टनर अमनोरा द फर्न हॉटेल अँड क्लब, हे आहेत. ज्युरींची नावे १) सिद्धार्थ जाधव २) पुष्कर जोग ३) स्मिता गोंदकर ४) रेशम टिपणीस ५) रीना अग्रवाल ६) डॉ. रेणू गाडगीळ ७) पूजा बोरीले ८) सौरभ गोखले ९) अनुजा साठे १०) मृण्मयी कोलवलकर स्पर्धेतील अन्य पुरस्कार... मिस टॅलेंटेड : प्राजक्ता टकले मिस ब्युटीफुल हेअर : श्रद्धा कोळपकर मिस बेस्ट ड्रेस : अवंती बापट मिस ब्युटीफुल स्माइल : रिया जोशी मिस फोटोजेनिक : श्रद्धा कोळपकर मिस फॅशन आयकॉन : मिताली श्रीवास्तव मिस कॉन्फिडंट : मृगा गोखले मिस कंजेनिॲलिटी : कोमल प्रांजळे मिस ग्लोइंग स्किन : धनश्री कोरगावकर मिस परफेक्ट टेन : बेला लोळगे ‘पू. ना. गाडगीळ अँड सन्स’चा ‘मिस व्ह्युवर चॉइस’ ः सलोनी कडू अंतिम फेरीतील २१ स्पर्धक १) गायत्री नीलकंठ ताम्हनकर (पुणे) २) सेजल सुनील अडके (कोल्हापूर) ३) अश्विनी राहुल बनसोडे (पुणे) ४) समृद्धी विलास गायकवाड (सोलापूर) ५) मिताली विनोद श्रीवास्तव (मुंबई) ६) मृगा विनायक गोखले (पुणे) ७) अभिलाषा भूषण मंजुळे (नागपूर) ८) ऐश्वर्या ढेकणे (मुंबई) ९) योगिता हनुमंत जाधव (पुणे) १०) धनश्री नंदकिशोर कोरगावकर (पुणे) ११) सोनाली प्रमोद पाध्ये (सांगली) १२) आदिती राजेश यादव (पुणे) १३) ऋतुजा राजेंद्र गिरमे (पुणे) १४) प्राजक्ता हनुमंत टकले (पुणे) १५) बेला संदीप लोळगे (औरंगाबाद) १६) अवंती रवींद्र बापट (पुणे) १७) सलोनी कडू (पुणे) १८) मृदुला राजीव बेलापुरे (जळगाव) १९) कोमल कैलास प्रांजळे (अकोला) २०) श्रद्धा कोळपकर (नाशिक) २१) रिया वल्लभ जोशी (पुणे) News Story Feeds https://ift.tt/2wax6H4

About Latest news updates
Sai Digital Advertisement, Maharashtra providing website development | website designing | seo | smo | digital marketing | banner advertising | and much more in all over india and word wide
सकाळ latest updates
Labels:
News Story Feeds,
सकाळ latest updates
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment