Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, May 29, 2020

राज्यात ३० लाख ५८ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप

राज्यात ३० लाख ५८ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप

May 29, 2020 0 Comments
 कोणी उपाशी राहू नये म्हणून मजूर, कामगार आणि गरिबांना राज्यशासनाच्यावतीने केवळ पाच रुपयांत शिवभोजन उपल्ध करुन देण्यात आले.  from Zee24 Taa...
Read More
कोरोना महाराष्ट्र: अजित पवार - शाळा 1 जुलैला सुरू करण्याचा विचार #5मोठ्याबातम्या
डोनाल्ड ट्रंप : अमेरिका आणि WHO यांच्यातले संबंध संपुष्टात
रैना बोले- इन्हें चुनूंगा लॉकडाउन पार्टनर, इस वजह से पसंद है उनका साथ https://ift.tt/2ZNBwAE
Horoscope Today, 30 May: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/eA8V8J
चीन के साथ विवाद पर US से बोले राजनाथ- बातचीत से ही सुलझाएंगे विवाद https://ift.tt/3gCTxYg
मोदी सरकार 2.0 का एक साल: सरकार के सामने आगे चुनौतियों भरा रास्ता https://ift.tt/2yM3UYT
कोरोना महाराष्ट्र : उद्धव ठाकरे स्वतः घराबाहेर का पडत नाहीयेत?
सलमान खान की धमाकेदार ईद बॉक्स ऑफिस ओपनिंग- आंकड़े देखकर होश उड़ जाएंगे

सलमान खान की धमाकेदार ईद बॉक्स ऑफिस ओपनिंग- आंकड़े देखकर होश उड़ जाएंगे

May 29, 2020 0 Comments
साल 2020 में ईद सिनेमाघरों और बॉक्स ऑफिस पर सूनी गुजरने वाली है। जहां इस दिन एक साथ दो सुपरस्टार्स की फिल्म रिलीज होने वाली थी, वहीं कोरोना ...
Read More
वाकडमधील 'या' भागात आज वीज नसेल

पिंपरी : वाकड परिसरातील काही भागांत वीजप्रवाह आज (शनिवार) सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत बंद राहणार आहे. या काळात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) तांत्रिक दुरुस्ती करणार आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मॉन्सूनपूर्व कामाचा एक भाग म्हणून ही दुरुस्ती केली जात आहे. शहराच्या विविध भागात दर आठवड्याला ही कामे केली जातात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या भागात नसेल वीज : 
मालपानी ग्रिन्स, सोनिगरा, रिध्दी-सिध्दी, अक्षय हाईट्स, माउंट वर्ल्ड, कल्पतरू स्प्लेंडर. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

वाकडमधील 'या' भागात आज वीज नसेल पिंपरी : वाकड परिसरातील काही भागांत वीजप्रवाह आज (शनिवार) सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत बंद राहणार आहे. या काळात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) तांत्रिक दुरुस्ती करणार आहे. पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मॉन्सूनपूर्व कामाचा एक भाग म्हणून ही दुरुस्ती केली जात आहे. शहराच्या विविध भागात दर आठवड्याला ही कामे केली जातात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या भागात नसेल वीज :  मालपानी ग्रिन्स, सोनिगरा, रिध्दी-सिध्दी, अक्षय हाईट्स, माउंट वर्ल्ड, कल्पतरू स्प्लेंडर.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Md8ySE
Read More
औरंगाबाद महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय : ही प्रमाणपत्रे मिळणार घरपोच

औरंगाबाद : जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासह विविध परवाने घेण्यासाठी नागरिकांना महापालिकेत खेट्या माराव्या लागतात. मात्र, आता हे प्रमाणपत्र घरपोच मिळणार आहेत. स्मार्ट सिटीतून ४० कोटी रुपये खर्च करून महापालिका प्रशासन ई-शासन प्रणाली विकसित करत असून, नागरिकांना घरपोच प्रमाणपत्र देण्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी वेगळे शुल्क आकारले जाईल. घरपोचसोबतच महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये प्रमाणपत्र देण्याची सोय असेल, असे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी (ता. २९) सांगितले. 

पत्रकारांसोबत बोलताना पांडेय म्हणाले, की शहरातील नागरिकांना महापालिकेमार्फत जन्म-मृत्यू, बांधकाम परवानगी, मांसविक्री, विवाह नोंदणी यासह विविध प्रमाणपत्रे दिली जातात. त्यासाठी अनेकांना वारंवार महापालिकेत चकरा माराव्या लागतात. प्रमाणपत्र देण्यासाठी सध्या महापालिकेत असलेली यंत्रणा कालबाह्य झालेली आहे. त्यामुळे विलंब होतो. आता स्मार्ट सिटी योजनेतून महापालिकेत ई-शासन प्रणाली विकसित केली जाणार आहे. सुमारे ४० कोटी रुपये त्यावर खर्च केले जातील. ही प्रणाली विकसित झाल्यानंतर नागरिकांना वेळेत प्रमाणपत्र मिळतील. तसेच प्रमाणपत्र घरपोच देण्याची सुविधादेखील असेल. त्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. ज्यांना घरपोच प्रमाणपत्र हवे असेल, त्यांच्यासाठी वेगळे शुल्क असेल. यासोबतच महापालिकेच्या विविध कार्यालयांमार्फतदेखील प्रमाणपत्र घेण्याची सोय असेल, असे पांडेय यांनी सांगितले. 

सावधान!! कोविडच्या मृत्युदरात औरंगाबाद देशापेक्षाही आहे पुढे
   
उत्पन्नवाढीसाठी होईल मदत 
ई-शासन प्रणालीचा महापालिकेचे उत्पन्न वाढण्यासाठीही उपयोग होईल. मालमत्ता कर, पाणीपट्टीचे मागणीपत्र, तसेच पुढे वसुलीसाठीदेखील याच संस्थेची मदत घेतली जाईल. जूनमध्ये निविदा काढली जाणार असून, सहा महिन्यात ई-शासन प्रणाली विकसित होणार असल्याचे पांडेय यांनी सांगितले. 

कामगारांना पूर्ण पगार मिळालाच नाही, कोर्टाचे दरवाजे ठोठावले अन...
 
यापूर्वी केला होता कोट्यवधींचा खर्च 
महापालिकेने यापूर्वी सर्व विभागांचे संगणकीकरण करीत त्यावर कोट्यवधींचा खर्च केला होता. मात्र, अधिकाऱ्यांनी या यंत्रणेचा वापरच केला नसल्यामुळे संगणक अनेक वर्षे धूळ खात होते. आजही महापालिकेतील सर्व फायली हातोहातच फिरतात. त्यात कामांना विलंब होतो. त्यामुळे महापालिकेचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवत, याप्रकरणी चौकशीही करण्यात आली. काही वर्षांपूर्वीच या कंत्राटदाराचे शेवटचे बिल देण्यात आले होते. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

औरंगाबाद महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय : ही प्रमाणपत्रे मिळणार घरपोच औरंगाबाद : जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासह विविध परवाने घेण्यासाठी नागरिकांना महापालिकेत खेट्या माराव्या लागतात. मात्र, आता हे प्रमाणपत्र घरपोच मिळणार आहेत. स्मार्ट सिटीतून ४० कोटी रुपये खर्च करून महापालिका प्रशासन ई-शासन प्रणाली विकसित करत असून, नागरिकांना घरपोच प्रमाणपत्र देण्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी वेगळे शुल्क आकारले जाईल. घरपोचसोबतच महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये प्रमाणपत्र देण्याची सोय असेल, असे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी (ता. २९) सांगितले.  पत्रकारांसोबत बोलताना पांडेय म्हणाले, की शहरातील नागरिकांना महापालिकेमार्फत जन्म-मृत्यू, बांधकाम परवानगी, मांसविक्री, विवाह नोंदणी यासह विविध प्रमाणपत्रे दिली जातात. त्यासाठी अनेकांना वारंवार महापालिकेत चकरा माराव्या लागतात. प्रमाणपत्र देण्यासाठी सध्या महापालिकेत असलेली यंत्रणा कालबाह्य झालेली आहे. त्यामुळे विलंब होतो. आता स्मार्ट सिटी योजनेतून महापालिकेत ई-शासन प्रणाली विकसित केली जाणार आहे. सुमारे ४० कोटी रुपये त्यावर खर्च केले जातील. ही प्रणाली विकसित झाल्यानंतर नागरिकांना वेळेत प्रमाणपत्र मिळतील. तसेच प्रमाणपत्र घरपोच देण्याची सुविधादेखील असेल. त्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. ज्यांना घरपोच प्रमाणपत्र हवे असेल, त्यांच्यासाठी वेगळे शुल्क असेल. यासोबतच महापालिकेच्या विविध कार्यालयांमार्फतदेखील प्रमाणपत्र घेण्याची सोय असेल, असे पांडेय यांनी सांगितले.  सावधान!! कोविडच्या मृत्युदरात औरंगाबाद देशापेक्षाही आहे पुढे     उत्पन्नवाढीसाठी होईल मदत  ई-शासन प्रणालीचा महापालिकेचे उत्पन्न वाढण्यासाठीही उपयोग होईल. मालमत्ता कर, पाणीपट्टीचे मागणीपत्र, तसेच पुढे वसुलीसाठीदेखील याच संस्थेची मदत घेतली जाईल. जूनमध्ये निविदा काढली जाणार असून, सहा महिन्यात ई-शासन प्रणाली विकसित होणार असल्याचे पांडेय यांनी सांगितले.  कामगारांना पूर्ण पगार मिळालाच नाही, कोर्टाचे दरवाजे ठोठावले अन...   यापूर्वी केला होता कोट्यवधींचा खर्च  महापालिकेने यापूर्वी सर्व विभागांचे संगणकीकरण करीत त्यावर कोट्यवधींचा खर्च केला होता. मात्र, अधिकाऱ्यांनी या यंत्रणेचा वापरच केला नसल्यामुळे संगणक अनेक वर्षे धूळ खात होते. आजही महापालिकेतील सर्व फायली हातोहातच फिरतात. त्यात कामांना विलंब होतो. त्यामुळे महापालिकेचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवत, याप्रकरणी चौकशीही करण्यात आली. काही वर्षांपूर्वीच या कंत्राटदाराचे शेवटचे बिल देण्यात आले होते.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Ah8cYx
Read More
आवड असेल तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात नक्कीच यशस्वी होता वाचा सविस्तर...

नाव - अश्विनी भावसार शाह 
गाव - ठाणे 
व्यवसाय - कॉर्पोरेट गिफ्टिंग 
वय - ३१ वर्षे 

ती स्वच्छंदी, आनंदी, मनमोकळी. आम्ही केवळ फेसबुक मैत्रीणी. तिच्या आणि तिच्या आगळ्यावेगळ्या कामाची ओळखही फेसबुकच्या माध्यमातूनच झाली. मात्र प्रत्यक्ष बोलणे आज या लेखाच्या निमित्ताने झाले. तिच्या पोस्ट्समधून उलगडलेली ती तिच्या प्रत्यक्ष जीवनातही 'ऑन डिफरंट ट्रॅक' या शिर्षकप्रमाणेच थोड्या हटके मार्गावरून चालणारी आहे. ती आपली नवीन मैत्रीण अश्विनी.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कॉर्पोरेट क्षेत्रात सणासुदीला किंवा एखाद्या खास प्रसंगी सहकाऱ्यांना ‘गिफ्ट’ दिले जातात. पण बऱ्याचदा गिफ्ट निवडीबाबत संभ्रम असतो. मग अशावेळी समोर येते ते ‘गिफ्टबड्स’ हे ‘कार्पोरेट गिफ्टींग मधील नावाजेले नाव. गिफ्टबड्स, गिफ्ट निवडीबाबत संपूर्ण मार्गदर्शन करते व इच्छुक ठिकाणी उत्तम पॅकिंग करून तुमचे गिफ्ट पोचवतेही. उच्चशिक्षण, चांगल्या पगाराची नोकरी असे सगळे व्यवस्थित सुरू असताना काही कारणाने पहिली नोकरी सोडावी लागली. पण लगेचच तिला हवी तशी नवी नोकरी मिळालीही. ‘हाच तो आयुष्याला कलाटणी देणारा क्षण आणि याचे सर्व श्रेय मी माझा नवरा हर्षिल याला देते. त्याने त्याक्षणी नोकरी किंवा उद्योग यांतील मला योग्य वाटेल ते करण्याचा सल्ला दिला, त्यानुसार मी स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आधीच्या नोकरीत तो माझा वरिष्ठ असल्यामुळे व्यवहार, मार्केटिंग हे मी त्याच्याकडून शिकलेच होते. आता मला माझ्या उद्योगातही त्याच्या या कौशल्यांचा नेहमीच उपयोग होतो,’ असे अश्विनी सांगते. सुरुवातीला नवऱ्याकडून मिळालेल्या केवळ पाच हजार इतक्या कमी भांडवलात सुरु झालेला व्यवसाय पहिल्याच वर्षी सुमारे तीन लाख आणि आज तीन वर्षांनी सुमारे अठरा लाखांची उलाढाल करू शकला, कारण ‘मेहनत, क्रिएटव्हिटी, नेटवर्क आणि प्रेझेन्टेशन’ या चार गोष्टींचा वापर आम्ही आमच्या व्यवसायात करतो. शिवाय ‘आवड असेल तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात नक्कीच यशस्वी होता. फक्त स्वतःवर व स्वतःच्या कामावर विश्वास हवा,’ आणि ‘पुढे जायचे असेल तर मागचे रस्ते बंद करा, म्हणजे परत फिरण्याचा मार्गच उरत नाही,’ असे कानमंत्रही ती आवर्जून देते. केवळ आवड, मेहनत, क्रिएटव्हिटी, नेटवर्क, प्रेझेन्टेशन, आत्मविश्वास आणि किरकोळ भांडवलातही व्यवसाय सुरू करून यशस्वी होता येते, हे अश्विनीच्या उदाहरणातून समजते. 

चला तर मग, तुम्हीही तयार व्हा ‘डिफरंट ट्रॅक’वर चालण्यासाठी... 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आवड असेल तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात नक्कीच यशस्वी होता वाचा सविस्तर... नाव - अश्विनी भावसार शाह  गाव - ठाणे  व्यवसाय - कॉर्पोरेट गिफ्टिंग  वय - ३१ वर्षे  ती स्वच्छंदी, आनंदी, मनमोकळी. आम्ही केवळ फेसबुक मैत्रीणी. तिच्या आणि तिच्या आगळ्यावेगळ्या कामाची ओळखही फेसबुकच्या माध्यमातूनच झाली. मात्र प्रत्यक्ष बोलणे आज या लेखाच्या निमित्ताने झाले. तिच्या पोस्ट्समधून उलगडलेली ती तिच्या प्रत्यक्ष जीवनातही 'ऑन डिफरंट ट्रॅक' या शिर्षकप्रमाणेच थोड्या हटके मार्गावरून चालणारी आहे. ती आपली नवीन मैत्रीण अश्विनी. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  कॉर्पोरेट क्षेत्रात सणासुदीला किंवा एखाद्या खास प्रसंगी सहकाऱ्यांना ‘गिफ्ट’ दिले जातात. पण बऱ्याचदा गिफ्ट निवडीबाबत संभ्रम असतो. मग अशावेळी समोर येते ते ‘गिफ्टबड्स’ हे ‘कार्पोरेट गिफ्टींग मधील नावाजेले नाव. गिफ्टबड्स, गिफ्ट निवडीबाबत संपूर्ण मार्गदर्शन करते व इच्छुक ठिकाणी उत्तम पॅकिंग करून तुमचे गिफ्ट पोचवतेही. उच्चशिक्षण, चांगल्या पगाराची नोकरी असे सगळे व्यवस्थित सुरू असताना काही कारणाने पहिली नोकरी सोडावी लागली. पण लगेचच तिला हवी तशी नवी नोकरी मिळालीही. ‘हाच तो आयुष्याला कलाटणी देणारा क्षण आणि याचे सर्व श्रेय मी माझा नवरा हर्षिल याला देते. त्याने त्याक्षणी नोकरी किंवा उद्योग यांतील मला योग्य वाटेल ते करण्याचा सल्ला दिला, त्यानुसार मी स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आधीच्या नोकरीत तो माझा वरिष्ठ असल्यामुळे व्यवहार, मार्केटिंग हे मी त्याच्याकडून शिकलेच होते. आता मला माझ्या उद्योगातही त्याच्या या कौशल्यांचा नेहमीच उपयोग होतो,’ असे अश्विनी सांगते. सुरुवातीला नवऱ्याकडून मिळालेल्या केवळ पाच हजार इतक्या कमी भांडवलात सुरु झालेला व्यवसाय पहिल्याच वर्षी सुमारे तीन लाख आणि आज तीन वर्षांनी सुमारे अठरा लाखांची उलाढाल करू शकला, कारण ‘मेहनत, क्रिएटव्हिटी, नेटवर्क आणि प्रेझेन्टेशन’ या चार गोष्टींचा वापर आम्ही आमच्या व्यवसायात करतो. शिवाय ‘आवड असेल तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात नक्कीच यशस्वी होता. फक्त स्वतःवर व स्वतःच्या कामावर विश्वास हवा,’ आणि ‘पुढे जायचे असेल तर मागचे रस्ते बंद करा, म्हणजे परत फिरण्याचा मार्गच उरत नाही,’ असे कानमंत्रही ती आवर्जून देते. केवळ आवड, मेहनत, क्रिएटव्हिटी, नेटवर्क, प्रेझेन्टेशन, आत्मविश्वास आणि किरकोळ भांडवलातही व्यवसाय सुरू करून यशस्वी होता येते, हे अश्विनीच्या उदाहरणातून समजते.  चला तर मग, तुम्हीही तयार व्हा ‘डिफरंट ट्रॅक’वर चालण्यासाठी...  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZL0CjE
Read More
घुंगराची खुळखुळ थांबली, उसाची झाली चिपाडं 

औरंगाबाद  : रणरणत्या उन्हात तहानेने घसा सुकायला होतो,तोंडाला कोरड पडते अशावेळी सहाजिकच घुंगरांचा खुऽ ळ , खुऽ ळ असा आवाज कानावर पडल्यानंतर रसवंतीकडे पावले वळतात. घशाखाली ऊसाच्या रसाचा घोट उतरताच कसं गाऽऽ र वाटते. मात्र यंदा नेमके उन्हाळ्याच्या तोंडावरच कोरोनाची साथ आली आणि रसवंती चालकांच्याच घशाला कोरड पडण्याची वेळ आली. ऊसाची पार चिपाडं होऊन गेली, नुकसान झाले सारा धंदाच बसला. असाच फटका रसवंत्यांना ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांनाही सहन करावा लागला. शेतात उभा ऊस जनावरांना खाऊ घालण्याची वेळ आली आहे. 

कोरोना आला आणि अनेकांच्या जगण्याचे साधनच अधू झाले. अशीच परिस्थिती रसवंती चालकांच्या व त्यांना ऊस पुरवणाऱ्या शेतकऱ्यांची झाली आहे. दर वर्षी शहरात किमान ३०० ते ४०० रसवंत्या लागतात. रसवंत्या सुरू करण्यासाठी महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडून जागेसाठी परवानगी घ्यावी लागते. यावर्षी महापालिकेने परवानग्या देण्यापूर्वी कोरोनाचे संकट आले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

तीस हजाराचा ऊस वाळून गेला 

सिडको बसस्थानकावर वर्षभर रसवंती चालवणारे नवनाथ रसवंतीगृहाचे संजय पाटील म्हणाले, वर्षभर रसवंती चालू असते. मोठ्या संख्येने इथे प्रवासी येतात. चांगला सीझन सुरू होईल यासाठी मार्चमध्ये जास्तीचा ऊस मागवून ठेवला. पण कोरोनामुळे ३० हजाराचा ऊस जागेवरच वाळून गेला आहे. 

दरवर्षी दोन तीन रसवंत्या चालवणारे ज्ञानेश्‍वर शेळके म्हणाले, माझा रसवंतीच पूर्ण आधार असते. गेल्यावर्षी तीन रसवंत्या होत्या. यावर्षी दोन ठिकाणी रसवंत्या सुरू केल्या होत्या. मात्र धंदा जोमात येण्याच्यावेळीच लॉकडाऊन सुरू झाले आणि अडीच टन ऊस शिल्लक राहिला. साडे सहा हजार टन भावाने ऊस घेतला होता. पूर्ण ऊस वाळून गेला. हा ऊस नाइलाजाने जाधववाडी येथे जनावरांसाठी चारा करण्यासाठी तसाच देऊन टाकावा लागला. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

घाट्यात द्यावा लागला चाऱ्यासाठी ऊस 

फुलंब्री तालुक्यातील सांजुळचे शेतकरी कल्याण जाधव शहरातील रसवंत्यांना ऊसाचा पुरवठा करतात. त्यांच्यावरही कोरोनाने नुकसान सहन करण्याची वेळ आणली.श्री.जाधव म्हणाले, दोन एकरात ऊस यंदा तयार होता. शहरातील १५-१५ रसवंत्यांना ऊस देत असतो. लॉकडाऊनच्या आधी काहींना ऊस दिला त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाला त्या ऊसाचे पैसेही अडकून पडले आहेत. आता तर सारा सीझन गेला त्यामुळे आता ऊस कोणी घेईल अशी परिस्थिती राहिली नाही. रसवंत्यांना ५ हजार रूपये टन दराने ऊस देत असतो पण यंदा १ हजार रुपये टन दराने जनावरांना चार तयार करण्यासाठी द्यावा लागला. यंदा सारा घाट्याचाच सौदा झाला.यातून कसे बाहेर निघू येणारा काळच सांगेल असे ते म्हणाले. 

बहुतांश ठिकाणी रसवंत्यांची नावे नवनाथ
 
बहुतांश ठिकाणी रसवंत्यांची नावे नवनाथ रसवंती, कानिफनाथ रसवंती अशीच वाचायला मिळतात. नावावरून ही कोणा एका व्यक्तीच्याच रसवंती असतील असे वाटावे मात्र याचे कारण यापेक्षा वेगळे आहे. नवनाथ रसवंतीचे जयवंत फडतरे यांनी सांगितले, ऊसाच्या रसाला रसवंतीच्या माध्यमातून कमर्शियल स्वरूप दिले ते पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील बोपगाव इथल्या शेतकऱ्यांनी. बोपगावात नवनाथांपैकी एक असलेले कानिफनाथांचे गुहेमध्ये मंदिर आहे. आपल्या गावाची ओळख, श्रद्धास्थान असलेल्या नवनाथांचे रसवंतीला नाव दिले जाते तर शेतकऱ्याला मदत करणाऱ्या बैलांची सतत आठवण राहावी यासाठी बैलाच्या गळ्यातील घुंगरमाळेतील घुंगरं रसाच्या चरख्याला बांधत असल्याचे सांगितले. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

घुंगराची खुळखुळ थांबली, उसाची झाली चिपाडं  औरंगाबाद  : रणरणत्या उन्हात तहानेने घसा सुकायला होतो,तोंडाला कोरड पडते अशावेळी सहाजिकच घुंगरांचा खुऽ ळ , खुऽ ळ असा आवाज कानावर पडल्यानंतर रसवंतीकडे पावले वळतात. घशाखाली ऊसाच्या रसाचा घोट उतरताच कसं गाऽऽ र वाटते. मात्र यंदा नेमके उन्हाळ्याच्या तोंडावरच कोरोनाची साथ आली आणि रसवंती चालकांच्याच घशाला कोरड पडण्याची वेळ आली. ऊसाची पार चिपाडं होऊन गेली, नुकसान झाले सारा धंदाच बसला. असाच फटका रसवंत्यांना ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांनाही सहन करावा लागला. शेतात उभा ऊस जनावरांना खाऊ घालण्याची वेळ आली आहे.  कोरोना आला आणि अनेकांच्या जगण्याचे साधनच अधू झाले. अशीच परिस्थिती रसवंती चालकांच्या व त्यांना ऊस पुरवणाऱ्या शेतकऱ्यांची झाली आहे. दर वर्षी शहरात किमान ३०० ते ४०० रसवंत्या लागतात. रसवंत्या सुरू करण्यासाठी महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडून जागेसाठी परवानगी घ्यावी लागते. यावर्षी महापालिकेने परवानग्या देण्यापूर्वी कोरोनाचे संकट आले.  औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा तीस हजाराचा ऊस वाळून गेला  सिडको बसस्थानकावर वर्षभर रसवंती चालवणारे नवनाथ रसवंतीगृहाचे संजय पाटील म्हणाले, वर्षभर रसवंती चालू असते. मोठ्या संख्येने इथे प्रवासी येतात. चांगला सीझन सुरू होईल यासाठी मार्चमध्ये जास्तीचा ऊस मागवून ठेवला. पण कोरोनामुळे ३० हजाराचा ऊस जागेवरच वाळून गेला आहे.  दरवर्षी दोन तीन रसवंत्या चालवणारे ज्ञानेश्‍वर शेळके म्हणाले, माझा रसवंतीच पूर्ण आधार असते. गेल्यावर्षी तीन रसवंत्या होत्या. यावर्षी दोन ठिकाणी रसवंत्या सुरू केल्या होत्या. मात्र धंदा जोमात येण्याच्यावेळीच लॉकडाऊन सुरू झाले आणि अडीच टन ऊस शिल्लक राहिला. साडे सहा हजार टन भावाने ऊस घेतला होता. पूर्ण ऊस वाळून गेला. हा ऊस नाइलाजाने जाधववाडी येथे जनावरांसाठी चारा करण्यासाठी तसाच देऊन टाकावा लागला.  मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा घाट्यात द्यावा लागला चाऱ्यासाठी ऊस  फुलंब्री तालुक्यातील सांजुळचे शेतकरी कल्याण जाधव शहरातील रसवंत्यांना ऊसाचा पुरवठा करतात. त्यांच्यावरही कोरोनाने नुकसान सहन करण्याची वेळ आणली.श्री.जाधव म्हणाले, दोन एकरात ऊस यंदा तयार होता. शहरातील १५-१५ रसवंत्यांना ऊस देत असतो. लॉकडाऊनच्या आधी काहींना ऊस दिला त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाला त्या ऊसाचे पैसेही अडकून पडले आहेत. आता तर सारा सीझन गेला त्यामुळे आता ऊस कोणी घेईल अशी परिस्थिती राहिली नाही. रसवंत्यांना ५ हजार रूपये टन दराने ऊस देत असतो पण यंदा १ हजार रुपये टन दराने जनावरांना चार तयार करण्यासाठी द्यावा लागला. यंदा सारा घाट्याचाच सौदा झाला.यातून कसे बाहेर निघू येणारा काळच सांगेल असे ते म्हणाले.  बहुतांश ठिकाणी रसवंत्यांची नावे नवनाथ   बहुतांश ठिकाणी रसवंत्यांची नावे नवनाथ रसवंती, कानिफनाथ रसवंती अशीच वाचायला मिळतात. नावावरून ही कोणा एका व्यक्तीच्याच रसवंती असतील असे वाटावे मात्र याचे कारण यापेक्षा वेगळे आहे. नवनाथ रसवंतीचे जयवंत फडतरे यांनी सांगितले, ऊसाच्या रसाला रसवंतीच्या माध्यमातून कमर्शियल स्वरूप दिले ते पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील बोपगाव इथल्या शेतकऱ्यांनी. बोपगावात नवनाथांपैकी एक असलेले कानिफनाथांचे गुहेमध्ये मंदिर आहे. आपल्या गावाची ओळख, श्रद्धास्थान असलेल्या नवनाथांचे रसवंतीला नाव दिले जाते तर शेतकऱ्याला मदत करणाऱ्या बैलांची सतत आठवण राहावी यासाठी बैलाच्या गळ्यातील घुंगरमाळेतील घुंगरं रसाच्या चरख्याला बांधत असल्याचे सांगितले.  महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36HA2JC
Read More