Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, July 3, 2020

सिंधुदुर्गला हवामान खात्याचा इशारा, सात जुलैपर्यंत `हा` अंदाज

ओरोस (सिंधुदुर्ग) -  जिल्ह्यात 7 जुलैपर्यंत अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तविला आहे. तरी जिल्ह्यातील जनतेने याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 
दरम्यान, आंबेरी (ता. कुडाळ) पुलावर आणि पिसेकामते व बिडवाडी फाट्याजवळ (ता. कणकवली) मोठ्या प्रमाणात नदीला पुराचे पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. चिंदर गावठणवाडी (ता. मालवण) येथील दत्ताराम कदम यांच्या घराचे छत कोसळून नुकसान झाले आहे. 

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत मालवण तालुक्‍यात सर्वाधित 197 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात सरासरी 121.6 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग 181 (1229), सावंतवाडी 20 (1389), वेंगुर्ले 128.8 (1425.8), कुडाळ 145 (1213), मालवण 197 (1742), कणकवली 184 (1211), देवगड 40 (1198), वैभववाडी 77 (1277), असा पाऊस झाला आहे. 

सतर्क राहा... 
आपत्ती व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार जोरदार पावसामुळे वेंगुर्ले तालुक्‍यातील महादेव राजचंद्र कामत यांच्या घरावर झाड कोसळून घराची भिंत पडली. कुडाळ तालुक्‍यातील माणगाव येथील आंबेरी पुलावर आणि कणकवली तालुक्‍यातील पिसेकामते व बिडवाडी फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात नदीला पुराचे पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे, तरी जिल्ह्यातील नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सिंधुदुर्गला हवामान खात्याचा इशारा, सात जुलैपर्यंत `हा` अंदाज ओरोस (सिंधुदुर्ग) -  जिल्ह्यात 7 जुलैपर्यंत अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तविला आहे. तरी जिल्ह्यातील जनतेने याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.  दरम्यान, आंबेरी (ता. कुडाळ) पुलावर आणि पिसेकामते व बिडवाडी फाट्याजवळ (ता. कणकवली) मोठ्या प्रमाणात नदीला पुराचे पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. चिंदर गावठणवाडी (ता. मालवण) येथील दत्ताराम कदम यांच्या घराचे छत कोसळून नुकसान झाले आहे.  जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत मालवण तालुक्‍यात सर्वाधित 197 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात सरासरी 121.6 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग 181 (1229), सावंतवाडी 20 (1389), वेंगुर्ले 128.8 (1425.8), कुडाळ 145 (1213), मालवण 197 (1742), कणकवली 184 (1211), देवगड 40 (1198), वैभववाडी 77 (1277), असा पाऊस झाला आहे.  सतर्क राहा...  आपत्ती व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार जोरदार पावसामुळे वेंगुर्ले तालुक्‍यातील महादेव राजचंद्र कामत यांच्या घरावर झाड कोसळून घराची भिंत पडली. कुडाळ तालुक्‍यातील माणगाव येथील आंबेरी पुलावर आणि कणकवली तालुक्‍यातील पिसेकामते व बिडवाडी फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात नदीला पुराचे पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे, तरी जिल्ह्यातील नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gBIKgr
Read More
पहिल्या दिवशी नियमांचे पालन, दुसऱ्या दिवशी `येरे माझ्या मागल्या`

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यामध्ये कालपासून (ता.2) जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी लॉकडाउन जाहीर केला. याला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला; मात्र आज लॉकडाउनची नागरिकांनी "ऐशी की तैशी' करून ठेवल्याचे दिसून आले. बाजारपेठेत ग्राहकांचा दुचाकीवरून मुक्त संचार होता. पोलिस बंदोबस्त मात्र नावापुरताच दिसून आला. 

कणकवलीत अचानक कोरोनाचे जास्त रुग्ण सापडले तसेच जिल्ह्यातील रुग्णांची संख्याही 200 पार झाल्याने या व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी तातडीने आदेश देत 2 ते 8 जुलै यादरम्यान लॉकडाउन घोषित केला. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना बंदी घालण्यात आली. तसेच विनाकारण बाहेर न फिरण्यांनाही सुचित करण्यात आले. अत्यावश्‍यक सेवेअभावी अन्य कोणीही विनाकारण रस्त्यावर फिरू नये तसेच अत्यावश्‍यक सेवेच्या दुकानाशिवाय अन्य दुकानेही बंद ठेवावीत, असे आदेश लॉकडाउनमध्ये होते.

पहिल्या दिवशी लॉकडाउनला जिल्ह्याभरात चांगला प्रतिसाद मिळाला. येथील शहरात अत्यावश्‍यक सेवेच्या दुकानाशिवाय अन्य दुकानेही बंद होती. कडक बंदोबस्त असल्याने नागरिकांनी घरातच रहाणे पसंत केले. असे असताना दुसऱ्या दिवशीचे लॉकडाउन मात्र पूर्णतः फेल गेल्याचे दिसून आले. आज बाजारपेठेतील काही दुकानेही सुरू होती. बाजारपेठेमध्ये विविध ठिकाणी पोलिस तैनात होते; मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. दुचाकी वाहन गाड्यांना बंदी असतानाही सराईतपणे दुचाकीस्वार शहरात फिरताना दिसून येत होते. त्यावरून नागरिक या लॉकडाउनबाबत नाराज असल्याचे दिसून आले. 

लॉकडाउनमुळे संभ्रमावस्था 
याआधीच जिल्हा व्यापारी संघाकडूनही लॉकडाउनबाबत मोठी नाराजी व्यक्त केली होती. नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची लॉकडाउनबाबत असलेली ही नाराजी उघडपणे दिसून आली. येथील बाजारपेठेत ज्या प्रमाणात नागरिक दाखल झाले होते ते पाहता काही नागरिकांच्या मनात लॉकडाउनमध्ये शिथिलता आणली का? असा प्रश्‍नही निर्माण झाला होता. बाजारात झालेली गर्दी पाहता लॉकडाउनबाबत काही व्यापारी व नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पहिल्या दिवशी नियमांचे पालन, दुसऱ्या दिवशी `येरे माझ्या मागल्या` सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यामध्ये कालपासून (ता.2) जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी लॉकडाउन जाहीर केला. याला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला; मात्र आज लॉकडाउनची नागरिकांनी "ऐशी की तैशी' करून ठेवल्याचे दिसून आले. बाजारपेठेत ग्राहकांचा दुचाकीवरून मुक्त संचार होता. पोलिस बंदोबस्त मात्र नावापुरताच दिसून आला.  कणकवलीत अचानक कोरोनाचे जास्त रुग्ण सापडले तसेच जिल्ह्यातील रुग्णांची संख्याही 200 पार झाल्याने या व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी तातडीने आदेश देत 2 ते 8 जुलै यादरम्यान लॉकडाउन घोषित केला. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना बंदी घालण्यात आली. तसेच विनाकारण बाहेर न फिरण्यांनाही सुचित करण्यात आले. अत्यावश्‍यक सेवेअभावी अन्य कोणीही विनाकारण रस्त्यावर फिरू नये तसेच अत्यावश्‍यक सेवेच्या दुकानाशिवाय अन्य दुकानेही बंद ठेवावीत, असे आदेश लॉकडाउनमध्ये होते. पहिल्या दिवशी लॉकडाउनला जिल्ह्याभरात चांगला प्रतिसाद मिळाला. येथील शहरात अत्यावश्‍यक सेवेच्या दुकानाशिवाय अन्य दुकानेही बंद होती. कडक बंदोबस्त असल्याने नागरिकांनी घरातच रहाणे पसंत केले. असे असताना दुसऱ्या दिवशीचे लॉकडाउन मात्र पूर्णतः फेल गेल्याचे दिसून आले. आज बाजारपेठेतील काही दुकानेही सुरू होती. बाजारपेठेमध्ये विविध ठिकाणी पोलिस तैनात होते; मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. दुचाकी वाहन गाड्यांना बंदी असतानाही सराईतपणे दुचाकीस्वार शहरात फिरताना दिसून येत होते. त्यावरून नागरिक या लॉकडाउनबाबत नाराज असल्याचे दिसून आले.  लॉकडाउनमुळे संभ्रमावस्था  याआधीच जिल्हा व्यापारी संघाकडूनही लॉकडाउनबाबत मोठी नाराजी व्यक्त केली होती. नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची लॉकडाउनबाबत असलेली ही नाराजी उघडपणे दिसून आली. येथील बाजारपेठेत ज्या प्रमाणात नागरिक दाखल झाले होते ते पाहता काही नागरिकांच्या मनात लॉकडाउनमध्ये शिथिलता आणली का? असा प्रश्‍नही निर्माण झाला होता. बाजारात झालेली गर्दी पाहता लॉकडाउनबाबत काही व्यापारी व नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2D8MHus
Read More
कामचुकार ग्रामसेवकांच्या विषयावरून जुंपली..विविध मुद्द्यांवर ताशेरे

देवगड (सिंधुदुर्ग) - कामचुकार ग्रामसेवकांच्या विषयावरून येथील पंचायत समिती मासिक सभेत सदस्य आणि प्रशासनात आज जुंपली. चर्चेतील विविध मुद्यांची सांगड घालीत ग्रामसेवकांच्या कामगिरीवर सदस्यांनी ताशेरे ओढताच उग्दिग्न होत गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांची बाजू लावून धरत विषयाचे खंडण केले. सरसकट सर्वच ग्रामसेवकांना दोषी ठरवणे चुकीचे असल्याचे नमूद करून कोरोनामध्ये ग्रामसेवकांनी चांगली कामगिरी केल्याची पुस्ती गटविकास अधिकाऱ्यांनी जोडली. चांगल्या कामाचे कौतुक होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्‍त केली. 

येथील पंचायत समितीची मासिक सभा सभापती सुनील पारकर यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजी महाराज सभागृहात झाली. उपसभापती अमोल तेली, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रूपाली पाटील, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहायक गटविकास अधिकारी अरूण चव्हाण उपस्थित होते. काही ग्रामसेवकांच्या सुमार कामगिरीमुळे ग्रामीण भागातील विकास ठप्प होत असल्याकडे सदस्य सदाशिव ओगले यांनी लक्ष वेधले. ग्रामसेवक चांगला असल्यास गावचा विकास होतो, असे सांगून ग्रामसेवकांच्या कामगिरीवर ताशेरे ओढले.

अन्य सदस्यांनी साथ देताना काही ग्रामसेवक जाग्यावरच नसल्याचे सांगितले. विकासात्मक प्रश्‍नांची सोडवणूक होण्यासाठी गाव पातळीवर पंचायत समिती सदस्यांची मदत घेणे आवश्‍यक असल्याचे सांगितले. 294 पैकी 65 ताडपत्रींचे प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती समोर येताच ग्रामसेवकांनी याची माहिती दिली नसल्याचे सांगून नाराजीचा सूर आळवला. प्रशासनाच्या समस्या लोकप्रतिनिधींपर्यंत येत नसल्याचे सदस्यांनी सांगितले. 

ग्रामसेवक का लक्ष्य? 
पंचायत समितीच्या सभांमधून वारंवार ग्रामसेवकांना लक्ष्य केले जात असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी नमुद करून भावना तीव्र शब्दात मांडल्या. तक्रारदार ग्रामसेवकांना देवगड तालुक्‍यात पाठवता कशाला? असा प्रश्‍न सदस्य ओगले यांनी उपस्थित केला. पंचायत समिती कृषी विभागाबाबतही चर्चा झाली. शिक्षक मुख्यालयी राहिल्यास शाळा सुरू करण्यात अडचणी येणार नसल्याचे सुचवण्यात आले. दरम्यान, तळवडे धबधब्याजवळ मंजूर ठिकाणाऐवजी काही अंतरावर चेंजीग रूम बांधली जात आहे. त्यामुळे कामाला स्थगिती देण्याची मागणी सदस्य अजित कांबळे यांनी केली. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कामचुकार ग्रामसेवकांच्या विषयावरून जुंपली..विविध मुद्द्यांवर ताशेरे देवगड (सिंधुदुर्ग) - कामचुकार ग्रामसेवकांच्या विषयावरून येथील पंचायत समिती मासिक सभेत सदस्य आणि प्रशासनात आज जुंपली. चर्चेतील विविध मुद्यांची सांगड घालीत ग्रामसेवकांच्या कामगिरीवर सदस्यांनी ताशेरे ओढताच उग्दिग्न होत गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांची बाजू लावून धरत विषयाचे खंडण केले. सरसकट सर्वच ग्रामसेवकांना दोषी ठरवणे चुकीचे असल्याचे नमूद करून कोरोनामध्ये ग्रामसेवकांनी चांगली कामगिरी केल्याची पुस्ती गटविकास अधिकाऱ्यांनी जोडली. चांगल्या कामाचे कौतुक होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्‍त केली.  येथील पंचायत समितीची मासिक सभा सभापती सुनील पारकर यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजी महाराज सभागृहात झाली. उपसभापती अमोल तेली, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रूपाली पाटील, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहायक गटविकास अधिकारी अरूण चव्हाण उपस्थित होते. काही ग्रामसेवकांच्या सुमार कामगिरीमुळे ग्रामीण भागातील विकास ठप्प होत असल्याकडे सदस्य सदाशिव ओगले यांनी लक्ष वेधले. ग्रामसेवक चांगला असल्यास गावचा विकास होतो, असे सांगून ग्रामसेवकांच्या कामगिरीवर ताशेरे ओढले. अन्य सदस्यांनी साथ देताना काही ग्रामसेवक जाग्यावरच नसल्याचे सांगितले. विकासात्मक प्रश्‍नांची सोडवणूक होण्यासाठी गाव पातळीवर पंचायत समिती सदस्यांची मदत घेणे आवश्‍यक असल्याचे सांगितले. 294 पैकी 65 ताडपत्रींचे प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती समोर येताच ग्रामसेवकांनी याची माहिती दिली नसल्याचे सांगून नाराजीचा सूर आळवला. प्रशासनाच्या समस्या लोकप्रतिनिधींपर्यंत येत नसल्याचे सदस्यांनी सांगितले.  ग्रामसेवक का लक्ष्य?  पंचायत समितीच्या सभांमधून वारंवार ग्रामसेवकांना लक्ष्य केले जात असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी नमुद करून भावना तीव्र शब्दात मांडल्या. तक्रारदार ग्रामसेवकांना देवगड तालुक्‍यात पाठवता कशाला? असा प्रश्‍न सदस्य ओगले यांनी उपस्थित केला. पंचायत समिती कृषी विभागाबाबतही चर्चा झाली. शिक्षक मुख्यालयी राहिल्यास शाळा सुरू करण्यात अडचणी येणार नसल्याचे सुचवण्यात आले. दरम्यान, तळवडे धबधब्याजवळ मंजूर ठिकाणाऐवजी काही अंतरावर चेंजीग रूम बांधली जात आहे. त्यामुळे कामाला स्थगिती देण्याची मागणी सदस्य अजित कांबळे यांनी केली.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZDoB2j
Read More
लॉकडाउन जनतेच्या हितासाठीच ः पालकमंत्री सामंत

सिंधुदुर्गनगरी (सिंधुदुर्ग) - कोरोनाची साथ आटोक्‍यात आणण्यासाठी जिल्ह्यात 8 जुलैपर्यंत कडक लॉकडाउनची अंमलबजावणी सुरू झाली आहे. हा लॉकडाउन जनतेच्या हितासाठीच करण्यात येत असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात लॉकडाउनबाबतचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा आज पालकमंत्री सामंत यांनी घेतला. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील उपस्थित होते. 

पालकमंत्री म्हणाले, ""कोरोनावर मात करण्यासाठी या संसर्गाची साखळी तोडणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यासाठी कडक लॉकडाउन केले आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरा होण्याचा दर 67 टक्के असून मृत्युदर 2.2 टक्के आहे. आर.टी.पी.सी.आर. लॅबमध्ये रोज सुमारे 100 स्वॅब टेस्टिंग केले जातात. आतापर्यंत 229 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 154 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. या सर्वांना डिस्चार्ज दिला आहे.

आतापर्यंत 3967 स्वॅब टेस्टिंग झाल्या आहेत. जिल्ह्यात सध्या 69 रुग्ण उपचार घेत आहेत. लॉकडाउनमुळे ही संख्या आणखी कमी होऊ शकेल.'' 
दरम्यान, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम म्हणाले, ""जिल्ह्यामध्ये पोलिस बंदोबस्त चोख आहे तसेच रात्रीची गस्तही वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रवेशांच्या ठिकाणी नाकाबंदी करुन येणाऱ्यांची पूर्ण चौकशी करुन जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे.'' 

गणेश मंडळांना आवाहन 
पालकमंत्री सामंत म्हणाले, ""नजीकच्या काळामध्ये गणपती उत्सव आला असून जिल्ह्यात मोठ्या संख्येने चाकरमानी गणपतीसाठी येणार आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवाचे योग्य नियोजन करावे. त्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करावी. नियोजनाचा आराखडा तयार करावा. आराखडा मंजुरीसाठी राज्यस्तरावर प्रयत्न केले जातील. समिती गठित करताना गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व घरगुती गणपतींच्या प्रतिनिधींचा समावेश करावा. लालबागचा राजा गणपती मंडळाने जो उपक्रम यंदा हाती घेतला आहे त्या धर्तीवर जिल्ह्यातील गणेश मंडळांनी आरोग्य उपक्रम हाती घ्यावेत.'' 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लॉकडाउन जनतेच्या हितासाठीच ः पालकमंत्री सामंत सिंधुदुर्गनगरी (सिंधुदुर्ग) - कोरोनाची साथ आटोक्‍यात आणण्यासाठी जिल्ह्यात 8 जुलैपर्यंत कडक लॉकडाउनची अंमलबजावणी सुरू झाली आहे. हा लॉकडाउन जनतेच्या हितासाठीच करण्यात येत असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले.  जिल्हाधिकारी कार्यालयात लॉकडाउनबाबतचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा आज पालकमंत्री सामंत यांनी घेतला. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील उपस्थित होते.  पालकमंत्री म्हणाले, ""कोरोनावर मात करण्यासाठी या संसर्गाची साखळी तोडणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यासाठी कडक लॉकडाउन केले आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरा होण्याचा दर 67 टक्के असून मृत्युदर 2.2 टक्के आहे. आर.टी.पी.सी.आर. लॅबमध्ये रोज सुमारे 100 स्वॅब टेस्टिंग केले जातात. आतापर्यंत 229 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 154 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. या सर्वांना डिस्चार्ज दिला आहे. आतापर्यंत 3967 स्वॅब टेस्टिंग झाल्या आहेत. जिल्ह्यात सध्या 69 रुग्ण उपचार घेत आहेत. लॉकडाउनमुळे ही संख्या आणखी कमी होऊ शकेल.''  दरम्यान, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम म्हणाले, ""जिल्ह्यामध्ये पोलिस बंदोबस्त चोख आहे तसेच रात्रीची गस्तही वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रवेशांच्या ठिकाणी नाकाबंदी करुन येणाऱ्यांची पूर्ण चौकशी करुन जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे.''  गणेश मंडळांना आवाहन  पालकमंत्री सामंत म्हणाले, ""नजीकच्या काळामध्ये गणपती उत्सव आला असून जिल्ह्यात मोठ्या संख्येने चाकरमानी गणपतीसाठी येणार आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवाचे योग्य नियोजन करावे. त्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करावी. नियोजनाचा आराखडा तयार करावा. आराखडा मंजुरीसाठी राज्यस्तरावर प्रयत्न केले जातील. समिती गठित करताना गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व घरगुती गणपतींच्या प्रतिनिधींचा समावेश करावा. लालबागचा राजा गणपती मंडळाने जो उपक्रम यंदा हाती घेतला आहे त्या धर्तीवर जिल्ह्यातील गणेश मंडळांनी आरोग्य उपक्रम हाती घ्यावेत.''  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2D85K8e
Read More
इस इंग्लिश क्रिकेटर का कोरोना टेस्ट नेगेटिव, प्रैक्टिस पर लौटने की उम्मीद https://ift.tt/2NVHqbC
Horoscope Today, 4 जुलाई: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/3isUPpE
LIVE: धर्म चक्र दिवस पर पीएम मोदी थोड़ी देर में बौद्ध विद्वानों को करेंगे संबोधित https://ift.tt/31LmmNc
जब असली ठग नटवरलाल की वजह से खतरे में थी बिग बी की फिल्म, बदलना पड़ा नाम https://ift.tt/2ZAkp3x
छोटे पर्दे पर डेब्यू करने को तैयार ईशा देओल, जल्द करेंगी शूट‍िंग https://ift.tt/38pv2du
बिहार: पटना में कांवड़ यात्रा पर रोक, 4 अगस्त तक शिव मंदिर रहेंगे बंद https://ift.tt/2NSTAST
लॉकडाउन में क्या काम किया, बीजेपी आज सौंपेगी PM मोदी को रिपोर्ट कार्ड https://ift.tt/2NQP3Aj
कृषी पदविका आणि तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द

कृषी पदविका आणि तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द

July 03, 2020 0 Comments
राज्यातील कृषी पदविका आणि तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.   from Zee24 Taas: Maharas...
Read More